लहानपणी पोटात दुखलं की आपली आई आपल्या बेंबीत तेल सोडत असे. बेंबीमध्ये तेल लावल्यानं पोटदुखीपासून आराम मिळतो. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरगुती उपाय म्हणून बेंबीत तेल घातले जाते. कालांतराने या सोप्या पद्धतीने बरे देखील वाटते. पण फक्त पोटात दुखल्यावरच बेंबीत तेल घालणे पुरेसे नाही. बेंबीत आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आहे. दररोज रात्री झोपताना तुम्ही याचे २ थेंब नाभीत घातल्यावर अनेक समस्यांवर उपाय मिळणार आहे. याचा फायदा तुम्हाला निरंतर होणार आहे.

नाभीमध्ये तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

बेंबीतील घाणही साफ होते. बेंबी हा शरिरातील अतिशय लहान भाग आहे, ज्यामध्ये घाण सहजपणे जमा होऊ शकते आणि जी साफ करणे कठीण असते. अशावेळी बेंबीमध्ये तेल टाकल्यानं अनेक महिने साचलेली घाणही वितळून स्वच्छ होते. योग आणि आयुर्वेदात असे मानले जाते की शरीराचे चक्र बेंबीपासूनच सुरु होते, म्हणूनच ते संतुलित ठेवण्यासाठी त्यावर तेल लावले जाते. बेंबीमध्ये तेल घातल्यानं मज्जासंस्था चांगली आणि संतुलित राहते. बेंबीत तेल लावल्यानं त्वचेच्या आरोग्यावरही परिणाम होतो. बेंबीत तेल लावल्यास त्वचा उजळते तसेच सांधेदुखीपासूनही सुटका मिळवण्यासाठी लोक बेंबीत तेल लावतात.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

हेही वाचा – सनस्क्रीन विसरून जाल! उन्हाळ्यात टोमॅटोचे ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

नाभीमध्ये गाईचे तूप लावून हलकी मालिश केल्यामुळे होणारे फायदे.

  • तूप लावल्यामुळे स्कीनमध्ये आद्रता टिकून राहील आणि फेयरनेस वाढेल.
  • यामुळे स्कीनची ड्रायनेस दूर होते आणि चेहरा चमकदार होतो.
  • यामुळे पिम्पल्स आणि डाग दूर होतात.
  • बेंबीमध्ये तूप लावल्यामुळे ओठ सुंदर होतात.
  • यामुळे केसांचे गळणे थांबते आणि केस चमकदार होतात.
  • वजन कमी करायचे असेल तर ऑलिव्ह ऑईल मदत करू शकेल. रात्री झोपेच्या आधी बेंबीमध्ये ते तेल टाका.
  • तसेच हे गुडघेदुखी आणि सांधेदुखी मध्ये फायदेशीर आहे.
  • यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि बुद्धीकोष्टतेपासून बचाव होतो