scorecardresearch

कोलेस्ट्रॉल वाढताच पायाच्या टाचा व नखांमध्ये दिसतात ही ५ गंभीर लक्षणे; शरीर देतं हृदयविकाराचे संकेत

High Cholesterol Signs In Body: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू लागताच सर्वात आधी पायांमध्ये काही मोठी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे कशी ओळखायची हे आपण जाणून घेऊयात..

कोलेस्ट्रॉल वाढताच पायाच्या टाचा व नखांमध्ये दिसतात ही ५ गंभीर लक्षणे; शरीर देतं हृदयविकाराचे संकेत
कोलेस्ट्रॉल वाढताच पायाच्या टाचा व नखांमध्ये दिसतात ही ५ गंभीर लक्षणे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

High Cholesterol Signs In Legs: कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. खरंतर कोलेस्ट्रॉल हे काही प्रमाणात शरीरासाठी लाभदायक सुद्धा असते पण जेव्हा बॅड व गुड दोन्ही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते तेव्हा त्यातून शरीराला अपायच अधिक होतो.डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या अहवालानुसार कोलेस्ट्रॉलमुळे रक्तात गाठी तयार होऊ शकतात ज्या तीन इंच रुंदीच्या असू शकतात. यामुळे टाइप १ ट्युमरचा धोका असतो. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू लागताच सर्वात आधी पायांमध्ये काही मोठी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे कशी ओळखायची हे आपण जाणून घेऊयात..

कोलेस्ट्रॉल वाढताच पायात दिसतात ‘ही’ लक्षणे

1) कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायांच्या नसांमध्ये रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो. नसांमध्ये कोलेस्ट्रॉल ब्लॉक होऊन गाठी होऊ शकतात यामुळे दोन्ही पायांच्या पोटऱ्या व तळव्यांमध्ये प्रचंड वेदना होऊ शकतात.

2) साधारणतः पायांच्या नखाचा रंग हा पांढरा व हलका गुलाबी असतो. अर्थात याचे कारण म्हणजे नखाच्या खाली असणाऱ्या मांसातील रक्तपेशी. जेव्हा कोलेस्ट्रॉलमुळे पायात नीट रक्तपुरवठा होत नाही तेव्हा नखं पिवळसर होऊ लागतात.

3) थंडीच्या दिवसात तुमच्या पायाचे तळवे थंड पडतात हे नॉर्मल आहे. पण बाहेर फार थंडी नसतानाही जर सतत हात-पाय थंड पडत असतील तर हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण असू शकते.

4) अनेकदा चालताना अचानक पायात क्रॅम्प येतो, पाय मुरगळतो याचे मुख्य कारण असते कोलेस्ट्रॉल. पायापर्यंत रक्त नीट पोहोचत नसल्याने पायाच्या मांसपेशी कमकुवत होऊन शरीराचा भार पेलू शकत नाहीत यामुळेच सतत पाय मुरगळण्याचे प्रमाण वाढू शकतो.

5) पायात रक्त न पोहोचल्याने पायाचे तळवे फार नाजूक झालेले असतात त्यामुळे अगदी थोडा मार लागताचही पायाला गंभीर दुखापत होऊ शकते. पायाला फोड येणे, खड्डे पडणे असेही त्रास यामुळे होऊ शकतात.

हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात ‘या’ डाळी व भाज्या; युरिक ऍसिडचा मोठा धोका ओळखा

दरम्यान जर वर दिलेली लक्षणे आपल्यालाही पायात दिसत असतील तर घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले आहे के हे तपासण्यासाठी लिपिड टेस्ट किंवा रक्त तपासणी करणे हिताचे ठरेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 13:13 IST

संबंधित बातम्या