पास्ता! नुसत्या नावाने डोळ्यांसमोर वाफाळलेली मस्त डिश येते. गरमागरम पास्ता व त्याबरोबर हवा असलेला साॅस आणि भाज्या किंवा चिकनचे पीसेस, हवा तर तिखट, हवा तर गोडसर असा आपल्याला पाहिजे तस्सा पास्ता तयार करता येतो. परंतु, पास्ता खाण्यातील सर्वांत सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे पोटफुगी व अपचनाचा त्रास. परंतु, एक महत्त्वाचा मुद्दा जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो, पास्ता खाऊनही चांगलं पचन होऊ शकते. हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे! तज्ज्ञ सांगतात की, जर अशा प्रकारे तुम्ही पास्त्याचं सेवन केलेत, तर तुम्हाला नंतर पचनासंबंधीच्या समस्यांचा त्रास होणार नाही. तुम्हालाही जर वजन कमी करायचं असेल, तर पास्त्याचं या प्रकारे सेवन करा. पास्ता हा कार्बोहायड्रेटने समृद्ध आहार आहे, जो प्रामुख्यानं पीठ, लोणी व चीजपासून बनवला जातो. ज्यांना वजनावर नियंत्रण ठेवायचेय आणि मधुमेही यांच्यासाठी पास्ता खाणं योग्य नाही. मात्र, एका विशिष्ट प्रकारे पास्त्याचं सेवन तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. व्हीहेल्थ बाय एटना येथील वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. विधी धिंग्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
पास्त्याचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स मधुमेह आणि वजन वाढण्याचा धोका वाढवतो; परंतु जर तुम्ही तो शिजवला आणि थंड झाल्यावर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला, तर तो तुम्ही खाऊ शकता. “पास्ता शिजवून कमीत कमी ७-८ तास थंड केल्यानं तो खूप निरोगी आणि एकूण आरोग्यासाठी चांगला बनू शकतो! त्यामुळे त्यातील प्रतिरोधक स्टार्च वाढतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर आहे!
मुंबईस्थित पोषणतज्ज्ञ दीपशिखा जैन यांच्या मते, अशा प्रकारे पास्त्याचं सेवन केल्यानं डिशची एकूण कॅलरीजची संख्या ३०-५० टक्के कमी होते. तसेच, यामुळे फायबरचे प्रमाणदेखील वाढते. याद्वारे मधुमेही आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी तो अन्नाचा एक उत्तम स्रोत ठरतो. जर तुम्हाला वजन वाढू द्यायचे नसेल, तर शिजवण्यापूर्वी उकडलेला पास्ता थंड करणे गरजेचे आहे. पोषणतज्ज्ञ दीपशिखा जैन यांच्या मते, पास्ता ७-८ तास उकळवा आणि थंड करा. जेव्हा तुम्ही पास्ता शिजविल्यानंतर थंड करता तेव्हा तुमच्या आतड्यांतील जीवाणू काढून टाकण्यास मदत मिळते. ही कृती पास्त्याला तुमच्या आतड्यांच्या हालचाली आणि एकंदरीत आरोग्यासाठी परिपूर्ण बनवते. इतकेच नाही, तर थंड केलेल्या पास्त्यामधील प्रतिरोधक स्टार्च त्याच्यामधल्या कॅलरीजमध्ये ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घट करू शकतो, ज्यामुळे फायबरचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेही किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते एक उत्तम अन्न बनते.
पास्त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?
खनिजांच्या शोषणाची क्षमता सुधारते आणि यकृताचे कार्य वाढते. त्यामुळे मधुमेह, इन्सुलिन प्रतिरोध, लठ्ठपणा, चयापचय सिंड्रोम, आतड्यांचे आरोग्य व रोगप्रतिकार शक्तीसाठी ते फायदेशीर ठरते. जर आपण हे पदार्थ कमी प्रमाणात समाविष्ट केले आणि स्वयंपाकानंतर थंड करण्याचा नियम वापरला, तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. थंड केलेल्या पास्त्यात ताज्या शिजवलेल्या पास्त्याच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण असते. प्रतिरोधक स्टार्च आतड्यांचे आरोग्य वाढविण्यास मदत करतो, म्हणजेच बद्धकोष्ठतेची पातळी कमी करण्यास मदत करणारे चांगले जीवाणू वाढवतो. त्यामुळे शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमतादेखील सुधारते. त्यासोबत टाईप २ मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो,” असे आयथ्राईव्हच्या सीईओ व संस्थापक मुग्धा प्रधान म्हणाल्या.