Health Special: “मी जेव्हापासून डाएट फॉलो करतेय तेव्हापासून माझी मुलंसुद्धा तसंच खाऊ लागलीयेत.” ऋचा आनंदाने सांगत होती. “त्यांना डब्यात बीटच्या पोळ्या, पालक पराठे, तेलची चटणी असं सगळं डब्यात नेऊ लागलीयेत. आईचं खाणं मुलांना आपलंसं वाटतंय.”

“हे मात्र खरं आहे. फक्त मुलांचंच नव्हे अख्ख्या घराचं खाणं बदलू शकतं.”

benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…
Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी
Homemade Cough Syrups Chef Neha Deepak Shah’s homemade cough syrup is easy to make but experts are divided over its effectiveness
खोकल्यावर औषधं घेऊनही आराम नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं हे संत्र्याचं सिरप बनवा घरच्या घरी
Couple kissing at railway station couple video viral on social media
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ‘चीज बॉल्स’, लहान मुलंही होतील खुश; वाचा सोपी रेसिपी

“दर आठवड्याला आईस्क्रीमसाठी हट्ट करणारी मीरा सध्या डाळिंब कोशिंबिरीच्या प्रेमात आहे आणि अलीकडे पालेभाज्या खाऊ लागलीये. चॉकलेट्स पण बंद झालीयेत.”

ऋचाच्या आवाजात कौतुक होतं. लहान मुलं आणि त्यांचं खाणं हे अनेक नवमातांसाठी वेगळं आव्हान असतं. आहारशास्त्रातील बदलत्या संशोधनानुसार मुलांना लहानपणापासून दिलं जाणारं खाणंदेखील बदललेलं आहे, त्याविषयी…

हेही वाचा – Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

आहाराचे संस्कार घरातूनच

लहान मुलांच्या आहाराबाबत सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्यांची आहाराची बदलती गरज. वाढत्या वयानुसार आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण वाढत जातं. त्यांच्यावर आहाराचे संस्कार घरातूनच सुरू होतात. एखाद्या पदार्थाची निवड, आहारातील वेगेवेगळे समज- गैरसमज यांची सुरुवात घरापासून होते, त्यामुळे पालक म्हणून आहाराबाबत सजग असणं आवश्यक असतं. लहान मुलांच्या आहारातील तक्रारी अनेकदा लाडीक स्वरात सांगितल्या जातात…

“त्याला पालेभाज्या आवडतंच नाहीत”

“आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय त्याचं जेवणचं पूर्ण होत नाही”

“ती फक्त भातच खाते” या लाडीक तक्रारीतून मुलांना बाहेर काढून सकस आहाराचं महत्त्व समजावणं आवश्यक असतं.

किडलेले दात

लहान मुलांच्या आहारशैलीवर पालकांचा होणार परिणाम सांगताना आणखी एक किस्सा आठवतोय. २०२० साली सहा वर्षाच्या आद्याला तिचे पालक माझ्याकडे घेऊन आले होते. तिचे सगळे दात वेगेवेगळ्या रंगाचे होते. तिचे दुधाचे दात पूर्णपणे किडल्यामुळे दंतवैद्यानी सगळे दात काढून नवे रंगीत दात बसवून दिले होते. तिला पूर्णवेळ फक्त द्रव पदार्थ खाण्याची अटकळ असल्यामुळे तिचे पालक आहारात काय काय हवंय याचा सल्ला घेण्यासाठी आले होते. तिच्या दातांबद्दल सांगताना मिहीर त्रासून म्हणाला “कसं काय माहीत माझी कोक प्यायची सवय इतकी पटकन लागली तिला. पाण्याऐवजी फक्त कोक आणि पेप्सी इतकंच प्यायची, त्याने एवढं नुकसान होईल वाटलं नव्हतं.”

सकस आहाराचं नियोजन

मिहीर हे सांगताना आद्याच्या आईच्या- स्वातीच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. “तरी मी तुला सांगत होते. तिच्यासमोर कोक पेप्सी नको. पण माझं ऐकशील तर खरं. रोज चॉकलेट, जेवल्यानंतर चॉकलेट शेक, पाणी तर नकोच असतं तिला.” स्वाती नाराज स्वरात म्हणाली. आणि लहानखुरी आद्या… तिच्या विश्वात मात्र हे सगळंच नवीन होतं. आपले दात तर रंगीत आहेत, हे वेगळं आहे. पण नेमकं काय चुकलंय याबद्दलच निरागस कुतूहल होतं. तिच्या आहारातील बदल सुचवताना फक्त स्ट्रॉ वापरण्याचा सल्ला असल्यामुळे सकस आहाराचं नियोजन करणं थोडं आव्हानात्मक होतं.

वाढीसाठी पोषक आहार

आद्याचं उदाहरण पाहता लहान मुलांच्या आहारात केवळ फॅड म्हणून नव्हे तर सवय म्हणून सकस आहाराची सुरुवात पालकांपासून व्हायला हवी, हे अधोरेखित होत राहतं. पाश्चात्त्य जीवनशैली अंगिकारताना आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थांबद्दल त्यांच्या आहारातील वापराबद्दल आपण आग्रही असायला हवं. लहान मुलांच्या वाढीसाठी पोषक आहार आवश्यक आहे, म्हणजे नेमकं कसं ते जाणून घेऊ. पण नेमकं कशासाठी हे आधी जाणून घेऊया.

हेही वाचा – शाहरुख खानने वयाच्या ५९ व्या वर्षी सोडले धूम्रपान; जाणून घ्या धूम्रपान सोडण्याचे फायदे

वाढतं वजन हे परिमाण

नवजात अर्भकाचा वजन पहिले ६ महिने ते एक वर्षापर्यंत वाढतं. या वयात पोषक तत्त्वांची आवश्यकता इतर कोणत्याही वयोगटापेक्षा अधिक असते. आईच्या दुधामधून आवश्यक संप्रेरके, प्रथिने यांचा पुरवठा होतोच . मात्र जेव्हा मूल हळूहळू अन्न पदार्थ खायला शिकतं, तेव्हा त्यांच्या आहारात कॅल्शिअम, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लोह, झिंक, व्हिटॅमिन्स (पोषणमूल्यं) आणि खनिजे यांचे प्रमाण उत्तम असणे आवश्यक असते. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढणे, हाडांची वाढ होणे, मेंदूला चालना मिळणे, ऊर्जेचा भरपूर पुरवठा होत राहणे, शरीरातील पेशींची वाढ उत्तम होणे आणि पेशींचे आरोग्य उत्तम राहणे यासाठी आहार महत्वाचा आहे. बाळाचे आरोग्य उत्तम असण्याचं एक परिमाण म्हणजे बाळाचं वाढतं वजन! पहिल्या सहा महिन्यात सरासरी ६ ते ८ किलो आणि एक वर्षापर्यंत सरासरी ११ किलोग्रॅम इतके वजन वाढणे अपेक्षित असते. अर्थात त्यासाठी आईचा आहारदेखील तितकाच महत्वाचा असतो.

वाढीव साखर वजा करा

सहा ते आठ महिन्यांनंतर बाळाच्या आहारात आईच्या दुधाव्यतिरिक्त आहार ठरविताना स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचं आहारातील उत्तम प्रमाण बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचं ठरतं. पहिले दोन वर्षे कोणत्याही प्रकारची साखर आहारातून वजा करणं पोषक मानलं जातं. भारतीय आहारात कर्बोदकांचं प्रमाण उत्तम आहे. त्यामुळे वाढीव साखर बाळाच्या आहारातून वजा केल्यास आणि नियमित आहारातून म्हणजेच भरडी, दूध-धान्ये , शिकरण, भाज्यांचे कढण अशा प्रकारचा आहार ठेवल्यास बाळाला विविध प्रकारचे अन्न आणि विविध चवींचे अन्न आहारात समाविष्ट करणं सोपं जाऊ शकतं.

Story img Loader