Hair Care Tips : प्रत्येकाला निरोगी, चमकदार, लांबसडक केस हवे असतात. विशेषत: महिलांना केसांबाबत खूप लक्ष असतात. त्या केस नेहमी निरोगी राहावेत यासाठी खूप काही उपाय करीत असतात. मात्र, वाढते प्रदूषण आणि अस्वच्छ रसायनयुक्त पाणी अशा आजकालच्या परिस्थितीमुळे काहींना केसांसंबंधित समस्या जाणवतात. त्यामुळे कितीही काळजी घेऊनही केसांचे नुकसान होत आहे.

याच विषयावर डिजिटल क्रिएटर डॉ. बर्ग यांनी इन्स्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून काही माहिती दिली आहे. त्यांनी यात म्हटले की, केसांचे नुकसान करणाऱ्या रसायनांमध्ये क्लोरिन, फ्लोराईड, अल्कोहोल व सोडियम लॉरेन सल्फेट यांचा समावेश आहे. पण, या रसायनांमुळे होणारे केसांचे नुकसान कसे टाळावे ते जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने केस देखभाल तज्ज्ञांशी संवाद साधला.

झेनारा क्लिनिक्सच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वर्षा रेड्डी याबाबत म्हणाल्या की, क्लोरीनमुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते. त्यामुळे त्वचा आणि टाळूचे नुकसान होते आणि केसांना फाटे फुटतात. जर तुम्ही रोज क्लोरिनयुक्त पाण्यात पोहत असाल, तर त्यामुळे तुमचे केस पातळ होऊ शकतात आणि केसांचा नैसर्गिक रंगही कमी होऊ शकतो.

दुसरीकडे फ्लोराईडमुळे तुमचे केस कोरडे होऊन, त्यांची चमक कमी होऊ शकते. टाळूवर खूप जळजळ होऊ शकते. तसेच, केसांची मूळे कमकुवत होऊन केसांची वाढ रोखली जाऊ शकते किंवा ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वर्षा रेड्डी म्हणाल्या की, अल्कोहोल तुमच्या केसांसाठी वाईट नसते. पण आयसोप्रोपिल अल्कोहोलसारख्या शॉर्ट-चेन अल्कोहोलचा केशरचनेत प्रवेश होतो आणि त्यामुळे केसांतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा वाढतो,. परंतु, नारळ, पाम किंवा वनस्पती तेलांसारख्या नैसर्गिक चरबींपासून मिळवलेले लाँग-चेन अल्कोहोल जास्त सुरक्षित असते. त्यामुळे केसांना खोलवर कंडिशनिंग करता येते आणि केस गुळगुळीत, चमकदार ठेवता येतात.

“सोडियम लॉरेन सल्फेट (SLS) हे शाम्पूमध्ये एक लेदरिंग एजंट आहे. शाम्पूमधील काही घातक रसायने टाळू आणि केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकू शकतात, ज्यामुळे केस निस्तेज, कोरडे होण्याचा धोका असतो. तसेच केसगळतीची समस्या जाणवू शकते.

अशा परिस्थितीत केसांवर जमा झालेले क्लोरिन काढून टाकण्यासाठी क्लीरिफाइंग शॅम्पूचा वापर करा. केसांमधील ओलावा टिकवण्यासाठी डीप-कंडिशनिंग ट्रीटमेंट अमलात आणा. ​​पोहण्यापूर्वी आणि नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. कोरडेपणा निर्माण करणारे अल्कोहोलयुक्त केसांची देखभाल करणारी उत्पादने वापरू नका. तसेच, केसांतील कमी झालेली ओलाव्याची कमतरता भरून काढण्यासाठी लीव्ह-इन कंडिशनर किंवा हेअर मास्क वापरा, अशी माहिती डॉकट्यूबचे संस्थापक व मुख्य त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जगदीश सखिया यांनी दिली.

त्यांनी पुढे म्हटले की, एसएलएसमुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा वाढतो आणि चिडचिड होऊ शकते. सल्फेटमुक्त शॅम्पू, बॉडी वॉश व फेशियल क्लींजर्सचा वापर करा. केसांचे संतुलन कायम राखण्यासाठी नेहमी सौम्य व न्युट्रिशियन व्हॅल्यू असलेली प्रॉडक्ट्स वापरा,

रसायनांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी सोपे उपाय?

डॉ. सखिया यांच्या मते, तुम्ही केसांमधील रासायनिक घटक काढून टाकण्यासाठी क्लीअरिंग शॅम्पू वापरू शकता. तसेच केस अशा रसायनांच्या संपर्कात आल्यास लगेचच पाण्याने स्वच्छ धुवा. केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी केसांचे नियमितपणे डीप कंडिशनिंग करा. त्यासाठी तुम्ही केसांना लीव्ह-इन कंडिशनर किंवा तेल लावू शकता. केसांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही टोपी, स्कार्फ किंवा सेफ्टी कॅप वापरू शकता.

केसांमध्ये रसायन आहे हे कसे ओळखावे?

डॉ. सखिया यांनी केसांमध्ये केमिकल्स आहे हे कसे ओळखावे ते कळण्यासाठी सांगितलेली काही लक्षणे खालीलप्रमाणे :

१) कोरडेपणा : केस खूप कोरडे. ठिसूळ होतात किंवा ओलावा नसतो.

२) केस तुटणे : केस तुटणे किंवा फाटे फुटणे.

३) निस्तेज : केसांमधील नैसर्गिक चमक कमी होऊन, ते निस्तेज दिसू लागतात.

४) टाळूवर जळजळ : टाळूवर खाज सुटणे, जळजळ किंवा लालसरपणा जाणवतो.

५) पोतबदल : केसांचा पोत बदलतो, ज्यामुळे ते जास्त भुरभुरीत आणि राठ दिसू लागतात.

जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर तुम्ही केस देखभाल तज्ज्ञांचा सल्ला घ्या.