तोंडातून दुर्गंधी येणे किंवा श्वासाचा घाणेरडा वास येणे या समस्येचा जगातील अनेक लोक सामना करत आहेत. ही सामान्य समस्या असली तरी अनेकांना रोज याचा सामना करावा लागतो. या दुर्गंधीचा केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर समोरच्या व्यक्तीलाही त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेकदा लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. या दुर्गंधीमुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व कमजोर होते त्याचा परिणाम त्याच्या जीवनमानावरही होतो. तोंडातील दुर्गंधीमागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यासाठी पायोरिया हा दातांचा प्रमुख आजार किंवा इतरही अनेक गोष्टी कारणीभूत ठरु शकतात. मात्र दुर्गंधीची ही समस्या दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय सोपा उपाय शोधून काढला आहे.
डेलीमेलच्या बातमीनुसार शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, तोंडातील दुर्गंधीमुळे त्रासलेल्या व्यक्तीने प्रोबायोटिक्सचा वापर केल्यास तोंडातून येणारा दुर्गंध कायमचा कमी होईल. कारण जेव्हा तोंडात बॅक्टेरिया जमा होतात, तेव्हा दात, हिरड्या किंवा जिभेमध्ये अनेक घाणेरडे चिकट पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे तोंडातून खूप तीव्र दुर्गंधी येते. यामुळे जीभेवर जमा झालेले प्रोटीनचे अणु तोटू लागतात ज्यामुळे अतिरिक्त दुर्गंधी केमिकल तयार होतात.
यासाठी एक प्रकारचा प्रोटीन जबाबदार आहे. हा प्रोटीन बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानंतर तुटू लागतो आणि एक सल्फ्यूरिक कंपाउंड तयार होते. हे सल्फ्यूरिक कंपाऊंड अतिशय दुर्गंधीयुक्त असतात. जेव्हा बॅक्टेरिया तोंडात सर्वत्र घर करतात तेव्हा ते आपले अवशेष तोंडात दात, हिरड्या, जीभ इत्यादींवर सोडू लागतात आणि प्लेक म्हणजेच घाणेरडा चिकट पदार्थ तोंडात जमा होऊ लागतो. त्यामुळे अनेक दुर्गंधीयुक्त केमिकलही साचू लागतात. हे जिभेवर असलेले प्रोटीनचे रेणू तोडून अतिरिक्त दुर्गंधीयुक्त केमिकल तयार करू लागतात.
आंबलेल्या पदार्थांमुळे होते दुर्गंधी कमी
एका अभ्यासातून समोर आले आहे की, प्रोबायोटिक्समध्ये असलेले बॅक्टेरिया हानिकारक बॅक्टेरियापासून संरक्षण करतात. यात आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते. कारण आंबलेल्या पदार्थांमध्ये असे काही घटक असतात जे तोंडातील दुर्गंधी दूर करतात. यात ताक, दही, लोणचे, कोंबूचा, किमची, कल्चर्ड मिल्क. व्हिनेगर इत्यादींचा समावेश आहे. पण तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथवॉश, च्युइंग गम यांसारखे काही प्रोडक्ट आहेत. पण यामुळे तात्पुरती दुर्गंधी दूर होते. चीनमधील सिचुआन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, प्रोबायोटिक्स तोंडातील दुर्गंधीसाठी जबाबदार प्रोटीन नष्ट करतात, हे प्रोटीन्स वाईट बॅक्टेरियामुळे तयार होते. दरम्यान पुदिना आणि तुळशीच्या पानांमुळेही तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास मदत होते.