Uric Acid Removal Food: युरिक अॅसिडची समस्या सामान्य झाली आहे. बऱ्याच लोकांना याचा त्रास होतो. युरिक ॲसिड हा रक्तात आढळणारा विषारी घटक आहे; जो प्युरिन नावाच्या रसायनापासून वाढतो. अतिरिक्त प्युरिनयुक्त पदार्थ खाण्यामुळे शरीराला युरिक अॅसिड नष्ट करणे कठीण होते आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढत असेल, तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. जसे की, उच्च रक्तदाब, अस्वस्थ वाटणे, अस्वस्थ वाटणे, सांधेदुखी, अंगावर सूज येणे इत्यादी त्रास जाणवू लागतात. तसेच, काही वेळा किडनीचे त्रास, हृदयविकाराचा झटका यांसारखे धोकादायक आजारही होऊ शकतात. युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी औषधांची आवश्यकता असली तरी काही नैसर्गिक पद्धतींद्वारेही ते कमी करता येते. वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याविषयी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सच्या डॉ. जी. सुषमा यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ. वाढलेले युरिक ॲसिड कमी करतील 'हे' पदार्थ केळी केळीमध्ये प्युरिनचे प्रमाण खूपच कमी असते. हे फळ क जीवनसत्त्वाने समृद्ध आहे. तुम्ही आहारात केळीसारख्या कमी प्युरिनयुक्त फळांचा समावेश केल्यास तुमच्या रक्तातील युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. (हे ही वाचा : वय आणि उंचीनुसार वजन किती हवे? तुमचे वजन कमी की जास्त? परफेक्ट बॉडीसाठी एकदा ‘हा’ सोपा चार्ट पाहा ) कमी चरबीयुक्त दूध आणि दही कमी चरबीयुक्त दूध आणि कमी चरबीयुक्त दही तुमच्या युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करते. एवढेच नाही, तर ते तुमच्या शरीरातून युरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत करते. कॉफी युरिक ॲसिडची उच्च पातळी सामान्य करण्यासाठी कॉफी पिऊ शकता. हे युरिक ॲसिडचे प्रमाण कमी करू शकते. जर तुम्हाला जास्त प्रमाणात युरिक ॲसिडचा त्रास होत असेल, तर तुम्ही आहारात कॉफीचा समावेश तुम्ही करू शकता; पण त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे योग्य ठरेल. लिंबूवर्गीय फळे क जीवनसत्त्वाने समृद्ध लिंबूवर्गीय फळे युरिक ॲसिड कमी करु शकतात. त्यासाठी लिंबू, संत्रे, अननस, पपई, टोमॅटो, आवळा इत्यादी लिंबूवर्गीय फळे खा. त्यामुळे वाढलेले युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होईल. चेरी फळांमधील चेरीदेखील शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. चेरीमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात; जे युरिक अॅसिड कमी करु शकतात. हायड्रेटेड राहा युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी हायड्रेशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अपुऱ्या पाण्याच्या सेवनामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे पाण्याचा वापर वाढवणे ही प्राथमिकता असली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.