Fight Winter Cold, Cough To Try This Tip : जसजसे हिवाळ्याचे महिने सुरू होतात, तसतसे सर्दी, घसा खवखवणे सुरू होते. झोपेतून उठल्यावर नाक बंद आणि घशात खरखरीत वाटणे अशा अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. पण, असे जाणवल्यास संपूर्ण दिवस खूप थकल्यासारखे होते. मग अशा वेळी (Fight Winter Cold, Cough) सकाळी दिवसाची सुरुवात कॉफीने करण्याऐवजी एक कप लिंबू अन् लवंगाचे कोमट पाणी पिऊन बघा. खोकला आणि सर्दीसाठी हा एक घरगुती उपाय आहे; ज्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात.

हे साधे पेय सर्दीच्या लक्षणांपासून मुक्त करण्याप्रमाणेच वजन व्यवस्थापनासही साह्यभूत ठरू शकते का याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने एमजीएम (MGM) हेल्थकेअरच्या प्रमुख आहार तज्ज्ञ व आरोग्य तज्ज्ञ विजयश्री एन. यांच्याशी चर्चा केली.

Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

पण लिंबू आणि लवंगच का?

लिंबू त्याच्यामधील क जीवनसत्त्वासाठी ओळखला जातो, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे श्वसनमार्गातील श्लेष्मा सैल करून, तो बाहेर काढण्यास मदत करतो (Fight Winter Cold, Cough) . तर दुसरीकडे, लवंगात दाहकविरोधी गुणधर्म असतो. त्यात युजेनॉल, गॅलिक ॲसिड यांसारखी संयुगे असतात, जी अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि पेशींचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात, असे विजयश्री म्हणाल्या आहेत.

विजयश्री यांनी असेही सांगितले की, लवंगेमुळे खोकला कमी होऊन, श्वासोच्छ्वास घेण्यास मदत होते. तसेच श्वसनमार्ग साफ करण्यासही त्याचा लाभ होतो. त्यामुळे शांत झोपेला प्रोत्साहन मिळते. एकंदरीत सर्दी आणि खोकल्यामध्ये लवंग फायदेशीर ठरते.

हेही वाचा…Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा

सकाळी कॉफीऐवजी लिंबू, लवंगयुक्त पाणी घ्या (Fight Winter Cold, Cough) :

तुम्ही सकाळी कॉफीची जागा लिंबू व लवंगयुक्त पाण्याने घेतल्यास तुम्हाला कॅफिन मिळणार नाही; पण त्या पाण्याचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत.
दूध व साखर असलेल्या एका सामान्य कॉफीमध्ये सुमारे १०० ते २०० कॅलरीज असतात; तर लिंबू व लवंगाच्या पाण्यात एक चमचा मध घातल्यास, त्या पेयात केवळ सुमारे २० कॅलरीज मिळू शकतात, असे विजयश्री म्हणाल्या आहेत.

कॅलरीजचे सेवन कमी करणे हे तुमचे ध्येय असल्यास हे पेय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते (Fight Winter Cold, Cough). त्याशिवाय लिंबू व लवंगाचे खूप फायदे आहेत. विशेषत: जेव्हा तुम्हाला सर्दीची लक्षणे जाणवत असतील किंवा घसा खवखवत असेल तर आणि थंडीची लक्षणे जाणवत असताना दिवसातून दोनदा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी लिंबू व लवंगाचे पाणी पिण्याची शिफारस केली आहे.

लिंबू व लवंगयुक्त पेय कसे बनवायचे ?

१. लवंग उकळवा : पाण्यात लवंग उकळून घ्या.

२. लिंबाचा रस आणि मध घालण्यापूर्वी तुम्ही उकळवलेले पाणी थंड होऊ द्या. क जीवनसत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि कडूपणा टाळण्यासाठी पाणी गरम असताना लिंबू घालणे टाळा.

३. मध वापरा : आरामदायक प्रभाव आणि संतुलित चवीसाठी एक चमचा मध घाला.

तुम्ही हे पेय किती वेळा पिऊ शकता?

जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असेल, तर साधारण सात ते १० दिवस दररोज हे पेय प्यावे, असे विजयश्री यांनी सुचवले आहे. हे पेय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकता. तसेच तुमच्या नेहमीच्या कॉफी किंवा चहाला हा एक खास पर्याय म्हणूनदेखील काम करील.

हे पेय कोणी पिऊ नये?

हे पेय सगळ्यांसाठी सुरक्षित असले तरी, पेप्टिक अल्सर, अन्ननलिका समस्या किंवा घशाची संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींनी हा उपाय काळजीपूर्वक वापरावा. मध घातल्याने लिंबाच्या आंबटपणाचा समान करण्यास मदत होते. त्यामुळे लक्षात ठेवा की, लिंबू व लवंगाचे पाणी थंडीच्या सौम्य लक्षणांपासून आराम देऊ शकत असले तरीही अधिक गंभीर संक्रमणांसाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले ठरेल.

Story img Loader