White Butter Eating : शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक चांगले कोलेस्ट्रॉल असते; तर एक खराब कोलेस्ट्रॉल असते. जर न्युट्रिशन तज्ज्ञांचा सल्ला घेतला, तर पांढरे लोणी खाणे कधीही थांवबू नये. तुम्हाला वाटेल, असे का? पांढरे लोणी खाण्याचे फायदे कोणते? दी इंडियन एक्स्प्रेसने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

न्युट्रिशनिस्ट डॉ. शिल्पा अरोरा सांगतात, “मी दररोज पांढरे लोणी खाते. तुम्ही वजन वाढण्याच्या भीतीने पांढरे लोणी खाणे बंद केले आहे का? पुन्हा एकदा विचार करा. पांढऱ्या लोण्यामध्ये आयोडीन असते; जे थायरॉइड हार्मोन्स संतुलित ठेवण्यास आणि चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि इतर फॅट्स कमी करणाऱ्या पोषक घटकांमुळे पांढरे लोणी फायदेशीर ठरते. “दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले पांढरे लोणी चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) सुधारण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते. मी पांढरे लोणी नियमित खाते, तुम्हीही खा आणि पांढऱ्या लोण्याचे आरोग्यदायी फायदे घ्या,” असे डॉ. अरोरा आवर्जून सांगतात

हेही वाचा : Masaba Gupta: मसाबा गुप्ता तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी ‘अशा प्रकारे’ खाते पोळी; पण हे खरंच फायदेशीर ठरते का? आहारतज्ज्ञ म्हणतात की…

आपण पांढरे लोणी का खावे ते जाणून घेऊ…

अहमदाबाद येथील झायडस रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के. भारद्वाज सांगतात, “पांढरे लोणी, ज्याला आपण घरगुती किंवा अनसॉल्टेड लोणी, असेही म्हणतो. ते अनेकदा विकत आणलेल्या लोण्यापेक्षा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सदेखील असतात; जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.”

भारद्वाज पुढे सांगतात, “पांढऱ्या लोण्याचा चांगल्या कोलेस्ट्रॉलवर (एचडीएल) परिणाम होतो . काही अभ्यासानुसार, लोण्यामधील फॅट्स चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल ) वाढवू शकतात.”

आर्टेमिस हॉस्पिटल्सच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी युनिटप्रमुख डॉ. पवन रावल यांनी सांगितल्यानुसार पांढऱ्या लोण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

  • इतर लोण्याच्या तुलनेत पांढऱ्या लोण्यामध्ये जास्त स्मोक पॉईंट असतो आणि त्यामुळे ते स्वयंपाकासाठी उत्तम असते.
  • पांढऱ्या लोण्यामध्ये कमीत कमी लॅक्टोज आणि केसिन असतात; ज्यामुळे ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
  • पांढऱ्या लोण्यामध्ये फॅट्स कमी करणारे ए, डी ई व के हे व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात दिसून येतात; जे रोगप्रतिकार शक्ती, स्नायू मजबूत ठेवण्यास व डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, असे डॉ. रावल सांगतात.

हेही वाचा : Dinner & Breakfast Timing : रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता कधी करावा? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

ज्या लोकांना शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारायची आहे किंवा नियंत्रित ठेवायची आहे, त्यांनी संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, सुक्या मेवाचे सेवन करणे इत्यादी गोष्टींद्वारे निरोगी फॅट्सवर लक्ष केंद्रित करावे.
“अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, एकूण फॅट्सचे सेवन आपल्या एकूण कॅलरीजच्या सहा टक्क्यांपेक्षा कमी असावे. त्यामुळे घरी बनवलेले पांढरे लोणी वापरा; पण आपल्या शरीराच्या ठेवणीकडे लक्ष द्या”, असे भारद्वाज सांगतात.

त्याशिवाय पांढरे लोण्याचे फायदे मिळविण्यासाठी तुम्ही नेहमी चांगल्या गुणवत्तेचे पांढरे लोणी खाताय का याची खात्री करा, असेही डॉ. रावल बजावून सांगता