scorecardresearch

लघवीद्वारे अतिरिक्त ब्लड शुगर शरीराबाहेर काढून टाकतो ‘हा’ भात? तज्ज्ञ सांगतात, “डायबिटीज रुग्णांनी….”

डायबिटीजला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या राईसचं सेवन करावं? एक्सपर्टने दिलेला सल्ला एकदा वाचाच.

Millet Rice For Diabetes Control
डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी या राईसचं सेवन करा. (Image-Freepik)

Diabetes Diet : खराब डाएट आणि बदलत्या जीवनशैलीमुळं डाएबिटीजच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. डायबिटीज वाढणं आणि कमी होणं, दोन्ही आरोग्यासाठी घातक असतात. या आजाराची लक्षणे वेळोवेळी माहित झाल्यावर आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होतं. डायबिटीजचा कोणताही कायमस्वरूपी उपाय नाहीय. या आजाराला फक्त नियंत्रणात आणलं जावू शकतं. डायबिटीजवर नियंत्रण न मिळाल्यास हदयाचे विकार, किडनी आणि फुफ्फुसाला धोका निर्माण होतो. डाएटवर नियंत्रण ठेवणे डायबिटीजला नियंत्रणात आणण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतं. तसंच मानसिक तणावापासून स्वत:ला दूर ठेवणे आणि शरीराला सक्रीय ठेवणे, या गोष्टी डायबिटीजवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

डायबिटीज झालेल्या रुग्णांनी मोठ्या प्रमाणात फायबर असलेल्या डाएटचं सेवन करावं. डाएटमध्ये फायबरचं सेवन केल्यामुळं पचनक्रीया संथपणे होते आणि ब्लडमध्ये शुगरचं प्रमाणही हळूहळू वाढतं. डायबिटीजला नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये मिलेट राईसचा समावेश करा. हेल्थलाईनने दिलेल्या माहितीनुसार, मिलेट राईसमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. त्यामुळे डायबिटीजवर नियंत्रण मिळण्यास मदत होते. मिलेट राईस काय आहे? मिलेट राईसमुळं ब्लड शुगर नियंत्रणात कशी राहते? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मिलेट राईस काय आहे? डायबिटीजला कसं नियंत्रणात ठेवतं?

न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायबिटीज झालेल्या रुग्णांसाठी फायबर,प्रोटीन, आवश्यक मिनरल्सचा समावेश असलेल्या मिलेट राईसचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं. मिलेट्सला सुपर फूडही म्हटलं जातं. कारण यामध्ये पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. मिलेटचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो. ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर असतं. यामध्ये खूप जास्त फायबर असतं. ज्यामुळे ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवता येतं. याचं सेवन केल्यामुळं कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं. एग्जाटिक सॅलेड, सूप आणि चपाती, भाकरी खाल्ल्याने मिलेटसारखं डाएट तुम्हाला फॉलो करता येईल. मिलेट राईसला कोणत्याही भाजीसोबत मिक्स केल्यावर त्याची पौष्टीकता अधिक वाढते. मिलेट खाल्ल्याने पचनक्रीयाही सुधारते आणि हृदयाचे आरोग्या उत्तम राहण्यास फायदा होतो.

नक्की वाचा – Weight Loss: चिकन आणि मटणापेक्षा डाळ लय भारी, हा प्रोटीन डाएट फॉलो करा अन् झटपट वजन कमी करा

मिलेट राईसचे फायदे

१) फायबरने परीपूर्ण असलेलं मिलेट राईस ब्लड शुगरला नियंत्रणात आणण्यात खूप फायदेशीर ठरू शकतं.

२) याचा ग्लाइसोमिक इंडेक्स खूपच कमी असतो. ज्यामुळं शुगर असलेल्या रुग्णांना चांगल्या डाएटचं सेवन करता येतं.

३) मिलेट राईसमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं. याचं सेवन केल्यामुळं एनीमियावर उपचार करता येतं.

४) मिलेटमध्ये कॅल्शियम, मॅंग्ननीज, मॅग्नेशियम, जिंक, पोटॅशियम,कॉपर आणि अन्य मिनरल्सचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

५) मिलेट राईसच्या सेवनामुळं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहतं.

मिलेट राईस कसं बनवाल?

एक कप मिलेट घ्या. ज्यामध्ये बाजऱ्याचं समावेश करा. याला स्वच्छ पाण्यात धुऊन घ्या आणि यामध्ये तीन कप पाणी टाका. त्यानंतर अर्धा तास मीडियम फ्लेमवर हा भात शिजवा. जोपर्यंत पाणी पूर्णपणे सुकत नाही, तोपर्यंत या भाताला शिजवा. तुम्ही तुमच्या आवडीची भाजी यात मिक्स करून त्याची पौष्टीकता आणि चविष्टपणा वाढवू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:49 IST