Rabies Vaccination: रेबीज हा एक जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे; जो मानवासह सस्तन प्राण्यांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि प्रामुख्याने संक्रमित प्राण्यांच्या चाव्यांद्वारे किंवा ओरखड्यांद्वारे पसरतो. हा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे आणि सार्वजनिक आरोग्यासाठी तो एक उपाय आहे. परंतु, सर्व पाळीव प्राण्यांना रेबीजची लस मिळणे आवश्यक आहे का? या संदर्भात इंडियन डॉट कॉमने तज्ज्ञांशी बोलून माहिती घेतली आहे.

कार्निवेलचे बिझनेस हेड जे. एस. रामा कृष्णा सांगतात की, तो सार्वजनिक ठिकाणी फिरणारा प्राणी असो किंवा पाळीव प्राणी असो; कुत्रे आणि मांजरींना रेबीजचे लसीकरण करणे ही आपली जबाबदारी आहे. यातून हे निश्चित होते की, रेबीजमुळे आरोग्यावर कोणतेही परिणाम होत नाहीत आणि हे प्राण्यांमधील आक्रमक वर्तनही कमी करते.

animals that experience menopause
निसर्गाची किमया! तुम्हाला माहितीये का; मानवाव्यतिरिक्त ‘या’ ५ प्राण्यांनाही येतो मेनोपॉज!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Are eggs safe to eat as bird flu spreads
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना अंडी खाणे सुरक्षित आहेत का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Dog Winter Clothes
तुमच्या पाळीव प्राण्याला थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर घालणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
Kaustubh Pol wrote later to Kolhapur District Collector demanding proper disposal of illegally cremated crocodile
सांगलीत मृत मगरीच्या अंत्यसंस्कारावरून वाद, मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची मागणी
vasai virar, dead animals
वसई विरार मध्ये मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी दफनभूमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावास मंजुरी

कुत्रे, मांजरी हे प्राथमिक पाळीव प्राणी आहेत; ज्यांना रेबीज लसीकरण आवश्यक आहे. “हे प्राणी उच्च जोखमीचे मानले जातात. कारण- ते वारंवार इतर प्राणी आणि मानवाच्या संपर्कात असतात. त्यामुळे केवळ प्राण्यालाच रेबीजची लागण होत नाही, तर ते ज्या माणसांच्या संपर्कात असतात, त्यांनाही संवेदनक्षम बनवतात. जगातील बऱ्याच भागांमध्ये कुत्रे हे मानवाच्या रेबीजचे मुख्य प्रसारक आहेत, ज्यामुळे बहुतेक प्रदेशांमध्ये लसीकरण कायदेशीर मानले जाते,” हे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील पेटकेअर प्रो क्लिनिकचे डॉ. ईशान यांनी सांगितले की, कुत्रे, मांजर या प्राण्यांची जीवनशैली किंवा वातावरण काहीही असो, त्यांना रेबीजची लस मिळाली पाहिजे. “रेबीज हा एक जीवघेणा विषाणूजन्य आजार आहे, जो मानवासह सस्तन प्राण्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. हे प्रामुख्याने संक्रमित प्राण्याच्या चाव्यांद्वारे पसरते आणि पाळीव प्राण्यांमध्ये रेबीज टाळण्यासाठी आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी लसीकरण हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे.”

ते पुढे म्हणाले की, खालील प्राण्यांना रेबीज लसीकरणाची आवश्यकता नसते :

  • छोटे सस्तन प्राणी जसे की, हॅमस्टर, गिनीपिग व ससे
  • सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी
  • पक्षी
  • मासे

परंतु, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, या प्राण्यांना रेबीज लसीकरणाची आवश्यकता नसली तरीही त्यांना इतर लसीकरण आणि आरोग्य तपासणी आवश्यक असू शकते.

हेही वाचा: झोपताना डोक्याखाली उशी घेतल्याने काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात…

त्यांच्यावर ही लस किती वेळा देणे आवश्यक आहे?

  • डॉ. ईशान म्हणाले की, रेबीज लसीकरणाची वारंवारता अनेक घटकांवर अवलंबून असते.
  • वय- कुत्र्याचे पिल्लू आणि मांजरीच्या पिल्लू सामान्यत: १२-१६ आठवड्यांच्या वयात प्रथम रेबीज लसीकरण घेतात.
  • ठिकाण- रेबीजच्या उच्च घटना असलेल्या भागात राहणाऱ्या पाळीव प्राण्यांना वारंवार लसीकरणाची आवश्यकता असू शकते.
  • जीवनशैली- घरातील पाळीव प्राण्यांना बाहेरील पाळीव प्राण्यांपेक्षा तुलनेत कमी वेळा लसीकरणाची आवश्यकता असू शकते.
  • रेबीज लसीकरण वेळापत्रक
  • प्रारंभिक लसीकरण : १-२ डोस, ३-४ आठवड्यांच्या अंतरावर, १२-१६ आठवड्यांच्या वयात.
  • बूस्टर शॉट्स : दर १-३ वर्षांनी जे लसीचे प्रकार आणि स्थानिक नियमांवर अवलंबून असते.
  • आपल्या पाळीव प्राण्यांसाठी रेबीज लसीकरणाचे सर्वोत्तम वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आपल्या पशुवैद्याशी सल्लामसलत करा.

Story img Loader