सुक्या मेव्यात बदामाला खूप महत्वाचे स्थान आहे. बदामामध्ये शरीरास आवश्यk अनेक पोषकतत्वे असतात. बदाम नुसते खाण्यापेक्षा अनेकदा ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे शरीरास विविध आजारांपासून दूर ठेवता येते आणि एक वेगळी ताकद मिळते. यात नव्या दोन संशोधनातून रोज जेवणापूर्वी फक्त २० ग्रॅम बदाम खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका कमी होतो असे दिसून आले आहे. तसेच जास्त वजन आणि प्रीडायबेटिस असलेल्या लठ्ठ लोकांमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते. बदामांचा समावेश कालांतराने वाढणारा मधुमेह रोखण्यास मदत होते, असे सिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदामामुळे मधुमेह नियंत्रणात कसा राहते हे अभ्यासण्यासाठी दोन वेगवेगळे संशोधन करण्यात आले. यातील पहिले संशोधन तीन महिन्यांचे होते. तर दुसरे अल्पकालीन म्हणजे तीन दिवसांचे होते. यात सहभागी लोकांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या ३० मिनिटे आधी मूठभर बदाम (२० ग्रॅम) खाण्यास देण्यात आले. यावेळी सुकामेव्यातील बदाम व्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ त्यांना खाण्यास देण्यात आले नाहीत. हे संशोधन डॉ अनूप मिश्रा आणि डॉ सीमा गुलाटी यांनी आयोजित केले होते आणि कॅलिफोर्नियाच्या बदाम बोर्डने यासाठी निधी दिला होता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating almonds before meals could help keep diabetes in check research sjr
First published on: 23-03-2023 at 09:54 IST