Dry Fruits That Help in Uric Acid: जेव्हा शरीरातून युरिक ऍसिड बाहेर फेकण्यास किडनी असमर्थ होऊ लागते तेव्हा युरिक ऍसिडचा स्तर शरीरातच वाढून अनेक गंभीर समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. आपल्या आहारातील प्युरीन युक्त पदार्थांचे पचन करताना शरीरात एक विशिष्ट प्रकारचे ऍसिडयुक्त पाणी तयार होऊ लागते, यालाच युरिक ऍसिड असेही म्हंटले जाते. जेव्हा शरीरात प्युरीन युक्त पदार्थांचे प्रमाण अति होते तेव्हा शरीर त्यांच्या पचनासाठी अधिक प्रमाणात युरिक ऍसिड तयार करू लागते. यातूनच पुढे सांधेदुखी, अंगाला सूज, किडनी फेल होणे असे अनेक गंभीर त्रास उद्भवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता मुख्य प्रश्न हा की प्युरीन युक्त पदार्थ म्हणजे काय? तर सहसा पचनास जड असे मांस व मद्य हे प्युरीनचा साठा असणारे पदार्थ म्हणून ओळखले जातात. मदरहूड हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ रुपश्री जैस्वाल यांनी हेल्थशॉट्सला दिलेल्या माहितीनुसार काही विशिष्ट सुक्या मेव्यातील पदार्थ हे युरिक ऍसिड कमी करण्यासाठी नामी उपाय ठरू शकतात.

युरिक ऍसिडचा त्रास होत असल्यास ‘हा’ सुका मेवा करतो मदत..

1) काजू

काजूमध्ये प्युरीनचे प्रमाण अत्यंत कमी असते व पोषक तत्वांचे प्रमाण मुबलक असते. काजू शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात आणि निरोगी कोलेस्ट्रॉल वाढवतात. काजूमधील महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे ही आतड्यांचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.

2) अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा -3 मुबलक प्रमाणात असते. अक्रोडचे सेवन केल्याने संधिवाताला मारक प्रथिने शरीरात तयार होतात. अक्रोडमध्ये अँटीइंफ्लेमेंट्री गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरात जळजळ जाणवत असेल तर हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

3) बदाम

बदामाचे प्युरीन सत्व अत्यंत कमी असते, परिणामी बदामाचे सेवन हे शरीराला युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. याशिवाय बदामाच्या व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि मॅंगनीजचा साठा असतो. बदामाच्या सालींमधे सुद्धा अँटिऑक्सिडंट्स असतात. या मुळे युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

4) अळशी

अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्समध्ये शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असतात जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही. फ्लॅक्ससीड तेल हे शरीराला अँटी इन्फ्लेमेंटरी सत्वांचा पुरवठा करते, परिणामी यूरिक ऍसिडच्या उच्च पातळीमुळे होणारी वेदना कमी होते.

5) ब्राझील नट्स

ब्राझील नट्स मध्ये भरपूर फायबर आणि कमी प्युरीन असतात. यामुळे यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात तसेच वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते.

आहारतज्ज्ञ रुपश्री जैस्वाल म्हणतात, “जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या आणि कार्यक्षमतेने यूरिक ऍसिड काढून टाकत नाही तेव्हा उच्च यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढू लागते. जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात यूरिक ऍसिड वाढते तेव्हा या स्थितीला हायपरयुरिसेमिया म्हणतात. यामुळे युरिक ऍसिडचे स्फटिक तयार होतात जे सांध्यांमध्ये स्थिर होतात आणि संधिवात होऊ शकतो, यात शरीराला अत्यंत तीव्र वेदना होऊ शकतात. तसेच युरिक ऍसिड किडनीमध्ये टिकून राहिल्यास मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

हे ही वाचा<< मूळव्याध, बद्धकोष्ठच्या त्रासाने हैराण? थंडीच्या सीझनमध्ये येणारं ‘हे’ फळ करतं अमृतासमान काम

दरम्यान, कमी प्युरीनयुक्त अशी ताजी फळे आणि भाज्या, अंडी, बटाटे कमी फॅट्स असणारी दुग्धजन्य उत्पादने जसे की दही आणि स्किम मिल्क यांचेही सेवन युरिक ऍसिडचा स्तर कमी करण्यात मदत करू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry fruits that reduce uric acid how much cashew almonds should be consumed in a day health news svs
First published on: 07-12-2022 at 15:52 IST