Herbal Remedies For Regulating Cholesterol Levels: कोलेस्ट्रॉल तयार करण्याचे काम लिव्हर करते. हा एक पदार्थ आहे जो नसा, पेशींच्या ऊतींचे संरक्षण करतो आणि शरीरात विशिष्ट हार्मोन्स बनवतो. तुम्ही खात असलेल्या पदार्थांमधून थेट कोलेस्टेरॉल देखील मिळवू शकता, ज्यापैकी काही अंडी, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्या शरीरात जास्त कोलेस्टेरॉल तुमच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. ह्रदयाचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा खराब कोलेस्टेरॉलचे जास्त प्रमाण हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. डॉ. वसंत लाड यांनी त्यांच्या ‘द कम्प्लीट बुक ऑफ आयुर्वेदिक होम रेमेडीज’ या पुस्तकात उच्च कोलेस्टेरॉल वाढण्याचे कारण रक्तातील लिपिड्स (चरबी) वाढणे सांगितले आहे आहे. आयुर्वेदानुसार हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

( हे ही वाचा: ‘या’ रसांच्या सेवनाने किडनी स्टोन लघवीतून सहज बाहेर पडेल; ऑपरेशनची देखील गरज भासणार नाही)

द कम्प्लीट बुक ऑफ आयुर्वेदिक होम रेमेडीज’ या पुस्तकानुसार, पनीर, प्रक्रिया केलेले पदार्थ, फॅटयुक्त दूध किंवा दही यासारखे चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. मिठाई आणि थंड पदार्थ आणि पेये यांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. यासह, उच्च कोलेस्टेरॉल रोखण्यासाठी लसूण सर्वात प्रभावी मानले जाते. ताज्या लसूणची बारीक चिरलेली एक पाकळी, अर्धा चमचा किसलेले आले आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. दिवसभर जेवणापूर्वी या मिश्रणाचे सेवन करा.

त्याच वेळी, एक चमचा दालचिनी आणि एक चतुर्थांश चमचे हर्बल मिश्रण त्रिकाटूपासून बनलेला चहा एक चमचा मध मिसळून प्या. दिवसातून सुमारे दोनदा घ्या. तसेच अर्धा चमचा त्रिकटू एक चमचा मधासोबत दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्याने पचनशक्ती आणि अतिरिक्त कफ निघण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत होते.

( हे ही वाचा: युरिक ॲसिड वाढल्याने किडनी फेल होऊ शकते, ‘हे’ पदार्थ खाणे आजपासूनच सोडा)

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजरी, क्विनोआ, ओटमील, गहू, सफरचंद, द्राक्षे आणि बदाम यांचा समावेश करा. यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करायला विसरू नका आणि चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार घेण्यास विसरू नका.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Herbal remedies and ayurvedic diet tips for regulating cholesterol levels gps
First published on: 05-12-2022 at 13:35 IST