जपानी पाककृतींमध्ये व्हिनेगर हा फार पूर्वीपासून एक महत्त्वाचा घटक आहे, तो केवळ स्वयंपाकात वापरला जाणारा घटक म्हणून नाही तर आरोग्यासाठी टॉनिक म्हणूनही वापरला जातो. बरेच जपानी लोक जेवणापूर्वी व्हिनेगर पितात. कारण ते पचनापासून ते चमकदार त्वचेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करू शकते असे मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, या दाव्यांमध्ये काही तथ्य आहे का आणि तुम्ही ही पद्धत स्वीकारण्याचा विचार करावा का?

जेवणापूर्वी व्हिनेगर पिण्याचे फायदे (Benefits of drinking vinegar before meals)

याबाबत हंग्री कोआला येथील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, जेवणापूर्वी व्हिनेगर पिणे ही विशेषत: जपानसह विविध संस्कृतींमध्ये रुजलेली एक प्रथा आहे, कारण ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे मानले जाते.”

अथ्रेया हॉस्पिटलमधील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ अक्षिता रेड्डी पुढे म्हणतात, “व्हिनेगरमध्ये, विशेषतः अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असते, जे पाचक एंजाइम आणि पोटातील आम्लचे उत्पादन वाढवते असे दिसून आले आहे. हे अन्न अधिक प्रभावीपणे विघटित करण्यास मदत करू शकते.”

जेवणापूर्वी व्हिनेगर पिण्याचे सर्वात संशोधन केलेले फायदे म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याची त्याची क्षमता. “अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अॅसिटिक अॅसिड इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकते.”

जेवणापूर्वी व्हिनेगर प्यायल्याने चयापचय वाढण्यास आणि वजन कमी करण्यासदेखील मदत होऊ शकते. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड फॅट्सचे ऊर्जेत रुपांतर करण्यास मदत करते आणि फॅट्स साठवणे कमी करू शकते, असे चक्रवर्ती म्हणतात.

“रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करून व्हिनेगर हृदयाच्या आरोग्यात सुधारणा करते. व्हिनेगरमध्ये असलेले अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात, जे दोन्ही हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांसाठी जोखीम घटक आहेत,” असे चक्रवर्ती नमूद करतात.

त्वचेच्या आरोग्यात सुधारणा (Improvement in skin health)

चक्रवर्ती सांगतात, “व्हिनेगरमधील अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित करण्यास मदत करते. संतुलित पीएच त्वचेच्या अडथळ्याचे कार्य (skin barrier function) सुधारू शकते, ज्यामुळे कोरडेपणा, जळजळ आणि मुरुमे यांसारख्या समस्या कमी होतात. नियमितपणे सेवन केल्यास व्हिनेगरचे प्रणालीगत परिणाम आतून बाहेरून त्वचेच्या आरोग्यात सुधारणा करू शकतात.”

व्हिनेगर, विशेषतः सफरचंदासारख्या फळांपासून मिळवलेल्या व्हिनेगरमध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. ही संयुगे शरीरातील मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करण्यास मदत करतात, जे पेशींना नुकसान पोहोचवतात आणि त्वचेचे वृद्धत्व वाढवतात.

रेड्डीदेखील हेच सांगतात, “व्हिनेगरमधील अँटीऑक्सिडंट्स जसे की पॉलीफेनॉल, शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे त्वचा निरोगी होते आणि त्वचेची वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात. व्हिनेगरच्या सेवनाने आतड्यांतील मायक्रोबायोटाचे नियमन केल्याने प्रणालीगत दाह कमी करून त्वचेच्या आरोग्याला अप्रत्यक्षपणे फायदा होऊ शकतो.”

हेही वाचा – रोज सकाळी उठताच आवळ्याचे पाणी प्यायल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे

जोखीम किंवा दुष्परिणाम (Risks or side effects)

चक्रवर्ती म्हणतात की, “नियमितपणे व्हिनेगर पिण्याचे अनेक संभाव्य फायदे असले तरी काही जोखीम आणि दुष्परिणामदेखील विचारात घेतले पाहिजेत, विशेषतः विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींसाठी:

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या (Gastrointestinal Issues): व्हिनेगरचे सेवन, विशेषतः रिकाम्या पोटी, पोटातील आम्लता वाढवू शकते, ज्यामुळे पित्ताची गुळणी येणे (acid reflux), छातीत जळजळ किंवा जठराची सूज आणि अल्सरची लक्षणे वाढू शकतात.

दातांच्या मुलाम्याची झीज (Tooth Enamel Erosion): व्हिनेगर हे अत्यंत आम्लयुक्त असते आणि नियमित सेवन केल्यास, विशेषतः ते पाण्यात मिश्रित करून न प्यायल्यास कालांतराने दातांचा संरक्षणात्मक मुलामा खराब होऊ शकते, यामुळे पोकळी आणि दात संवेदनशीलतेचा धोका वाढू शकतो.

संभाव्य औषध संवाद (Potential Drug Interactions) : व्हिनेगर मधुमेह आणि हृदयरोगासाठी असलेल्या औषधांसह काही औषधांशी प्रक्रिया साधू शकतो. जर तुम्ही औषधे घेत असाल तर आरोग्य सेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे योग्य आहे.

हाडांच्या आरोग्याच्या चिंता (Bone Health Concerns) : जास्त व्हिनेगर सेवन केल्याने शरीरात पोटॅशियमची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे हाडांची घनता आणि एकूण हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा –“दोनदा ३० किलो वजन कमी केले पण पुन्हा ‘जैसे थे’! नेमके चुकले कुठे? राम कपूरने केला खुलासा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

“हे संभाव्य फायदे आणि धोके लक्षात घेता, विशेषतः ज्यांना आधीपासूनच आरोग्य समस्या आहेत त्यांनी व्हिनेगर पातळ स्वरूपात, आदर्शपणे पाण्यात मिसळून सेवन करणे आणि दैनंदिन आहारात समाविष्ट करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे रेड्डी ठामपणे सांगतात.

टीप : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि/किंवा तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. कोणताही दिनक्रम सुरू करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking vinegar before meals is a common health trend in japan is it worth trying snk