scorecardresearch

औषध घेऊन बरं वाटत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टीप्स फॉलो करा, डायबिटीज राहिल नियंत्रणात

आता झटपट नियंत्रणात येईल डायबिटीज? फक्त तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टीप्स फॉलो करायला विसरू नका.

Best Tips For Diabetic Patient
या टीप्स फॉलो करा अन् डायबिटीजवर नियंत्रण मिळवा. (Image-Loksatta Graphics Team)

डायबिटीज एक गंभीर आजार असून त्यावर नियंत्रण ठेवणं तितकच कठीण आहे. डायबिटीज आजार वेगाने पसरतो. टाईप १ डायबिटीज असो किंवा टाईप २, यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे फुल टाईम जॉब आहे. बल्ड शुगर तपासणे, औषधे, व्यायाम आणि संतुलित आहार सुरु ठेवल्यावर डायबिटीज नियंत्रणात येऊ शकतं. दिवसभर थकल्यानंतर पोटभरून खाल्ल्यावर आराम करणे, म्हणजे तुमची शुगर नियंत्रणात आहे, असा याचा अर्थ होत नाही. डायबिटीजमुळं तुमचं आरोग्य कधीही बिघडू शकतं. यासाठीच रात्री ब्लड शुगर नियंत्रणात असणे आणि चांगली झोप घेणे आवश्यक आहे. न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी काही सोप्या टीप्स सांगितल्या आहेत. या टीप्स फॉलो केल्यावर तुमच्या झोपेत सुधारणा होईल, तसंच ब्लड शुगरवरही नियंत्रण मिळू शकतं.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

कॅमोमाइल चहा

जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल, तर तुम्ही ब्लड शुगरला नियंत्रणात ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाईल चहा घेऊ शकता. यात असलेल्या एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सीडेंट गुणांमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

भिजवलेले बदाम

रात्री झोपायच्या आधी तुम्ही भिजवलेले सात बदाम खाऊ शकता. बदाममध्ये उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन झोपण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात मदत करतात. रात्रीच्या भुखेवर नियंत्रण राहतं आणि शुगर क्रेविंगला कमी करतं.

१ चमचा भिजवलेले मेथीचे दाणे

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भिजवलेले मेथीचे दाणे खाऊ शकता. मेथीत असलेल्या बियांचे हायपोग्लायसेमिक गुण ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतं.

नक्की वाचा – डायबिटीज झालाय? या मसाल्याचं सेवन करा अन् १२ आजारांना दूर पळवा, तज्ज्ञ सांगतात…

१५ मिनिटे वज्रासन योगा करा

दिवसभरतील अस्वस्थपणा आणि ब्लड शुगरचा टप्पा नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी १५ मिनिट वज्रासन योगा करु शकता. यामुळे डायबिटीजवर नियंत्रण राहण्याबरोबरच ब्लड फ्लोमध्येही सुधारण होते.

या गोष्टीची घ्या विशेष काळजी

झोपण्यापूर्वी अनेक लोकांना मोबाईलवर काम करण्याची सवय असते. ही सवय आरोग्यास हानिकारक ठरते. तुम्ही रात्री कमित कमी ७ तासांची झोप घेतली पाहिजे. नसांमध्ये वेदना होणे, सतत तहान लागणे, खूप भूख लागणे, यामुळं तुम्हाला जागं राहावं लागू शकतं. पण ही लक्षण नेहमी जाणवत असतील तर डॉक्टरांना संपर्क करा.

डिस्क्लेमर – सामान्य माहितीवर आधारित हा लेख आहे. हा कोणत्याही प्रकारचा दावा किंवा विकप्ल होऊ शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी डॉक्टरांना संपर्क करा.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 15:42 IST