थंडीमध्ये ज्या आहारीय पदार्थांचे कटाक्षाने सेवन करावे,असा सल्ला आयुर्वेदाने दिलेला आहे, त्यातला एक पदार्थ म्हणजे -उडीद. हिवाळ्यात सकाळी कडक भूक लागते तेव्हा तीळाच्या तेलामध्ये तळलेले उडदाचे वडे खावेत असा सल्ला आयुर्वेदाने दिलेला आहे. हारीत संहितेनुसार उडदाचे वडे हे चवीला गोड,रुचकर मात्र पचायला अतिशय कठीण असतात.

वास्तवात उडीद हा नित्य सेवनाचा पदार्थ नाही. कोणत्याही स्थितीमध्ये शरीराला पोषक असणारे, कोणत्याही ऋतुमध्ये सेवन करण्यायोग्य व शरीराला कधीही न बाधणारे असे जे अन्नपदार्थ आयुर्वेदाने आरोग्यासाठी पथ्यकारक म्हणून सांगितले आहेत, त्यामध्ये मूग येतात, उडीद नाही. अगदी याच्या विरुद्ध शरीराला बाधक, नित्य सेवन करण्याजोगे नसलेले असे जे पदार्थ आयुर्वेदाने सांगितले आहेत, त्यामध्ये येतात उडीद.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bacteria in sky
हवेतील जंतू पसरवत आहेत का साथीचे रोग?
Low back pain: If you have lower back pain, stay a mile away from this food item
Low back pain : पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? डॉक्टरांचं ऐका आणि ‘हे’ पदार्थ पूर्णत: बंद करा
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
White Onion Pickle recipe in marathi how to make white Onion Pickle in marathi
पांढऱ्या कांद्याचे चटकदार लोणचे; चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

हेही वाचा : Health Special: विविध डाळींचा वापर पोषकतत्त्वांसाठी कसा करावा?

मग थंडीमध्ये उडीद का खायला सांगितले?

याचे महत्वाचे कारण म्हणजे उडीद पचायला अतिशय जड आहेत. कडक थंडीमध्ये जेव्हा तुमचा अग्नी प्रखर असतो (कडक भूक लागते व पचनशक्ती प्रबळ असते) तेव्हा त्या अग्नीला पचायला जड असाच आहार देणे अपेक्षित असते, जे उडदाच्या सेवनाने साध्य होते. त्यात उडिद पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे एकदा उडदाचे पदार्थ खाल्ले की बराच वेळ अन्न मिळाले नाही तरी चालते, जे हिवाळ्यात पुन्हा-पुन्हा भूक लागत असताना उपकारक होते. याशिवाय उडिद उष्ण गुणांचे असल्याने शरीरात थंडी कमी करुन उष्णता वाढवण्यास मदत करतात. उडीद हे मांसाप्रमाणे पचायला जड आणि मांसाप्रमाणेच शरीराला शक्ती देणारे असतात (माषो मांसवत्‌ विद्यात्‌) असे आयुर्वेदाने सांगितले आहे.

वास्तवात उडीद हे मांसाप्रमाणेच पौष्टीक आहेत.मांससेवनाने जशी व जितकी उर्जाशक्ती मिळते, तशी व तितकीच उर्जाशक्ती उडदानेही मिळते, हेच पूर्वजांना सुचवायचे आहे. प्रत्यक्षातही १०० ग्रॅम उडदामधुन जवळजवळ ३५० कॅलरी(उष्मांक)मिळतात. शरीरबांधणीसाठी आवश्यक असणारी प्रथिने (प्रोटिन्स) सरासरी २५ ग्रॅम एवढ्या भरपूर मात्रेमध्ये यात असतात.

हेही वाचा : Mental Health Special: पॉर्नबद्दल मुलांशी कसं बोलाल? आणि काय बोलाल?

अन्नपानं तिलान्‌ माषाञ्छाकानि च दधीनि च। सुश्रुतसंहिता ६.६४.२८
हारीत संहिता १.२३.१८

कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) सरासरी ६० ग्रॅम मिळतात. स्नायुंना पोषक पोटॅशियम ७२० एमजी आणि इतर खनिजांमध्ये मॅग्नेशियम, कॉपर,मॅन्गनीज,सल्फर व झिंक सुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात. त्यामुळेच वाढत्या वयाच्या मुलामुलींना, व्यायाम करणार्‍यांना, कुस्ती- खेळ खेळणार्‍यांना, मेहनत करणार्‍यांना,घाम गाळणार्‍यांना उडीद फार चांगले. अर्थातच वर सांगितलेल्यांच्या विरुद्ध जीवनशैली असलेले अर्थात बैठे काम करणारे, दिवसभर बसून राहणारे, व्यायाम-अंगमेहनत न करणारे, घाम न गाळणारे, परिश्रम न करणारे यांनी सुद्धा अर्थात आजच्या आधुनिक जगामधील आधुनिक- संगणक-जीवनशैली जगणार्‍यांनी उडीद खाणे कितपत योग्य होईल हा प्रश्नच आहे.