Diabetes Diet: डायबिटीज एक असा क्रोनिक आजार आहे ज्याने जगभरात ४०० मिलियनहुन अधिक लोक त्रस्त आहेत. डायबिटिजवर नियंत्रणासाठी जीवनशैलीसह आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. तणावग्रस्त जीवनशैली, आहारात अनियमितता यामुळे डायबिटीज बळावण्याचा धोका असतो. नॅशनल लायब्रबरी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, डायबिटीजच्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या (2.3%) ही महिलांच्या तुलनेत (1.4%) अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात २०२५ पर्यंत डायबिटीजच्या रुग्णांमध्ये १७० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. डायबिटीज रुग्णांना ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. असाच एक पदार्थ म्हणजे मसुरची डाळ.

मसुराची डाळ ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते का? (How Masoor Dal Controls Blood Sugar)

जनरल फिजिशियन डॉ पाखी शर्मा यांनी phablecare वर प्रकाशित एका लेखात सांगितले की, डायबिटीजच्या रुग्णांना मसूर डाळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. मसूरची डाळ ब्लड शुगर नियंत्रणासाठी सर्वात गुणकारी मानली जाते.हेल्थलाईन च्या माहितीनुसार, मसूर डाळीत ग्लायसेमिक इंडेक्स सर्वात कमी म्हणजे फक्त २५ इतकाच असतो. तसेच ही डाळ प्रोटीन व फायबरचा साठा मानली जाते. फायबर युक्त डाळींचे सेवन हे डायबिटीजसह किडनीच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त मानले जाते.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

हे ही वाचा<< डायबिटीजच्या रुग्णांनी ‘या’ पद्धतीने काजू खाणे ठरू शकते वरदान; ब्लड शुगर नियंत्रण होईल सोपे

दुसरीकडे, मसूरच्या डाळीत मुबलक अँटी ऑक्सिडंट्स असतात. तसेच ही डाळ गरम असल्याने थंडीच्या दिवसात ,मसुराची डाळ शरीराचे तापमान स्थिर ठेवते. या डाळीच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. तसेच पॅनक्रियाजच्या पेशींना सुरक्षित ठेवण्यासाठी ही डाळ उपयुक्त ठरू शकते.

मसूरच्या डाळीचे फायदे (Health benefits of Masoor Dal)

मसूरच्या डाळीत प्रोटीनचा साठा मुबलक असतो ज्यामुळे मांसपेशी व हाडांना मजबुती मिळू शकते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी मसूर ब्लड शुगर करण्यात मदत करतात.
फायबरयुक्त मसूरडाळ पचनप्रक्रिया वेगवान करण्यास मदत करते.
मसूर डाळीत कमी फॅट्स असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास सुद्धा मदत होते

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)