नवी दिल्ली : न्याहरीला काही जण महत्त्व देत नाहीत. त्यामुळे ते न्याहरीमध्ये बिस्कीट, चिप्स किंवा अन्य तळलेल्या पदार्थाचा समावेश करतात. परंतु एका नव्या संशोधनानुसार न्याहरी ही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे हे सिद्ध झाले आहे. ‘जोई प्रिडिक्ट’ नावाच्या या अहवालात ८५४ लोकांच्या न्याहरीच्या सवयीचे विश्लेषण केले आहे. ते ‘युरोपीय जर्नल ऑफ न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झाले आहे.
हेही वाचा >>> Health Special: मानसिक स्थिती आणि त्वचाविकार यांचा संबंध असतो का?




संशोधनानुसार २५ टक्के लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या भोजनात पौष्टिक पदार्थाचा समावेश करत असले तरी न्याहरीमध्ये बिस्कीट, चिप्स यासारख्या पदार्थाचा समावेश करतात. त्यामुळे त्यांचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. अशा लोकांना मेंदूघात किंवा हृदयरोग होण्याचा धोका अधिक असतो. ‘किंग्ज कॉलेज लंडन’च्या डॉ. सारा बेरी यांनी सांगितले की, न्याहरीमध्ये चिप्स, बिस्कीट आदी पदार्थाऐवजी फळे, सुकामेवा यांचा समावेश करावा. न्याहरी टाळणारे किंवा न्याहरीत पौष्टिक पदार्थाचा समावेश न करणाऱ्यांचे वजन वाढण्याचा तसेच मेंदूघात किंवा हृदयरोग होण्याचा धोका असतो.