How To Cure High Uric Acid: युरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारे एक असे टॉक्सिन आहे जे प्रत्येक अवयवावर मारा करू शकते. युरिक ऍसिडचा मुख्य हल्ला हा किडनीवर होतो. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याने युरिक ऍसिड वाढून शरीरात लहान क्रिस्टल सारखे खडे जमा होऊ लागतात. हे खडे किडनीमध्ये जमा झाल्यास त्यामुळेच किडनी स्टोनचा आजार होतो. युरिक ऍसिड वाढण्याचे मुख्य कारण हे प्युरीन युक्त पदार्थांचे सेवन करणे आहे. ज्यांची जीवनशैली बैठी असते तसेच आहारात साखर, सोडा व फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते त्यांना युरिक ऍसिड वाढल्याने त्रास होऊ शकतो. युरिक ऍसिड वाढून उच्च रक्तदाब, कमजोर रोगप्रतिकारक शक्ती व किडनीचे विकार असे त्रास जाणवू शकतात. युरिक ऍसिडबाबत एक उत्तम गोष्ट म्हणजे याचा उपायही आपण घरच्या घरी सुरु करू शकता. आज आपण युरिक ऍसिड कमी करणारा किचनमधील एक पदार्थ व त्याचा वापर कसा करायचा पाहुयात.

यूरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे

  • शरीरात युरिक ऍसिड वाढल्याने सांधे दुखीचा त्रास सुरु होतो
  • उठताना बसताना सतत आधार घ्यावा लागतो
  • बोटांना सूज येणे
  • गाठ झाल्याचे वाटणे
  • हातापायाच्या बोटांमध्ये सतत काहीतरी टोचतंय असं वाटणे
  • सतत थकवा जाणवणे

आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrishna) यांच्या माहितीनुसार धण्याचे सेवन हे युरिक ऍसिड, किडनी व आर्थराइटीसवर गुणकारी ठरू शकते. धण्यामध्ये लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात. तसेच यामुळे शरीराला आवश्यक फायबर सुद्धा मुबलक प्रमाणात मिळते. यामुळे किडनीची क्षमता वाढण्यास व परिणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचा वेग वाढतो. धण्याचे सेवन केल्याने युरिक ऍसिडचे क्रिस्टलसुद्धा तुटून शरीराबाहेर पडण्यास मदत होते.चला तर पाहुयात वेदनांपासून सुटका मिळण्यासाठी धण्याचे कसे सेवन करावे..

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Are you getting enough sleep at night 5 habits that are slowing down your
तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी धण्याचे सेवन कसे करावे? (How Coriander seeds control uric acid)

धण्याचे दाणे गरम तव्यावर भाजून घ्या. त्यात थोडे मेथीचे व ओव्याचे दाणे सुद्धा घ्या. थोडं भाजून हे तीन मसाले मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटल्यास याचे सेवन आपण चूर्ण म्हणून किंवा पाण्यात मिसळून सुद्धा करू शकता.

हे ही वाचा<<कोलेस्ट्रॉल वाढताच पायाच्या टाचा व नखांमध्ये दिसतात ही ५ गंभीर लक्षणे; शरीर देतं हृदयविकाराचे संकेत

धण्याचे शरीराला अन्य फायदे (Health benefits of coriander seed)

  • धण्याचे दाणे वाटून त्या पावडरमध्ये मध टाकून खाल्ल्याने खोकला बरा व्हायला मदत होते.
  • तोंडाच्या दुर्गंधीवर धण्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. धण्याचे ४- ५ दाणे चघळून दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
  • डोके दुखीवर, पचन प्रक्रियेसाठी धण्याचे सेवन उत्तम ठरते.

हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात ‘या’ डाळी व भाज्या; युरिक ऍसिडचा मोठा धोका ओळखा

  • डोळे दुखत असतील किंवा दूरचे/जवळचे दिसण्यास त्रास असेल तर धण्याचे सेवन करावे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)