scorecardresearch

Premium

थंड की गरम, केस धुण्यासाठी कोणते पाणी योग्य? ते आठवड्यातून किती वेळा धुवावे? जाणून घ्या, काय करावे, काय नाही?

गरम पाण्याने केस धुत आहात? असे करत असाल तर आताच थांबा! जाणून घ्या केस धुण्यासाठी थंड पाणी वापरावे की गरम?

hair wash
केस गरम पाण्याने धुवावे की थंड?( photo – freepik)

तुमच्या केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी चांगले केस उत्पादने वापरून नियमित केस धूणे आवश्यक असते. केसांची काळजी घेताना काही सामान्य प्रश्न मनात येत असतात, ज्याबाबत आपण संभ्रमात असतो, जसे की, ”आपले केस किती वेळा धुतले पाहिजे, केस धुण्यासाठी कोणता शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे योग्य आहे, तुमच्या केसांसाठी कोणता हेअर मास्क वापरावा आणि चांगल्या केसांसाठी तुमचा आहार कसा असावा?” या सर्व प्रश्नांप्रमाणेच आणखी एक प्रश्न नेहमी मनात येतो की, तुम्ही केस थंड पाण्याने धुतले पाहिजेत की गरम, तुमच्या मनातही हा प्रश्न निर्माण होत असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ(consultant dermatologist) वंदना पंजाबी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या महितीनुसार, ”केस धुण्यासाठी गरम पाणी वापरणे अत्यंत हानीकारक ठरू शकते, कारण ते केसांचे निर्जलीकरण करते आणि त्यांना रुक्ष, कोरडे आणि कमकुवत करते. गरम पाण्यामुळे केसांची मुळेदेखील खराब होतात, त्यामुळे ते फुटतात. दुसरीकडे, थंड पाणी केसांसाठी सर्वोत्कृष्ट आहे, कारण ते केसांच्या मुळांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहचवत नाही आणि त्याऐवजी त्यांची देखभाल करते. थंड पाणी प्रत्येकासाठी सोयीस्कर नसल्यामुळे, ते कोमट वापरू शकतात. पण गरम पाणी नक्कीच वापरू नये.”

four couple yoga pose to stay fit together
Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा
marathon, medical tests, running, precautions, Health, marathi news,
Health Special: मॅरेथॉन धावताय? तर या टेस्ट केल्या आहेत का? (भाग १)
how to incorporate almonds in your diet tips
बदाम केवळ बुद्धी तल्लख करण्यासाठी नव्हे, तर पदार्थांची चव वाढवत, उत्तम आरोग्यासाठी खा! कसे ते पाहा
moringa benefits
शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर कमी होते? मधुमेहींसाठी खरंच ठरते वरदान? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

याबाबत, सौंदर्यशास्त्रसंबंधी त्वचाशास्त्रज्ञ आणि ओपरा अस्टेटिक्सच्या संस्थापक, डॉ. आकांक्षा संघवी, यांचे मत थोडे वेगळे आहे. त्यांच्या मते, ”केस गरम पाण्यानेच धुतले पाहिजेत. केस धुताना सुरुवातीला गरम किंवा कोमट पाणी वापरल्यास केसांची मुळे उघडतात. टाळू व केसांचा तेलकटपणा काढून टाकण्यासाठी शॅम्पू प्रभावीपणे काम करण्यास मदत करतात. पण शॅम्पू केल्यानंतर थंड किंवा साधे पाणी वापरणे आवश्यक असते जेणेकरून केसांवरील कंडिशनर किंवा हेअरमास्क व्यवस्थित धुतला जाईल आणि केसांच्या मुळांना पुन्हा बंद होण्यास मदत होईल त्यामुळे त्यांचा ओलावा टिकून राहील आणि रुक्षपणा कमी होईल आणि तुमच्या केसांना चांगली चमक येईल. ”

हेही वाचा : सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

डॉ.संघवी यांनी केसांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार केस किती वेळा धुतले पाहिजेत? याबाबत माहिती दिली आहे.

 • तेलकट केस (Oily hair):
  तेलकट केस रोज धुणे सुरक्षित आहे, त्यामुळे तुमच्या टाळूवरील बुरशीजन्य त्वचासंसर्ग कमी करतो. तसेच केसांमधील कोंडा कमी करतो पण जेव्हा तुम्ही तेलकट केस धुता तेव्हा पीएच बॅलन्स करणारा शॅम्पू व केसांच्या टोकांना कंडिशनर वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
 • शुष्क किंवा कोरडे केस (Frizzy hair):
  काही लोकांचे केस जन्मत:च कोरडे असतात तर काही लोकांचे केस रंगविल्यामुळे किंवा स्ट्रेटनिंग करण्यामुळे खराब होतात. कोरडे केस सल्फेट फ्री शॅम्पूने आठवड्यातून दोनदा धुतले पाहिजे. हा शॅम्पू केसांच्या नैसर्गिक तेलाचे संरक्षण करतो आणि केस आणखी कोरडे होणे टाळतो. केसांना शॅम्पू केल्यानंतर प्रत्येक वेळी हेअर मास्क वापरा, जो केसांना नैसर्गिक तेल पुरवितो आणि केसांना पोषण करण्यासाठी त्यांचा अर्क मागे सोडतो.
 • कुरळे केस (Curly hair)
  कुरळ्या केसांना सुळसुळीत आणि हायड्रेट ठेवण्यासाठी खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कुरळ्या केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास केसांचा खूप गुंता होऊ शकतो आणि दिवसभर त्यांना सांभळणे कठीण होऊ शकते. कुरळ्या केसांना सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूने आणि चांगला हायड्रेटिंग कंडिशनर वापरून आठवड्यातून दोन-तीन वेळा धुतले पाहिजे. कुरळ्या केसांना खूप ओलावा पुरविण्याची गरज असते. को-वॉशिंग ही कुरळे केस असलेल्यांनी आत्मसात केलेली अत्यंत चांगली पद्धत आहे. को-वॉशिंग ही पद्धत तेव्हा वापरली जाते जेव्हा तुम्हाला आठवड्याच्या मध्यंतरी कुरळे केस धुण्याची गरज असते पण शॅम्पू वापरून तुम्हाला केस कोरडे करायचे नसतात. को-वॉशिंग म्हणजे केस धुण्यासाठी तुमच्या हेअर कंडिशनरचा वापर करणे. ही पद्धत त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्याने त्यांचे कुरळे केस दररोज न धुता ओले आणि सुळसुळीत ठेवायचे आहेत. कुरळे केस धुतल्यानंतर आणि कंडिशनर वापरल्यानंतर त्यांना शिया बटर आणि कोकोआ बटरने समृद्ध असलेले curl cream किंवा a leave-in conditioner वापरणे आवश्यक आहे.

हेही वाचा : खाण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवा ‘हे’ पाच पदार्थ, आरोग्यासाठी मिळतील अनेक फायदे

केस धुतल्यानंतर केली जाणारी सर्वात मोठी चूक कोणती?

केस धुतल्यानंतर ओल्या केसांना साध्या ब्रशने किंवा लहान दातांच्या कंगव्याने विंचरणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते, कारण असे केल्यामुळे तुमचे ओले केस तुटू शकतात. केस तुटू नयेत यासाठी मोठ्या दातांचा कंगवा किंवा लवचीक दात असलेला गुंता सोडविणारा ब्रश वापरण्याचा सल्ला दिला जातो. हेअर मास्क लावल्यानंतर केस धुतांना गुंता सोडविण्यासाठी आणि कंडिशनर सर्वत्र व्यवस्थित लावण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. जाड केसांसाठी हा कंगवा उत्तम प्रकारे काम करतो.

केस धुताना काय करावे आणि काय करू नये?

 • काय करावे: आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केस धुवावेत.
 • काय करू नये: केसांसाठी कठोर शॅम्पू आणि कंडिशनर वापरू नये.
 • काय करावे: केस धुण्याआधी विंचरावेत.
 • काय करू नये: ओले केस बांधू नये.
 • काय करावे: शॅम्पू लावल्यानंतर ताबडतोब धुऊन टाका ( अपवाद: फक्त अँटी डँड्रफ शॅम्पू एक मिनिट केसांना लावून ठेवावा)
 • काय करू नये: केस धुताना तुमच्या टाळूला नखांनी ओरखडू नका
 • काय करावे: टाळूसाठी दातेरी स्कॅल्प स्क्रॅबल वापरा
 • काय करू नका : ओले केस टॉवेलने जोरात पूसू नका
 • काय करावे: केसांना सुकविण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता.
 • काय करू नये: केसांसाठी अतिप्रमाणात शॅम्पू वापरू नका.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hair care tips hot or cold water how you should wash your hair with how many times it should wash in week snk

First published on: 05-05-2023 at 13:44 IST

संबंधित बातम्या

×