Can Ginger Oil Burn Calories: सोशल मीडियावर अलीकडे अनेक स्वयंघोषित हेल्थ एक्सपर्ट्स व्हायरल होत असतात. या व्हायरल तज्ज्ञांचे काही सल्ले कदाचित वैध असतीलही पण त्यातील प्रत्येक दावा खरा असेलच असे नाही. असाच एक व्हायरल दावा म्हणजे आल्याच्या तेलाच्या वापराने आपण काहीच दिवसांमध्ये फॅट्स व वजन कमी करू शकता. समतोल आहारात आल्याचा समावेश करणे एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण याचा थेट वजनावर, ओटीपोटाच्या फॅट्सवर परिणाम होतो का हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. डॉ हर्ष कपूर, अध्यक्ष (पॅन मेट्रो) – इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी, जीआय सर्जरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट, मेट्रो हॉस्पिटल, नोएडा यांनी या व्हायरल ट्रेंडविषयी केलेले मार्गदर्शन जाणून घेऊया …

आल्याचे तेल वजनावर काय परिणाम करते?

समज: आल्याचे तेल पोटाचे फॅट्स कमी करून वजन कमी करण्यासही मदत करते

खरं काय: आल्याचे तेल पोटाचे फॅट्स कमी करण्यास मदत करत असल्याच्या दाव्याचे कोणतेही पुरावे नाहीत. आल्याचे गुणधर्म पाहता आल्याचे तेल किंवा जेवणातील वापर यामुळे शरीराला अँटी-इन्फ्लेमेंटरी, अँटिऑक्सिडंट सत्व मिळण्यास मदत होते. हे शरीरासाठी आवश्यक असले तरी यामुळे वजन कमी होतेच असे सिद्ध झालेले नाही.

health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Tharla tar mag new episode promo sayali Arjun found proof against mahipat got arrested
ठरलं तर मग : न्यायालयाची सुनावणी अन् महिपतला अटक; अर्जुन आणि सायलीने उघड केलं सत्य, पाहा प्रोमो

समज: आल्याच्या तेलाने पोटावर मसाज केल्याने फॅट्स कमी होऊ शकतात.

खरं काय: आल्याचे तेल पोटाच्या भागावर लावल्याने चरबी कमी होऊ शकते हा दावा सिद्ध झालेला नाही. समतोल आहार, मध्यम तीव्रतेची नियमित शारीरिक हालचाल यामुळे फॅट्स कमी होण्याचा वेग वाढू शकतो.

समज: आल्याने वजन कमी होते

खरं काय: सुदैवाने हा मुद्दा काही प्रमाणात खरा आहे. अर्थात आल्याचे तेल पोटाचे फॅट्स कमी करू शकत नाहीत. पण जर तुम्ही आल्याचा चहा, काढा, अशा पद्धतीने सेवन केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असल्याने यामुळे शरीराचे तापमान किंचित वाढू शकते परिणामी चयापचयाचा वेग वाढू शकतो यामुळे पचन सुरळीत होऊन शरीरात कॅलरी साठून राहात नाहीत आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते पण हा कोणताही जादुई उपाय नाही.

समज: आल्यामुळे शरीराची सूज कमी होऊ शकते

खरं काय: आल्याचा वापर पारंपारिकपणे पचनाचा वेग वाढवण्यासाठी होतो असे अनेक तज्ज्ञ सुचवतात. आले पाचक एंझाइमचे उत्पादन वाढवण्यास आणि एकूण पचन सुधारण्यास मदत करू शकते. तसेच यामुळे पोट फुगणे व चेहऱ्याला, शरीराला येणारी सूज कमी होऊ शकते. पण याचा थेट प्रभाव वजन कमी करण्यावर होत नाही.

समज: आल्यामुळे सेल्युलाइट्स वितळण्यास मदत होते.

खरं काय: आल्याचे तेल सेल्युलाईट काढून टाकते या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सेल्युलाईट ही एक सामान्य स्थिती आहे जी त्वचेखालील संयोजी ऊतकांमध्ये जेव्हा चरबी जमा होते तेव्हा उद्भवते. आल्याच्या तेलाचा त्वचेवर मॉइश्चरायझिंग आणि टोनिंग प्रभाव असू शकतो, परंतु ते थेट सेल्युलाईट काढून टाकू शकत नाही.

हे ही वाचा<< ‘या’ आजरांमध्ये पोहे ठरू शकतात सर्वात गुणकारी; फायदे मिळण्यासाठी कसे करावे सेवन?

निष्कर्ष: आले अप्रत्यक्षपणे पचनास मदत करून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते, परंतु यामुळे चमत्कारिक पद्धतीने वजन व फॅट्स कमी होऊ शकतील हा सडावा योग्य नाही. आरोग्य व शरीराची सुस्थिती राखण्यासाठी शिस्त असणे आवश्यक आहे.