Heart Attack Risk : आपल्यापैकी बरेच लोक दिवसाची सुरुवात एक कप चहाने करतात. काही लोक दिवसातून तीन ते चार वेळा चहा पितात. प्रमाणापेक्षा जास्त चहा पिणे, हे आरोग्यासाठी चांगले नाही; पण काही वेळा चहा हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसं काय शक्य आहे? एका नवीन अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, नियमित चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. याविषयी मुंबई येथील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. राजीव भागवत यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती सांगितली आहे.

डॉ. भागवत सांगतात, “अनेकदा माझे अनेक रुग्ण मला विचारतात की, त्यांनी ग्रीन टी प्यायला पाहिजे का? कारण- हृदयाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. हृदय व रक्तवाहिन्या संबंधित आरोग्यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टी हे दोन्ही पिण्याच्या फायद्यांवर अनेकदा संशोधन करण्यात आले. त्यावर समाधानकारक माहिती समोर आली नाही; पण अनेक अभ्यासांद्वारे हे सिद्ध झाले आहे.”

Is waking up late better than rising early? A neurologist breaks it down for us Sleep tips
लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले? वाचा न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
rbi urban cooperative banks
नागरी सहकारी बँकांना भांडवल उभारणीचे नवीन मार्ग, रिझर्व्ह बँकेकडून चर्चात्मक दस्ताचा प्रस्ताव
ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
Krystle D'Souza's 60-Hour Non-Stop Shoot: Impact on the Body
अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने केले होते ६० तास नॉन-स्टॉप शूट! विश्रांती न घेता काम केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Odisha Crime News
Odisha Victim : “पोलिसाने माझी अंतर्वस्त्रं काढली, मला बांधलं मारहाण केली आणि…”, वेदना मांडताना ओडिशा पीडितेच्या डोळ्यात अश्रू

ते पुढे सांगतात, “यूकेमधील एका अभ्यासात सांगितले आहे की, जर तुम्ही अनेक वर्षांपासून नियमितपणे चहा पीत असाल, तर तुमचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका कमी होऊ शकतो. या अभ्यासात असेही सांगितले आहे की, ज्या प्रौढ व्यक्ती सात वर्षांहून अधिक काळ दिवसातून दोन कप चहा पितात, त्यांना हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका कमी प्रमाणात चहा पिणाऱ्या किंवा चहा न पिणाऱ्यांपेक्षा १९ टक्क्यांनी कमी असतो.”

हेही वाचा : मोनोट्रॉपिक आहार तुमचे वजन कमी करण्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?

चहा हृदयाच्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर?

चहामध्ये हृदयाला सुरक्षित ठेवणारी संयुगे (compound) असतात; जी जळजळ वाटणे आणि शरीरातील खराब होणाऱ्या पेशींबरोबर लढतात. त्यामुळे रक्तवाहिन्या चांगले कार्य करू शकतात. ब्लॅक व ग्रीन टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स व पॉलीफेनॉल्स यांसारखी अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

२०१८ मध्ये उंदरांवर ब्लॅक टीची चाचणी करण्यात आली होती. त्यातून असे दिसून आले की, ज्या उंदरांनी ब्लॅक टीचे सेवन केले म्हणजेच त्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स पॉलीफेनॉलचे सेवन केले. त्यांच्या कोलेस्ट्रॉलमध्ये १०.३९ टक्के, एलडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये १०.८४ टक्के आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये ६.६ टक्के घट दिसून आली आहे.

ग्रीन टीमधील संयुगे (compounds) रक्तवाहिन्यांमधील गुठळ्यांना जोडलेले प्लेक्स तोडण्यास मदत करतात. काही अभ्यासांत सांगितल्याप्रमाणे, ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतात, जे अति जास्त वाढलेल्या प्लेटलेट्स नियंत्रित करतात.

हेही वाचा : भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?

तुम्ही योग्य प्रकारे चहा घेता का?

चहामध्ये संयुगे (compound) असतात, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पॉलीफेनॉल शरीरात दीर्घकाळ साठवले जात नाहीत. त्यामुळे नियमित एका ठराविक कालावधीनंतर चहा पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.

कॉफीपेक्षा चहामध्ये कमी कॅफिन असते तरीसुद्धा आपण किती प्रमाणात कॅफिनचे सेवन करतोय, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या चहापेक्षा ब्लॅक टीमध्ये सर्वाधिक प्रमाणात कॅफिन असते. एक कप चहामध्ये ४७ मिलिग्रॅम, तर ग्रीन टीमध्ये २८ मिलिग्रॅम कॅफिन असते. त्यामुळे चहाचे अतिसेवन करू नये. चहामध्ये टॅनिन, पॉलिफेनॉल हे घटक असतात आणि त्यामुळे तुमची पचनसंस्थासुद्धा बिघडू शकते.

आपल्या देशात सामान्यत: चहा उकळला जातो; पण चहा उकळू नये. फक्त ८० ते ९० डिग्री सेल्सिअसवर गरम पाण्यात चहा पावडर टाका. चहा जास्त उकळल्याने त्यातील शरीरास फायदेशीर संयुगे नष्ट होतात.
तुम्हाला चहा प्यायला आवडत असेल, तर त्यात साखर किंवा दूध घालू नका. कारण- त्यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजन वाढू शकते. तसेच, कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढू शकते. कोणत्याही प्रकारच्या साखरयुक्त पेय किंवा साखरयुक्त चहाने हृदयाशी संबंधित आजारांचा आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका वाढतो.