Five Reasons You Can Not Loose Weight Fast : वजन कमी करण्यासाठी आज जिम,योगा, व्यायामाचे अन्य प्रकार तसेच किटो डाएट, इंटरमिटंट फास्टिंग, असे डाएटचे प्रकार, व्हिटॅमिन्स, सप्लिमेंट्स, प्रोटीनच्या गोळ्या असे एक ना अनेक उपाय केले जातात. पण काही वेळा तुम्ही कितीही डाएट करा, कितीही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा तुमचे वजन काही केल्या कमी होत नाही. असं का? आपल्याला वजन कमी करताना अनेकदा आपलीच बॉडी व आपलाच मेंदू थांबवत असतो. कितीही महाग जिम किंवा कितीही महाग डाएट प्लॅन जरी असला तरी हे सगळं तुमच्या शरीराला योग्य आहे का हे ही आपण पाहणे आवश्यक असते. आज आपण आहारतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांच्या माध्यमातून तुमचे वजन कमी होण्यास अडथळा ठरणारी पाच कारणे जाणून घेऊया…

‘या’ पाच कारणांनी वजन कमी होत नाही (Why You Struggle To loose Weight)

  1. तुम्ही आठवड्याच्या शेवटी तुमच्या रुटीनमध्ये गोंधळ घालत आहात. जर तुम्ही आठवड्याच्या दिवसात डाएट करत असाल, तुम्हाला आवडत असलेल्या सर्व पदार्थांपासून स्वतःला वंचित ठेवत असाल, तर तुम्ही तुमच्या शनिवार व रविवारच्या जेवणात गोंधळ घालून डाएटचे तीन तेरा वाजवत असण्याची शक्यता आहे.
  2. आपल्या शरीरातील अतिरिक्त फॅट्स व विषारी घटक हे घाम व मल-मूत्रावाटे बाहेर फेकेल जातात. पण जेव्हा तुमच्या आतड्यांमधील पोअर्स खुले असतात तेव्हा हे घटक आतड्यांमध्येच शोषून घेतले जातात. परिणामी वजन कमी होत नाही. म्हणूनच दर ३ ते ६ महिन्यांनी आतड्यांची तपासणी आवश्यक आहे तसेच आतड्यांना सुदृढ ठेवण्यासाठी योग्य आहार घ्यायला हवा.
  3. तुम्ही दररोज जेवण ऑर्डर करून वजन कधीच कमी करू शकणार नाही. अगदी हेल्दी जेवणही जेव्हा बाहेरच्या हॉटेलमध्ये बनते तेव्हा त्यात कॅलरीची संख्या कमीच असेल याची शाश्वती नाही. यापेक्षा घरात वेळ व डाएट ठरवून अगदी वरण- भात खाऊनही वजन कमी करू शकतात.
  1. अनेकदा आपल्या शरीरात काही जीवनसत्व व पोषक सत्व कमी प्रमाणात असतात अशावेळी तुमचे शरीर फॅट्सचा साठा करून ठेवते जेणेकरून पुढे आजारी पडल्यास तुम्हाला रोगप्रतिकारक शक्तीसाठी याचे रूपांतर ऊर्जेसाठी करता येते. अशावेळी आपण आहारात या न्यूट्रिएंट्स व व्हिटॅमिन्सचा समावेश करणे गरजेचे आहे. लक्षणावरून व्हिटॅमिन्सची कमतरता ओळखू शकता.
  2. सगळं काही करूनही तुमच्या हार्मोनल असंतुलनाने सुद्धा तुमचे वजन जास्त असू शकते. अशावेळी जास्त वर्कआउट केल्याने जळजळ होऊ शकते. तुम्हाला थायरॉईड आहे, PCOS, इन्सुलिन, इस्ट्रोजेनच्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.

हे ही वाचा<< उंचीनुसार तुमच्या कंबरेची रुंदी आहे का परफेक्ट? हेल्दी शरीरासाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा

best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

दरम्यान, वजन कमी करण्याच्या प्रवासात तुमची ध्येय तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे लक्षात ठेवा. तुमचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच मदत करू शकतो. तसेच आपण कुठल्याही प्रकारची शारीरिक ऍक्टिव्हिटी निवडणे आवश्यक आहे, अगदी दिवसातून ५ किमी चालूनही तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी वेग व सातत्य असायला हवे.