scorecardresearch

Premium

Health Special: स्निग्ध पदार्थांचे शरीरातील कार्य काय?

तेल भरपूर तरी वापरायचे किंवा मग पूर्ण बंद तरी करायचे असे दोन प्रकार समाजात पाहायला मिळतात. खरे तर स्निग्ध पदार्थांचा वापर जपून करायला हवा…

health oil fats
आयुष्यातील स्नग्ध पदार्थांचे महत्त्व एकदा समजून घ्यायला हवे

फॅट्स म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी ज्यामुळे वाढलेले वजन लक्षात येते. पण आहार शास्त्रातील फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ; म्हणजेच आहारातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक! १ ग्रॅम फॅट्स शरीराला ९ कॅलरी इतकी ऊर्जा देतात. म्हणजेच प्रथिने किंवा कर्बोदकापेक्षा जास्त. पूर्वापार कालबाह्य ठरविल्या गेलेल्या स्निग्ध पदार्थांचे महत्त्व आयुर्वेद आणि भारतीय आहारशास्त्र कायमच अधोरेखित करत आले आहे.

आणखी वाचा : Health Special: सोरियासिस टाळण्यासाठी काय करावे?

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

पण स्निग्ध पदार्थ नक्की काय करतात? म्हणजेच त्याचे काम काय?

१. शरीरातील पेशींचे सरंक्षण करणे.
२. पेशींभोवती सरंक्षण कवच तयार करणे.
३. जीवनसत्त्व शोषनू घेणे.
४. शरीरातील पेशींचे काम सुरळीत करणे.
५. अनेक ग्रंथी आणि त्यामार्फत शरीरात होणारी कार्ये सलुभ पार पाडणे.

आणखी वाचा : Health special: ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसा झोपणे योग्य!

खरं तर स्निग्ध पदार्थांचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत.
साठून राहणारे, न साठून राहणारे . ( saturated aani unsaturated ) आणि ट्रान्स फॅट्स
नावाप्रमाणेच आकारमानात जड असणारे सॅच्युरेटेड फॅट्स शरीरात साठून राहतात. मुख्यत्वे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठी कारणीभतू ठरतात. आणि ट्रान्स फॅट्स देखील शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवितात. सर्व प्रकारच्या प्राणिजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण सर्वाधि क असते. तसेच बेकरी पदार्थ, बिस्किटे, केक, आईस्क्रीम, वनस्पती तूप, डालडा, चीज, बटर यात सर्वाधिक प्रमाणात
दोन्ही अपायकारक स्निग्ध पदार्थ आढळून येतात. नेहमीच्या आहारात पाच टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात वरीलपैकी दोन्ही स्निग्ध पदार्थ असल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी वाढू शकते. याच्या नेमके उलट आपल्याला आवश्यक असतात ते न साठून राहणारे स्निग्ध पदार्थ अर्थात अनसॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थ.

आणखी वाचा : Health special: निरोगी आयुष्यासाठी मीठ किती खावे? किती खावू नये?

योग्य प्रमाणात अनसॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास कोलेस्टेरॉल प्रमाणात राखले जाऊ शकते. अनसॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थांचे मोनो अनसॅच्युरेटेड स्निग्धांश आणि पॉली अनसॅच्युरेटेड स्निग्धांश असे प्रकार असतात. या दोघांची ‘मोनोपोली’ आहे असंच म्हणूया! नेहमीच्या आहारात २-४ चमचे तेल किंवा फॅट्सची शरीराला आवश्यकता असते. आणि मोनोपोली जोडगोळी शरीरातील अनेक ग्रंथी आणि त्यातून स्त्रवणारे हार्मोन्स यांच संतुलन राखतात. मोनोपोली मुळे शरीरातील ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स या स्न ग्धाम्लांचे प्रमाण सुरळीत राखले जाते. म्हणजे काय तर शरीरात विविध अवयवांमध्ये योग्य स्निग्धता राखली जाते. मेंदूला खुराक, तजेलदार बुद्धी, स्नायूंचं वंगण, हृदयाची योग्य काळजी, स्त्रियांमधील हार्मोन्सचे सत्रूधार, चयापचय क्रियेचे उत्साही पोषणमूल्य फॅट्स अर्थात स्निग्ध पदार्थ आहेत.

शरीराला योग्य स्निग्ध पदार्थ मिळावेत म्हणून काय खावे, हे जाणून घेवूया.
तेल : तेलेबिया आणि त्यापासून तयार करण्यात आलेले तेल, तूप, मोहरीचे तेल, तिळाचे तेल इत्यादी.
तेलबिया: जवस, भोपळ्याच्या बिया, सर्यूफुलाच्या बि या, तीळ, कलिंगडाच्या बिया
मासे: पापलेट, राणी मासा, कटला, बांगडा इ.
तूप आणि तेल याबद्दल अनेक वेळा सरसकट बंदी आणली जाते. ज्यामुळे शरीरातील हार्मोन्सच्या कार्यात बाधा येऊ शकते. जीवनसत्त्व अ, क, ड, इ यांचं आणि स्निग्ध पदार्थांचे सख्य आहे. शरीरातील या चौकुटाच अस्तित्व शरीरातील स्निग्ध पदार्थांवर अवलंबून आहे. म्हणूनच ‘नो फॅट्स’ तत्त्वामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होणे, निरुत्साह तयार होणे, सांधेदुखी असे विपरीत परिणाम होतात. वजन कमी करण्यासाठीचे टोकाचे निर्णय म्हणनू अतिस्निग्ध पदार्थ किंवा शून्य स्निग्ध पदार्थ असे दोन प्रकार प्रचलित आहेत. परंतु, वैज्ञानिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीला तब्येतीच्या तक्रारी असल्याशिवाय यापैकी कोणतीही पद्धत पाळण्याची आवश्यकता नाही.
ज्याना अर्धशिर्धशिशी किंवा मेंदूचे विकार असतील त्यांनी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्यांच्या देखरेखीखाली आहारात कीटो किंवा अतिस्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढवून त्याप्रमाणे आहार घ्यावा. अतिरिक्त प्रमाणात साठून राहणारे स्निग्ध पदार्थ खाल्ल्यास थकवा येणे, पोटात जळजळ होणे, खूप जास्त ग्लानी राहणे, काम करण्यास उत्साह नसणे असे अनुभव येतात. स्निग्ध पदार्थ अतिरेकी प्रमाणात खाल्ले आणि शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचे प्रमाण कमी असेल तर शरीरातील अवयव आळशी होतात. म्हणजे काय? तर चयापचय क्रिया मंदावते परिणामी रक्ताभिसरण मंदावते.
हळूहळू हृदयावरील ताण वाढतो. रक्तदाब वाढतो आणि योग्य वेळी लक्ष न दिल्यास शारीरिक व्याधी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे स्निग्ध पदार्थ खा, पण चापनू चोपनू नको तर जरा जपूनच!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health special what does fats do to your body saturated unsaturated fats oils ghee hldc vp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×