रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण | Health Tips Do you also feel headache every morning know reasons behind it | Loksatta

रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ‘या’ भाज्या; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण
दररोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो (फोटो: Freepik)

निरोगी राहण्यासाठी दररोज किमान ८ ते १० तासांची झोप घेणे आवश्यक असते. पुरेशी झोप घेतल्यानंतर दिवसभरातील कामं करण्यासाठी शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटते. पण काहीजणांना पुरेशी झोप घेतली तरी सकाळी थकवा जाणवतो तर काहीजणांना रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो. यामागचे कारण काही चुकीच्या सवयी असु शकतात. कोणत्या कारणांमुळे सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो जाणून घ्या.

या कारणांमुळे होतो सकाळी डोकेदुखीचा त्रास

आणखी वाचा: वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ‘या’ भाज्या; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

अपूर्ण झोप
झोप अपूर्ण झाली असेल तर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. काहीजणांना गाढ झोप लागत नाही, रात्री अनेकवेळा जाग आल्याने पुरेशी झोप मिळत नाही, त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

जास्त झोपणे
जास्त झोपल्यानेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे.

मायग्रेन
ज्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास असतो, तत्यांना सकाळी डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

घोरण्याची सवय
ज्या व्यक्तींना झोपेत घोरण्याची सवय असते, त्यांना उठल्यावर नंतर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

आणखी वाचा: Diabetes मुळे कमी होऊ शकते रोगप्रतिकारक शक्ती; त्यावर ‘हे’ पदार्थ ठरतात गुणकारी

स्लीप ऍपनिया
ज्या व्यक्तींना स्लीप ऍपनियाचा त्रास असतो, त्यांना रात्री झोपेत श्वास घेण्यास अडचण येते. तसेच हा त्रास असणाऱ्यांना सकाळी डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:40 IST
Next Story
युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम