मुंबई: हिपॅटायटीस ‘ए’ हा सहसा सौम्य समजला जाणारा विषाणूजन्यसंसर्ग असला तरी फॅटी लिव्हर किंवा सिरोसिससारख्या यकृताच्याआजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मात्र तो गंभीर ठरू शकतो. अशारुग्णांमध्ये हा संसर्ग यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे वेळीच निदान, लसीकरण आणि स्वच्छतेच्या योग्य सवयी अंगीकारणे गरजेचेआहे.
हिपॅटायटीस ए हा दूषित अन्न, पाणी किंवा अस्वच्छतेमुळे पसरणारासंसर्ग असून ताप, थकवा, मळमळ, पोटदुखी आणि कावीळ ही त्याचीप्रमुख लक्षणं आहेत. बहुतांश वेळा हा संसर्ग सौम्य असतो, विशेषतःमुलांमध्ये तो लवकर बरा देखील होतो. मात्र प्रौढांमध्ये व्यक्तीनुसारपरिस्थिती वेगवेगळी असू शकते.
हिपॅटायटीस ए ची तीव्रता हीयकृताच्या भूतकाळातील आरोग्यावर अवलंबून असते. निरोगी यकृतअसलेल्या व्यक्तींना सौम्य लक्षणे जाणवतात आणि ते सहज बरे होतात. मात्र ज्या रुग्णांचे यकृत आधीच कमकुवत आहे त्यांच्यावर या संसर्गाचागंभीर परिणाम होतो. अशा वेळी ‘अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअर’ सारखी समस्या निर्माण होऊ शकते असे ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ अनुगार श्रीमल यांनी सांगितले.तरुण आणि सिरोसिस नसलेल्या रुग्णांनायोग्य उपचारांनी बरे होण्याची शक्यता असते. परंतु ज्यांचे आधीच सिरोसिस किंवा यकृताच्या गंभीर आजाराने नुकसान झाले आहे. त्यांच्यात यकृताची कार्यक्षमता एकदा खालावली की ती पुन्हा सुधारणे कठीणहोते. अशा परिस्थितीत यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय ठरतो असेही डॉ श्रीमल म्हणाले.
तज्ज्ञांच्या मते, हिपॅटायटीस ए हे प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेवाटे, दूषित अन्न किंवा पाण्यावाटे पसरते. त्यामुळे विशेष स्वच्छताबाळगणे गरजेचे आहे. गाळून व उकळून पाणी प्यावे, उघड्यावरच्याअन्नपदार्थांचे सेवन टाळणे आणि वैयक्तिक स्वच्छतेचा सवयींचे पालनकरणे जसे की जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हातस्वच्छ धुणे यामुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. याशिवाय हिपॅटायटीस ए विरोधात प्रभावी लस उपलब्ध असून विशेषतःयकृताच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या प्रौढांनी लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे डॉ रोहन चौधरी म्हणाले.
विशेषतःयकृताच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये हिपॅटायटीस ए विषयीजनजागृतीचा अभाव दिसून येतो आणि त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिलेजात नाही. साधा वाटणारा संसर्गही यकृतावर गंभीर परिणाम करु शकतो. त्यामुळे थकवा, कावीळ, भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसताच त्वरिततज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळीच उपचारआणि विशेष उपचारांद्वारे यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी आम्हीप्रयत्नशील आहोत.हिपॅटायटीस ए हा एक किरकोळ आजार समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करु नका. विशेषतः फॅटी लिव्हर किंवा सिरोसिस असलेल्या व्यक्तींनी लसीकरण, स्वच्छता आणि वेळेवरतपासणी या तीन गोष्टींची काळजी घेतल्यास गंभीर धोका टाळता येऊशकतो.
