दिवाळी आली! नुसत्या या शब्दांनीच मनात उत्साह संचारतो. सगळ्यांची लगबग सुरू होते, प्रत्यक्ष आणि सोशल मीडियावरसुद्धा! गणेशोत्सव, नवरात्र जसे घरोघरी साजरे केले जातात तसेच ते सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साजरे होतात. ते संपून दोन आठवड्यांमध्येच दिवाळी येते आणि अक्षरशः दिव्यांची आणि रंगांची उधळण सर्वत्र दिसून येते.

दिवाळी हा सण मनाची मरगळ झटकून टाकणारा सण आहे! ‘यंदा दिवाळीमध्ये मला नक्की स्कूटर खरेदी करायची आहे’, ‘दिवाळीच्या पाडव्याला यंदा मी नवे मंगळसूत्र करणार आहे’, ‘या वर्षी मला दिवाळी पहाट कार्यक्रमाला मला जायचे आहे, ‘खूप दिवसांपासून मुलगी नवीन फोन मागते आहे, नक्की घेऊया’! प्रत्येकाचे काही ना काही प्लॅनिंग सुरू होते! बरे, प्रत्येक पिढीच्या दिवाळी साजरे करण्याच्या कल्पना भले भिन्न असतील, पण एकट्या दुकट्याने नाही तर, भावंडांबरोबर, नातेवाईकांबरोबर, मित्रपरिवारासोबत दिवाळी साजरी करायची हे मात्र नक्की असते.

Belly fats how to burn belly fat using 5 20 30 method know from expert
Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत
Why extreme heat can trigger headaches
अतिउष्णतेमुळे डोकेदुखी का होते? तज्ज्ञांनी सांगितले कारण अन् उपाय
what happens to blood sugar levels when you walk after a meal
जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
How exactly does insulin work hldc
Health Special: इन्सुलिनचं कार्य नेमकं कसं चालतं?

आणखी वाचा-Health Special: इन्सुलिनचं कार्य नेमकं कसं चालतं?

घरोघरी दिवाळीच्या वेगवेगळ्या कथा कहाण्या असतात. ‘तुम्ही काय आळशी आहात! आम्ही ३.३०-४ वाजता उठून, उटणे, सुगंधी तेल चोपडून अभ्यंग स्नान करून ५ वाजता फटाक्यांची पहिली माळ लावायचो! सगळी गल्ली खाली उतरायची! मग फराळ! अहाहा! चार दिवस नुसता चिवडा, चकल्या,लाडू,करंज्यांवर ताव मारायचो आम्ही! डाएटची वेडं नव्हती तेव्हा!’ असे म्हणणारे आई बाबा घरात असतात. त्याच बरोबर मित्र मंडळींबरोबर एकत्र जमून खानपान कार्यक्रमाचे प्लॅनिंग तरुण पिढी करत असते. हॉस्टेलवर राहणारे घरून डबे भरभरून न्यायचे हे मनात पक्के ठरवूनच घरी येतात. नव्याने नोकरी लागलेले घरच्यांना आणि त्याबरोबरीने आपल्या खास मैत्रिणीला किंवा मित्राला काय गिफ्ट द्यायचे हे ठरवण्यात आणि त्यासाठी ऑनलाइन शॉपिंग साइट्स शोधण्यात मग्न होतात!

सोशल मीडियावर तर मेसेजेसची झुंबड उडते! पौराणिक कथा काय, फराळाच्या पदार्थांच्या पाककृती काय, दिवाळीच्या मौजमजेची वर्णने काय, आणि बरेच काही! विनोदांना तर उधाण येते! फोटो, ग्रीटिंग्स तर वेगळीच! वेळ कमी पडावा इतका सोशल मीडिया बहरलेला असतो!

एक वेगळाच उत्साह सगळ्यांच्या मनात आणि अंगात संचारतो. वर्षभरात कधीही मदत न करणारी मुले आईवडिलांना घरच्या साफसफाईत हातभार लावतात. दिवाळीच्या निमित्ताने नवे फर्निचर, नवा टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह घेण्याची, त्यासाठी अधिकाधिक सूट कुठे मिळते आहे हे पाहण्याची धावपळ सुरू होते. नवीन वस्तू, नवीन उपकरण, नवीन सुखसोयी सगळे दिवाळीच्या निमित्ताने! घराला नवा रंग, नवीन पडदे दिवाळीच्या निमित्ताने!

आणखी वाचा-Health Special: डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे काय?

दिवाळी जणू आपल्याला आमूलाग्र बदलून टाकते! वर्षभराचा ताण, मनातली टेंशन्स, घरातल्या अडचणी, मुलांचे यश-अपयश, संसाराच्या कटकटी, आर्थिक विवंचना सगळे काही दिवसांकरता बासनात गुंडाळून ठेवले जाते आणि आपले मन जणू नवा साज घेते. जणू प्रत्येकजण आपल्या मनाची साफसफाई करत असतो. मनामध्ये असलेली, जमा झालेली धूळ,जळमटे दूर करण्याचे काम दिवाळी करते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने शरीर जसे नितळ, स्वच्छ, सुगंधी बनते; तसेच जणू काही दिवाळीच्या वातावरणामुळे मनही निर्मळ आणि स्वच्छ सुगंधी बनते. पहाटे पहाटे आणि सांजवेळी सर्वत्र पणत्या, दिवे, दिव्यांच्या माळा, आकाश कंदील यांनी परिसर उजळून निघतो; तसाच मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यातला निराशेचा, दुःखाचा, चिंतेचा अंधार नाहीसा होतो. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज यांच्या निमित्ताने कुटुंबे एकमेकांना भेटतात. भावंडे एकत्र येतात, गोडाधोडाचे जेवण होते, गप्पांचे फड रंगतात आणि त्यातच सुखदुःखांचे वाटप होते. काही कारणाने थोड्याशा मागे पडलेल्या भावंडाला, दुःखात असलेल्या मित्राला इतरांचा आधार मिळतो आणि मनाला उभारी मिळते. दिवाळीचे चार दिवस कसे संपतात ते कळत नाही. सुंदर अशा दीप्तीयुक्त वातावरणामध्ये रंगीबेरंगी आकाश कंदील, दिव्यांच्या माळा, नटलेले सजलेले लोक, भरलेल्या बाजारपेठा, चविष्ट फराळाचे पदार्थ या सगळ्यांनी इंद्रिये तृप्त होतात! असे उत्साहाचे वातावरण आणि हसत खेळत झालेल्या आप्तेष्टांच्या भेटी यामुळे मनही तृप्त होते!

आणखी वाचा-Health Special : आर्थरायटिसवर काय उपचार असतात?

अगदी मनोविकारग्रस्त असलेल्यांना सुद्धा एक उत्साह, आशा, समूहाचा एक भाग बनण्याची संधी, इतरांमध्ये मिळून मिसळून जाण्याची संधी दिवाळीमधून मिळते. विशेष गरजा असलेली मुले, तीव्र मनोविकारग्रस्त रुग्ण यांच्या संस्थांमध्ये सुद्धा दिवाळीची लगबग असते. विविध भेट वस्तू बनवणे, पणत्या रंगवणे, त्यांची विक्री करणे, करमणुकीचे कार्यक्रम बसवणे व सादर करणे, मनपसंत कपडे, खाऊ पिऊ अशा सगळ्या गोष्टींनी संस्थांमध्ये वातावरण उत्साहमय बनते. स्मृतिभ्रंशासारख्या, स्किझोफ्रेनियासारख्या तीव्र मानसिक विकारग्रस्त रुग्णांची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांसाठी सुद्धा दिवाळी हा सण उत्साह देणारा, इतरांमध्ये सामावून जाण्यासाठी संधी देणारा, काळजी वहनाच्या कामामधून थोडासा दिलासा देणारा ठरतो!

अशी ही दिवाळी मनस्वास्थ्य वृद्धिंगत करणारी, मानसिक संतुलन टिकवणारी, एकमेकांच्या आधाराने परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ देणारी, आशादायी आणि उत्साहवर्धक! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Story img Loader