Food To Avoid In High BP: उच्च रक्तदाबाची स्थिती हृदयासह मेंदूच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी औषध वेळेवर घेण्यासह आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी काही अन्नपदार्थ आणि पेयांचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे पदार्थ
आणखी वाचा: ‘या’ आजरांमध्ये कोबी खाणे ठरते फायदेशीर; लगेच जाणून घ्या
लोणचं
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी लोणचं खाणे टाळावे. कारण लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते. हे रक्तदाब वाढण्याचे कारण ठरू शकते. तसेचग यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लोणचं खाणे टाळावे.
प्रोसेस्ड मीट
यामध्ये देखील मिठाचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे शरीरातील सोडीयमचे प्रमाण वाढून रक्तदाब वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
कॉफी
कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदाबासह रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी कॉफी पिणे टाळावे.
गोड पदार्थ
गोड पदार्थांमुळे वजन वाढण्यासह आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात. यामुळे रक्तदाब वाढण्याबरोबर हायपरटेंशनची समस्याही उद्भवू शकते त्यामुळे गोड पदार्थ खाणे टाळावे.
आणखी वाचा: ‘या’ आजारांमध्ये आले खाणे ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
फास्ट फूड
पिझ्झा, बर्गर यांसारखे फास्ट फूड तसेच चिप्ससारख्या तेलकट पदार्थांमुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते, त्यामुळे असे पदार्थ टाळावे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)