scorecardresearch

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका; नाहीतर गंभीर समस्या उद्भवू शकते

Bad cholesterol level: हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी काही पदार्थ हे फूड पॉयझनिंगपेक्षा कमी नाहीत. याचे सेवन करणे टाळा

high cholesterol causes
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

High Cholesterol Diet Plan: उच्च कोलेस्ट्रॉलचे रुग्ण हिवाळ्यात अधिक चिंतेत असतात. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे रक्तातील लिपिडच्या पातळीत चढ-उतार होत राहते. खराब कोलेस्टेरॉलची पातळी जितकी जास्त असेल तितका हृदयविकाराचा धोका जास्त असतो. अनेक संशोधने पुढे आली आहेत ज्यावरून असे दिसून आले आहे की हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका अधिक येतो आणि त्याचे मुख्य कारण खराब कोलेस्ट्रॉल पातळी मानले जाते. आहारातील चुकांमुळे खराब कोलेस्टेरॉल (LDL) ची पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे असे पदार्थ आहारात खाणे टाळले पाहिजे.

अंडी खाणे टाळा

एनसीबीआय (National Center for Biotechnology Information) मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी अंड्यापासून दूर राहावे. अंड्यामध्ये संतृप्त चरबी असते आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास याचे वाईट परिणाम होऊ शकतात. खराब कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांनी यकृत आणि हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अंडी खाऊ नयेत. मात्र, ते खाण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता.

( हे ही वाचा: Heart Attack: ‘या’ कारणांमुळे वाढतात हृदयाच्या नसांमधील ब्लॉकेज; जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितलेल्या बचाव पद्धती)

तळलेले आणि मसालेदार पदार्थ

मसाले आणि तेलाने बनवलेल्या गोष्टींना चव खूप छान असते पण हे पदार्थ प्रत्येकासाठी विषासमान असतात. केवळ उच्च कोलेस्टेरॉलच नाही तर सामान्य व्यक्तीनेही अशा अन्नाचे सेवन टाळावे. पबमेडच्या अहवालानुसार अशा खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्या लोकांची कोलेस्टेरॉलची पातळी आधीच जास्त आहे त्यांनी तळलेल्या अन्नाकडे पाहू नये.

( हे ही वाचा: लघवीमध्ये कॅल्शियम वाढल्यास होऊ शकतो Kidney Stone; चुकूनही ‘या’ पदार्थांसोबत मीठ खाऊ नका)

प्रक्रिया केलेले मांस

अन्नपदार्थ दीर्घकाळ साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जातात. त्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच ते कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अगदी मांसाहारी पदार्थांमध्येही कॅलरीज जास्त असतात आणि ते एका मर्यादेत न खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल तर वाढतेच शिवाय शरीरात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:32 IST