scorecardresearch

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? मग असू शकते ‘हे’ हार्ट अटॅकचे लक्षण? वेळीच व्हा सावध अन् लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला

Heart Health Tips: अनेकजण छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात, पण असे करणे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला भारी पडू शकते.

heart attack right chest pain Know the signs and symptoms Warning Signs of a Heart Attack
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? मग असू शकते हे हार्ट अटॅकची लक्षणं? वेळीच व्हा सावध अन् वाचा डॉक्टरांचा सल्ला (photo – freepik)

तुमच्यापैकी बहुतेक जण छातीच्या उजव्या बाजूच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. यावेळी छातीत दुखणे, जळजळणे याकडे लोक स्नायूंचा ताण, गॅस, अपचन असल्याचे म्हणत फारसे लक्ष देत नाहीत. परंतु, अनेकांना ही हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं असू शकतात, असं वाटत नाही. आपण हे दुखणं म्हणावं तितकं गांभीर्यानं घेत नाही. मग अशा वेळी उपचारांना उशीर होतो आणि हृदयाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेकदा रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. याच विषयावर मुंबईतील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजीचे सल्लागार डॉ. प्रशांत पवार यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी छातीच्या उजव्या बाजूचे दुखणे खरंच हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असतं? तसेच या आजारावर नेमके काय उपचार आहेत याविषयी सविस्तररीत्या सांगताना त्यांनी एका केसबद्दलची माहिती दिली आहे.

डॉ. प्रशांत पवार यांनी हृदयविकाराचा झटका आलेल्या एका रुग्णाबद्दलची माहिती देताना सांगितले की, एक ६२ वर्षीय पुरुष अँटासिड्स घेतल्यानंतर छातीच्या उजव्या बाजूला दुखतेय म्हणून चेकअपसाठी ओपीडीमध्ये आला. यावेळी समजले की, त्याने छातीत दुखण्याआधी एरेटेड ड्रिंक्सचे सेवन केले होते; ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि भरपूर घाम येऊ लागला. अशा परिस्थितीत जवळपास दोन तास वेदना आणि त्रास सहन करीत शेवटी त्याने वैद्यकीय मदत घेतली. यावेळी त्याच्या ईसीजी रिपोर्टमधून त्याच्या हृदयाचे पंपिंग कमी झाल्याचे आणि मायोकार्डियल इन्फेक्शन झाल्याचे समोर आले. थोडक्यात काय तर धमनी ब्लॉक झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

sushma andhare on raj thackeray, sushma andhare toll issue, sushma andhare on health
“काही जण शिळ्या कढीला ऊत आणत असून…”, टोल मुद्द्यावरुन अंधारेंचा मनसेला टोला
how to clean water bottle at home bottle cleaning tips
पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आतून कशा स्वच्छ करायच्या? जाणून घ्या ४ सोप्या टिप्स
What Happens To Body If You Eat Dry Fruits Kaju Badaam Manuka Everyday Health Expert Tells Benefits What to Do and Not
तुम्ही रोज काजू, बदाम, मनुक्यासारखा सुकामेवा खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
Dietitian told how to consume millet?
नाश्त्यामध्ये बाजरीची लापशी, दुपारच्या जेवणात नाचणीची भाकरी खाणे फायदेशीर का? आहारतज्ज्ञांनी सांगितले मिलेट्सचे सेवन कसे करावे?

यावेळी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. फुप्फुसात द्रव साचल्यामुळे ते तीन दिवस आयसीयूमध्ये होते. पण, त्यांनी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतला असता, तर त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली नसती. अनेक लोक स्नायूंवर ताण आल्यानं छातीच्या उजव्या बाजूला दुखतंय, असं समजून सोडून देतात.

छातीत उजव्या बाजूला दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे का?

छातीच्या उजव्या बाजूला १० मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखत असेल, तर ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. याच वेदनांमुळे पुढे हृदयविकाराचा धोका वाढतो. या विषयावर बोलताना एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमधील कार्डियाक सायन्सेस विभागाचे टीएव्हीआर आणि स्ट्रक्चरल हार्ट प्रोग्राम प्रमुख डॉ. मौलिक पारेख यांनी चार गोष्टींकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

१) या वेदना केवळ छातीपर्यंतच जाणवतात की, मान व खांद्यापर्यंत जाणवतात ते लक्षात घ्या.

२) अंगमेहनतीचं काम, खूप जेवणानंतर किंवा गरम पाण्यानं अंघोळ केल्यानंतर या वेदना जाणवतात का तेही लक्षात घ्या.

३) या वेदना सतत जाणवतात की काही काही वेळाने यावरही लक्ष ठेवा.

४) या वेदना तीव्र व तीक्ष्ण आहेत का, याची माहिती ठेवा.

यापैकी कोणतंही लक्षण हृदयविकाराचा झटका किंवा विकसित होत असलेल्या अवरोधाचं संकेत देऊ शकतं; जे त्वरित ओळखणं आवश्यक आहे. कारण- यावेळी एकच नस छाती, मान, जबडा आणि खांद्याच्या उजव्या व डाव्या बाजूस काम करते. त्यामुळे हृदयातील वेदना डाव्या खांद्यापेक्षा उजव्या खांद्याकडे जास्त वेगाने पसरू शकतात. या वेदना छातीचा मागचा भाग, मान व जबडा यांवरदेखील परिणाम करू शकतात, असेही डॉ. पारेख म्हणाले.

हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे कोणती? उजव्या बाजूला छातीत दुखणे वेगळे कसे आहे?

सामान्य लक्षणांमध्ये छातीच्या मध्यभागी दुखते; ज्याला टिपिकल अँजायना असं म्हणतात. त्यात जडपणा, अस्वस्थता किंवा कधी कधी तीव्र वेदना जाणवू लागतात. इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणं, मळमळ, जबडा दुखणं आणि डाव्या खांद्याचे स्नायू दुखणं; जे हात किंवा पाठीपर्यंत पसरणं यांचा समावेश होतो. उजव्या बाजूचं दुखणं हे अनेकदा भारीपण किंवा जडपणामुळे जाणवतं. त्या बाजूनं दाबल्यास हे दुखणं वाढतं; पण कमी होत नाही. जर वेदना विशिष्ट जागेवर दाबून वाढल्या, तर त्या हृदयाऐवजी स्नायू, हाडं किंवा बरगडीमध्येही जाणवण्याची शक्यता असते, असे डॉ. पारीख यांनी स्पष्ट केले.

याबाबत डॉ. पवार यांनी म्हटले की, मधुमेह असलेल्या लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसू शकत नाहीत. तसेच हृदयविकाराचा झटका ही एक रेट्रोस्टर्नल वेदना आहे; यावेळी रुग्ण आपली मूठ घट्ट दाबून ठेवतो. बोटांत वेदना स्थानिकीकृत होत असल्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं दुखत नाही.

उजव्या बाजूच्या छातीत दुखण्याच्या वेदनेवर उपचार करताना कोणती आव्हाने येतात?

डॉ. पवार यांच्या मते, छातीत उजव्या बाजूला दुखण्यामागील कारणांबाबत संशोधन करणं हे मोठं आव्हानात्मक काम आहे, कारण- यात स्नायूंवरील ताण, पल्मोनरी एम्बोलिझम, अॅसिड रिफ्लक्स ते शिंगल्स यांसारख्या अनेक कारणांचा शोध घ्यावा लागला म्हणून डॉक्टरांनीच सतर्क राहायला हवं.

विविध चाचण्यांच्या आधारे या आजारापासून दूर राहता येते का?

या आजारावर सर्वसमावेशक अशी कोणताही चाचणी नाही. त्यामुळे रुग्णाच्या अनेक संलग्न चाचण्या कराव्या लागतात. या चाचण्यांमध्ये ECGs, 2D-Echo, तणाव चाचण्या, CT कोरोनरी अँजिओग्राफी आणि ट्रोपोनिन लेव्हलसह, ब्लड टेस्टचा समावेश होतो. छातीच्या उजव्या बाजूचा ईसीजी करू शकतो. पण हृदयातील प्रोटीन लेव्हल मोजण्यासाठी तुम्हाला ट्रोपोनिन चाचणी करावीच लागते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heart attack right chest pain know the signs and symptoms warning signs of a heart attack sjr

First published on: 01-10-2023 at 12:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×