Fat Burning Drink Benefits & Recipe: जर तुम्ही सोशल मीडिया डिटॉक्स करत नसाल तर तुम्ही आतापर्यंत शरीराला डिटॉक्स करण्यासाठी व्हायरल होणारी एक रेसिपी नक्कीच पाहिली असेल. ‘फॅट्स बर्निंग’ चं एकमेव अंतिम उत्तर असा टॅग देत ही रेसिपी व्हायरल होत आहे. फिटनेस ट्रेनर नितेश सोनी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर या पेयाची रेसिपी शेअर केली आहे. त्यांच्यामते हळद, दालचिनी, काळी मिरी आणि आलं यांचं मिश्रण करून बनवलेले हे पेय तुमच्या शरीरातील फॅट्स घटवू शकतात तसेच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात असा या रेसिपीचा दावा आहे. खरंच हे पेय तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करू शकते का? असं असेल तर तुम्ही त्याचे सेवन करायला हवे का? या सगळ्या प्रश्नांवर आपण आहारतज्ज्ञांकडून उत्तर जाणून घेणार आहोत.

आरोग्य सल्लागार, आहारतज्ज्ञ, आणि मधुमेह प्रशिक्षक कनिका मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन चयापचय नियंत्रित करण्यास मदत करू शकते, तर दालचिनी रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करू शकते. काळ्या मिरीमध्ये आढळणारे पाइपरिन कर्क्युमिनला चांगले शोषून घेण्यास मदत करू शकते आणि आल्याची थर्मोजेनिक वैशिष्ट्ये चयापचय वाढवू शकतात.”

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक
Never Eat These Food Items With Tea
चहाच्या घोटासह चुकूनही खाऊ नका हे ६ पदार्थ; अचानक पोटात पित्त का वाढतं हे आहार तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
maharashtrachi hasya jatra fame rohit mane new home
Video : मुंबईत पहिलं घर, बायकोसह पूजा अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा हक्काच्या घरात गृहप्रवेश!
Aishwarya narkar avinash narkar dance on south song netizen comments viral video
“नका करत जाऊ…”, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला…
cilantro benefits and side effects
रोजच्या आहारात कोथिंबीर वापरल्याने तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? जाणून घ्या डॉक्टरांकडून…
Anant Ambani and Radhika Merchant Wedding Invitation
मराठमोळ्या अभिनेत्रीला अनंत-राधिकाच्या लग्नाचं खास आमंत्रण! व्हिडीओ शेअर दाखवली लग्नपत्रिकेची झलक, कोण आहे ती?

या पेयाचे फायदे असले तरी वजन कमी करणे हे वाटते तितके सोपे किंवा अवघड काम नाही. यासाठी संयम, सातत्य व संतुलन राखण्याची नितांत गरज असते. म्हणजे फायदा होतो म्हणून एखादं फॅट बर्निंग पेय घ्यावं पण फक्त आणि फक्त ते पेय घेतल्याने तुम्हाला एक किलोही वजन कमी करता येणार नाही. शाश्वत पद्धतीने वजन कमी करण्यासाठी आपल्याला पौष्टिक आहार, व्यायाम, पुरेशी झोप सुद्धा आवश्यक असते.

वजन कमी करण्याच्या पेयाचे फायदे व तोटे

फायदे

  • हायड्रेशन: या ड्रिंकमधील एक मुख्य घटक पाणी असल्याने हे पेय प्यायल्याने शरीराला हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
  • अँटिऑक्सिडंट पॉवरहाऊस: या पेयामध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात, जे आरोग्य सुधारू शकतात.
  • चयापचय वाढवा: आले आणि हळदीतील काही घटक चयापचय वाढवण्यास मदत करू शकतात.

तोटे

  • गैरसमजूत : हे पेय प्यायल्याने त्रास होईलच असे नाही पण यामुळे वजन कमी होऊ शकते हा गैरसमज वाढू शकतो.
  • वैयक्तिक गरजा: प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. एका व्यक्तीसाठी जे कार्य करते ते दुसऱ्यासाठी कार्य करू शकत नाही.
  • अंतर्निहित वैद्यकीय परिस्थिती: आपल्या वैद्यकीय स्थितीनुसार काही घटक विपरीत परिणाम सुद्धा करू शकतात. जसे की, हळद रक्त पातळ करू शकते, तर आले काही लोकांच्या पोटात जळजळ करू शकते.

हे ही वाचा<< २ गुलाबजाम खाल्ल्यावर कॅलरीज बर्न करण्यासाठी किती चालावं? डॉक्टरांनी सांगितलं खाणं व व्यायामाचं गणित

मल्होत्रा यांनी अधोरेखित केले की, फिटनेस ट्रेनर्सचे मार्गदर्शन व्यायाम कसा करावा यासाठी विचारात घ्यावे पण आहाराविषयी निर्णय घेताना पोषणतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. हे पेय तुम्हाला चवीला, पचनाला कदाचित मदत करू शकते पण निरोगी जीवनशैलीसाठी हा पर्याय नाही. एकूणच ही मानसिकता सुद्धा बदलायला हवी की अमुकच एखादी गोष्ट केल्याने वजन कमी होऊ शकते किंवा आरोग्य सुधारू शकते. तुमच्या एकूण जीवनशैलीतील सुधार हा तुमच्या आरोग्याला हातभार लावू शकतो.