scorecardresearch

जेवणापूर्वी खा फक्त २० ग्रॅम बदाम आणि मधुमेहापासून मिळवा आराम, संशोधनातून झाले सिद्ध

बदामाच्या सेवनामुळे मेंदूलाही चालना मिळते, त्यामुळे लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी बदाम दिले जाते.

Eating almonds before meals could help keep diabetes in check research
जेवणापूर्वी खा फक्त २० ग्रॅम बदाम आणि मधुमेहापासून मिळवा आराम, संशोधनातून झाले सिद्ध (संग्रहित फोटो)

सुक्या मेव्यात बदामाला खूप महत्वाचे स्थान आहे. बदामामध्ये शरीरास आवश्यk अनेक पोषकतत्वे असतात. बदाम नुसते खाण्यापेक्षा अनेकदा ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे शरीरास विविध आजारांपासून दूर ठेवता येते आणि एक वेगळी ताकद मिळते. यात नव्या दोन संशोधनातून रोज जेवणापूर्वी फक्त २० ग्रॅम बदाम खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका कमी होतो असे दिसून आले आहे. तसेच जास्त वजन आणि प्रीडायबेटिस असलेल्या लठ्ठ लोकांमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते. बदामांचा समावेश कालांतराने वाढणारा मधुमेह रोखण्यास मदत होते, असे सिद्ध झाले आहे.

बदामामुळे मधुमेह नियंत्रणात कसा राहते हे अभ्यासण्यासाठी दोन वेगवेगळे संशोधन करण्यात आले. यातील पहिले संशोधन तीन महिन्यांचे होते. तर दुसरे अल्पकालीन म्हणजे तीन दिवसांचे होते. यात सहभागी लोकांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या ३० मिनिटे आधी मूठभर बदाम (२० ग्रॅम) खाण्यास देण्यात आले. यावेळी सुकामेव्यातील बदाम व्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ त्यांना खाण्यास देण्यात आले नाहीत. हे संशोधन डॉ अनूप मिश्रा आणि डॉ सीमा गुलाटी यांनी आयोजित केले होते आणि कॅलिफोर्नियाच्या बदाम बोर्डने यासाठी निधी दिला होता.

दोन्ही संशोधन अनियमित नियंत्रित चाचण्यांप्रमाणे होते. ज्यात संशोधकांनी असे गृहित धरले होते की, जेवणापूर्वी बदामाचे सेवन हे ‘प्रीलोडिंग’चे काम करेल, ज्यामुळे जेवणानंतर ग्लुकोज आणि इन्सुलिनमधील चढउतार कमी करेल आणि नियंत्रण आहाराच्या तुलनेत एकूण हायपरग्लाइसेमियाचे प्रमाणही कमी करेल.

यावेळी अभ्यासाचे असे परिणाम दिसून आले की, आहारातील एक भाग म्हणून रक्तातील ग्लुकोजच्या पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यामुळे प्रत्येक जेवणापूर्वी बदामाचा एक छोटासा भाग जोडल्यास भारतातील आशियाई भारतीयांमध्ये फक्त तीन दिवसांत ग्लायसोमिक नियंत्रण वेगाने सुधारु शकते, असे नवी दिल्लीतील फोर्टिस-सी-डीओसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबिटीज, मेटाबॉलिक डिसीज, आणि एंडोक्राइनोलॉजीचे प्रोफेसर आणि अध्यक्ष तसेच संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ अनूप मिश्रा म्हणाले.

संशोधनात दिसून आले की, तोंडातील ग्लुकोज लोड होण्याच्या ३० मिनिटे आधी २० ग्रॅम बदाम खाल्ल्याने रक्तातील साखर आणि हार्मोन्समध्ये लक्षणीय घट दिसून आली. यात फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, झिंक आणि मॅग्नेशियम असलेल्या बदामाचे पौष्टिक घटक चांगले ग्लायसेमिक नियंत्रण ठेवण्यात, भूक कमी करण्याचे महत्वाचे कार्य करत आहे.

बदामासंदर्भातील दीर्घकालीन संशोधनात, फास्टिंग ग्लुकोज, पोस्टप्रॅन्डियल इन्सुलिन, हिमोग्लोबिन A1c, प्रोइन्सुलिन, एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि अत्यंत कमी घनतेच्या लिपोप्रोटीनमध्ये घट दिसून आली.

बदामामुळे पोट रिकामी वाटत नाही. ज्यामुळे कमी भूक लागते आणि कमी अन्न आणि कमी कॅलरी खाण्यास मदत होते. परिणामी वजन नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहापासून त्रस लोकांनी रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करण्यासाठी बदामाचे सेवन केले पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या