अनेक लोक दिवसातून दोनपेक्षा अधिक वेळा चहा घेतात, तर काहींना चहाशिवाय दिवसच कोरडा वाटतो. चहाने मानसिक सतर्कता वाढते, शरीरात स्फुर्ती येते असे सांगितल्या जाते. असे असले तरी अधिक प्रमाणात चहाचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. काही लोक चहा नंतर पाणी पिऊ नये असे सांगतात. असे का सांगितल्या जाते, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. चहा प्यायल्यानंतर पाणी का पिऊ नये आणि त्याचे काय नुकसान आहेत, याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) दातांना नुकसान

चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने दातांना नुकसान होऊ शकते. दातांच्या बाहेरील थरावर, म्हणजेच इनॅमलवर परिणाम होतो. इनॅमलमुळे दातांना सुरक्षा मिळते, गरम चहानंतर पाणी प्यायल्याने इनॅमलला नुकसान होऊ शकते. चहानंतर पाणी प्यायल्याने तुमच्या हिरड्या देखील कमकुवत होऊ शकतात. सेन्सिटिव्हिटीची समस्या देखील होऊ शकते.

(तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, सर्दी खोकल्यासह ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम)

२) अल्सर

चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनतंत्राला नुकसान होऊ शकते आणि अल्सर होण्याचा धोका वाढतो. चहा प्यायल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने अनेक लोकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. ही समस्या सुरूच राहिली तर अल्सरचा धोका बळावतो.

३) सर्दी खोकल्याचा त्रास

हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी खोकल्याची समस्या वाढते. तापामानात झालेल्या बदलामुळे असे होते. चहानंतर पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानात बदल होते. यामुळे सर्दी खोकला आणि घशात खवखव होऊ शकते.

(नाक बंद झाले? ‘हे’ ४ घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर)

४) नाकातून रक्तस्त्राव

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो. थंड आणि गरम तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे असे होते. चहा प्यायल्यानंतर थंड पाणी प्यायल्यास नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking water after tea could be harmful to body ssb
First published on: 22-11-2022 at 10:06 IST