Premium

Health special: शरीराची वातानुकूलन यंत्रणा बिघडते तेव्हा…

आपले शरीर हे एक जैविक यंत्र आहे. आजुबाजूच्या वातावरणानुसार शरीराचे तापमान राखण्याचे काम हे जैविक यंत्र करत असते… त्यात बिघाड झाला की, सारे गणित बिघडते!

heat dr ashwin sawant
आपल्याला येणारा घाम शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करत असतो.

उन्हाळ्यामध्ये वाढलेले तापमान व त्यामुळे वाढलेली उष्णता केवळ हा एकच मुद्दा आरोग्याला घातक नसतो,तर हवेमधील आर्द्रतासुद्धा आरोग्यावर फार घातक परिणाम करते. आपल्या सभोवतालच्या हवेमध्ये बाष्प असते. हवेमधील या ओलाव्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये आर्द्रता (humidity) म्हणतो. हवेमधील आर्द्रतेचा मानवी आरोग्यावर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होत असतो. त्यातही शरीराचे स्वतःचे तापमान संतुलित करण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमधील आर्द्रतेची महत्त्वाची भूमिका असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा :Health special: जीआय म्हणजे काय? कमी जीआय असलेले पदार्थ कोणते?

आपले शरीर घामाचे प्रमाण वाढवून त्या घामाच्या बाष्पीभवनाद्वारे शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र उन्हाळ्यातल्या ज्या दिवसांमध्ये हवेमध्ये आर्द्रता वाढलेली असते (६०% हून अधिक), त्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे शरीराचे तापमान संतुलित करण्याची प्रक्रिया बिघडते. त्वचेवर तयार केलेल्या घामाचे बाष्पीभवन सहजगत्या होऊ शकत नाही. थोडक्यात काय तर शरीराची वातानुकूलन यंत्रणा (एसी) आर्द्र हवामानामध्ये नीट काम करत नाही.

आणखी वाचा : Health special: डोळा आळशी का होतो?

महत्त्वाचं म्हणजे आपले शरीर उष्म्याचे मोजमाप बाहेरच्या तापमानापेक्षा शरीरामधून बाहेर फेकल्या जाणार्‍या उष्णतेवर करत असल्याने, जेव्हा आर्द्र हवामानामध्ये आतली उष्णता नीट बाहेर फेकली जात नाही, तेव्हा अधिक तीव्र उकाड्याचा अनुभव येतो. या कारणामुळेच मुंबईसारख्या आर्द्रता अधिक असणार्‍या शहरांमध्ये तापमान ३६ अंशांच्या वर गेले तरी उकाडा असह्य होतो. त्याचवेळी नागपूरसारख्या शहरांमध्ये मात्र तापमान ४० अंशाच्या वर गेले तरी हवेमध्ये आर्द्रता फारशी वाढत नसल्याने शरीर आपले तापमान संतुलित करुन स्वतःला थंड करु शकते. समुद्र किनारपट्टीजवळील अनेक गाव-नगरांमध्ये आर्द्रता अधिक असल्याने अशा ठिकाणी असह्य उकाडा का होतो, ते आता तुमच्या लक्षात आले असेलच.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 11:32 IST
Next Story
Health special: जीआय म्हणजे काय? कमी जीआय असलेले पदार्थ कोणते?