scorecardresearch

Pregnancy Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना या सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

महिलांना लवकर गर्भवती होण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या महत्वाच्या सल्ल्यांबाबत जाणून घ्या सविस्तर

Pregnancy Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना या सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
आई होणं प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण…

आई होणं प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनामुळं आणि बदल्या जीवनशैलीमुळं महिलांना गरोदरपणात अनेक समस्यांना समोरं जावं लागतं. गर्भधारणेसाठी प्रतीक्षा करणं अनेकदा महिलांना तणावपूर्ण वाटण्याची शक्यता आहे. परंतु, जर महिलांनी गर्भधारणेसाठी व्यवस्थीत प्लानिंग केलं आणि छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांच्या घरी नक्कीच किलबिलाट सुरू होईल. महिलांना लवकर गर्भवती होण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या महत्वाच्या सल्ल्यांबाबत जाणून घ्या सविस्तर

१) महिलांनी पीरिएड सायकलवर लक्ष द्यावं

गर्भवती होण्यासाठी महिलांनी सर्वात आधी त्यांच्या पीरिएड सायकलला नीट समजून घेतलं पाहिजे. कारण योग्य वेळी शुक्राणूंचा अंडाशयात संपर्क झाल्यावर एका निरोगी बाळाला जन्म देता येईल. स्रीरोग तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सामान्य पीरिएड सायकलनुसार ओव्यूलेशनची वेळ विशेषत: पीरिएड सायकलच्या १३ व्या दिवसापासून १८ व्या दिवसांमध्ये असते. गर्भधारणेसाठी ही वेळ अत्यंत महत्वाची मानली जाते. या कालावधीत कपल्समध्ये संबंध झाल्यावर गर्भधारणेची शक्यता ९९ टक्के असते. दरम्यान, महिला मेडीकल स्टोअरमध्ये जाऊन फर्टाइल सायकलबाबत ओव्यूलेशन किट खरेदी करु करून याबाबतची माहिती मिळवू शकतात.

आणखी वाचा – ऐकावं ते नवलंच! एका वर्षापूर्वी समुद्रात पडला iphone, सापडल्यानंतर महिलेला धक्काच बसला, कारण…

२) प्रजननावेळी या गोष्टींची काळजी घ्या

ओव्यूलेशनच्या व्यतिरिक्त महिलांनी शारीरीक संबंध केल्यानंतर लगेच स्नान करण्यासाठी जाऊ नये. गर्भधारणेची प्लानिंग करताना दोघांनीही गर्भ निरोधक गोष्टींचा वापर करु नये. तसंच शारीरीक संबंध करताना कोणत्याही प्रकारचं तेल आणि क्रिम न लावण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो.

३) फोलिक अॅसिडच्या गोळ्या घ्या

महिलांनी लवकर गर्भवती होण्यासाठी त्यांनी केलेल्या नियोजनाच्या तीन महिने आधी फोलिक अॅसिडच्या गोळ्यांचं सेवन करावं. कारण यामुळं गर्भधारणेची शक्यता वाढते. फोलिक अॅसिडच्या गोळ्या ओव्यूलेशन, फर्टिलायजेशनला वाढवण्यासोबतच बाळाच्या वाढीसाठी मदत करते. तसंच डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्यानंतर या गोळ्यांचं सेवन करा.

आणखी वाचा – अबब! मच्छीमाराला सापडला ३१ किलोचा Gold Fish, २० वर्षांपूर्वी सोडला पाण्यात, त्यानंतर काय घडलं?

४) डॉक्टरांची मदत नक्की घ्या
सर्वच गोष्टींचा अवलंब केल्यानंतरही महिलांना गर्भधारणेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा ठरतो. जर एखाद्या महिलेला मासिक पाळीची अनियमितता, व्हाइट जिस्चार्ज, क्षयरोग, तसंच पोटाच्या सर्जरींसारखी समस्या असल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

५) वेळेवर आरोग्य चाचणी करा

महिलांच्या मासिक पाळीदरम्यान त्यांच्या हार्मोन्सबाबत आणि हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळं त्यांच्या फॅलोपियन ट्यूबच्या क्षमतेबाबत माहिती मिळावी. हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या तपासणीवेळी यूटरसच्या माध्यमातून एका दुर्बीनला गर्भाशयात टाकलं जातं. कारण फॅलोपियन ट्यूब फर्टिलायझेशनसाठी आवश्यक आहे.

६) दोघांचंही आरोग्य निरोगी असावं

एका निरोगी गर्भधारणेसाठी आणि बाळाच्या जन्मासाठी महिलांसोबत पुरुषांनीही तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. तसंच गर्भधारणेसाठी पुरुषांचं सीमन (वीर्य) नॉर्मल आणि हेल्दी असलं पाहिजे. जर सीमननध्ये हायड्रोसील होत असेल, तर लवकरच तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घ्या. हायड्रोसील एक असा आजार आहे, ज्यामध्ये पुरुषांच्या अंडकोषात फ्ल्यूड्स जमा व्हायला सुरुवात होते. यामुळे तु्म्हाला वेदना होत नाहीत पण शारीरीक संबंधांवर परिणाम होतो आणि हा इनफर्टिलिटीचाही कारण असू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या