High Cholesterol Control Tips: भारतात उच्च कोलेस्ट्रॉल ही एक वेगाने वाढणारी समस्या बनली आहे. आजकाल लहान मुलांची लिपिड प्रोफाइल चाचणी केल्यास त्यांच्यामध्येही उच्च कोलेस्ट्रॉ आढळून येते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) आणि दुसरे एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल. आपले शरीर स्वत:हून कोलेस्ट्रॉल तयार करेत आणि यासाठी आहारही जबाबदार असतो. प्रक्रिया केलेले पदार्थ, लाल मांस, अतिरिक्त लोणी आणि तूप तसंच चुकीची जीवनशैली यांमुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढते.
नवी दिल्लीतील हॉर्ट स्पेशलिस्ट डॉ. अंशुल कुमार जैन यांनी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आजच्या पिढीमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यास शारीरिक हालचालींचा अभाव, जा्त वेळ बसून राहणे, व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूड तसंच प्रोसेस्ड फूडचे सेवन मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जर वाईट कोलेस्ट्रॉलवर दीर्घकाळ नियंत्रण ठेवले नाही, तर त्यामुळे हॉर्ट अटॅक, पॅरालिसिस आणि लिव्हरसंबंधित गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे पायांच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गंभीर परिस्थितीत पाय कापण्याची वेळही येऊ शकते. कोलेस्ट्रॉलची सामा्य पातळी, आहार आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या संपूर्ण आहाराबाबत डॉक्टरांकडून जाणून घेऊ…
एलडीएल कोलेस्ट्रॉल किती असावे?
तज्ज्ञांच्या मते, एलडीएल कोलेस्ट्रॉलची आदर्श पातळी व्यक्तीच्या आरोग्यानुसार बदलते.
सामान्य व्यक्तीसाठी 100 mg/dL पेक्षा कमी एलडीएल योग्य मानले जाते.
निरोगी प्रौढांमध्येही एलडीएल 100 mg/dL खाली ठेवणे चांगले.
मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास एलडीएल 70 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
ज्यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात आला आहे, त्यांनी एलडीएल 50-55 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का?
डॉ. अंशुल कुमार जैन यांच्या मते, अंड्याचे दोन भाग असतात.
अंड्याचा पांढरा भाग प्रथिनांनी समृद्ध असून बहुतेक लोक तो सुरक्षितपणे खाऊ शकतात.
अंड्याचा पिवळा बलक कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्याने उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा.
प्रक्रिया केलेले अन्न हृदयासाठी सर्वात मोठा धोका का?
डॉक्टरांच्या मते, प्रक्रिया केलेले (Processed) आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक आहेत.
आजकाल पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, पॅकेज्ड स्नॅक्स, प्रक्रिया केलेले मांस आणि फास्ट फूडचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पदार्थांमध्ये मीठ, साखर, ट्रान्स फॅट आणि अस्वास्थ्यकर चरबी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
स्वयंपाकासाठी कोणते तेल योग्य?
डॉ. अंकुल यांच्या मते, भारतीय कुटुंबांसाठी मोहरीचे तेल हा चांगला पर्याय आहे. ते भारतीय स्वयंपाकाच्या तापमानासाठी योग्य असून अनेक महागड्या तेलांपेक्षा परवडणारेही आहे. ऑलिव्ह ऑइलसारखी इतर तेलेदेखील वापरता येतात, मात्र कोणतेही तेल प्रमाणातच वापरणे महत्त्वाचे आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी किती तूप खावे?
तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तूप पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, मात्र त्याचे प्रमाण अत्यंत कमी ठेवावे. डाळ किंवा पोळीवर थोडेसे तूप वापरता येते. मात्र जास्त प्रमाणात तूप खाणे टाळावे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी किती तूप खावे?
तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तूप पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, मात्र त्याचे प्रमाण अत्यंत कमी ठेवावे. डाळ किंवा पोळीवर थोडेसे तूप वापरता येते. मात्र जास्त प्रमाणात तूप खाणे टाळावे.
भाज्या कशा शिजवाव्यात?
डॉ. अंकुल यांच्या मते, हिरव्या भाज्या हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहेत. भाज्या जास्त शिजवल्यास त्यातील जीवनसत्त्वे आणि पोषक घटक कमी होऊ शकतात. त्यामुळे भाज्या वाफवून किंवा हलक्या शिजवून खाणे अधिक फायदेशीर ठरते.
हृदयविकाराच्या रुग्णांनी काय खावे?
हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी भारतीय पद्धतीचा संतुलित आहार घ्यावा.
आहारात पुढील पदार्थांचा समावेश असावा.
- डाळ
- चपाती
- हिरव्या पालेभाज्या
- मर्यादित प्रमाणात तेल
- कमी मीठ
त्याचबरोबर प्रक्रिया केलेली साखर, मिठाई, पॅकेज्ड पदार्थ आणि जंक फूड टाळावे. मधुमेह नसल्यास खजूर मर्यादित प्रमाणात खाऊ शकता.
कोणता सुकामेवा खाऊ शकता?
डॉक्टरांच्या मते, सर्व प्रकारचे सुकेमेवे मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात सुकेमेवे भिजवून खावेत.
हिवाळ्यात ते नेहमीप्रमाणे खाऊ शकता.
हृदयासाठी किती व्यायाम आवश्यक?
डॉ. अंकुल कुमार जैन यांच्या मते, नियमित व्यायाम हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे.
- सकाळी स्ट्रेचिंग करा.
- नियमित योगाभ्यास करा.
- दररोज चालण्याची सवय लावा.
- दिवसाला सुमारे १०,००० पावले चालण्याचे लक्ष्य ठेवा.
- पोहणे, सायकलिंग आणि धावणे हे हृदयासाठी उत्तम व्यायाम आहेत.
- हृदयविकाराच्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वजन उचलण्याचा व्यायाम करावा.
- जीवनशैलीत हे बदल करा
- काय करावे?
- दररोज योग आणि स्ट्रेचिंग करा.
- नियमित चालण्याची सवय लावा.
- सायकलिंग, पोहणे किंवा धावणे करा.
- वजन नियंत्रणात ठेवा.
- संतुलित भारतीय आहार घ्या.
काय टाळावे?
- दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहू नका.
- शारीरिक हालचालींचा अभाव टाळा.
- धूम्रपान करू नका.
- फास्ट फूडचे वारंवार सेवन टाळा.
- तूप, तेल आणि मीठाचे अति सेवन टाळा.
- धूम्रपानाबाबत डॉक्टरांचा इशारा
डॉ. अंशुल कुमार जैन यांच्या मते, धूम्रपान हे हृदयविकाराच्या झटक्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर धूम्रपान सोडणे आवश्यक आहे. एकदा हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तींमध्ये पुन्हा झटका येण्याचा धोका धूम्रपानामुळे अनेकपटीने वाढू शकतो.
