त्वचा प्रत्येकाच्या शरीरावरील एक सुरक्षा कवच म्हणून काम करते. महिलांसाठी त्वचेचे महत्त्व आणखी जास्त आहे. कारण ती शरीरातील अंतर्गत स्थिती प्रतिबिंबित करते. त्वचा आणि मासिक पाळी यांच्यातील या गुंतागुंतीच्या संबंधांबाबत डॉ. निशिता रांका यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. डॉ. रांका या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्वचाविज्ञानी (Dermatologist) वैद्यकीय संचालक आणि डॉ. निशिता क्लिनिक फॉर स्किन, हेअर अँड एस्थेटिक्सच्या संस्थापक आहेत.

हार्मोन्सच्या पातळीत, विशेषतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळीत चढउतार झाल्यामुळे मासिक पाळीचा त्वचेवर लक्षणीय परिणाम होतो,” असे डॉ. रांका यांनी स्पष्ट केले. हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि त्याचा त्वचेवर होणारा प्रभाव समजून घेतल्यास स्त्रियांना वैयक्तिक गरजांनुसार त्यांची त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्या तयार करण्यास मदत होते.

Which foods take longer to digest Dont eat these foods for dinner
कोणते अन्नपदार्थ पचायला जास्त वेळ लागतो? डॉक्टरांच्या ‘या’ टिप्स फॉलो करा अन् रात्रीच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
common causes of feeling bloated
Bloating And Gas : सतत पोट फुगल्यासारखं वाटतं का? मग वाचा ही यादी अन् आजच करा तुमच्या सवयीत बदल; जाणून घ्या डॉक्टरांचे मत…
9-year-old man dies from choking on idlis during Onam celebrations
इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
What is the right way to hydrate your body
तुम्ही रोज किती पाणी पिता? तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्याची योग्य पद्धत जाणून घ्या तज्ज्ञांकडून….
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Is it necessary to constantly change the toothbrush
सतत टूथब्रश बदलणं गरजेचं आहे का? काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ..
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

मासिक पाळीचे चक्र समजून घ्या

मासिक पाळी चार टप्प्यात विभागली जाऊ शकते, प्रत्येक टप्प्यात विशिष्ट हार्मोनल बदल होतात आणि त्यानंतर त्याचा त्वचेवर परिणाम होतो.

हेही वाचा – तुम्ही रोज किती पाणी पिता? तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्याची योग्य पद्धत जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

१. फॉलिक्युलर टप्पा (दिवस १ ते १३):( Follicular phase (Day 1-13) :

मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होणाऱ्या या टप्प्यात इस्ट्रोजेनच्या पातळीत हळूहळू वाढ होते. इस्ट्रोजनचा प्रभाव कसा होतो हे स्पष्ट करताना डॉ. रांका यांनी सांगितले की, “इस्ट्रोजेन कोलेजन, इलास्टिन आणि हायलुरोनिक ॲसिडचे उत्पादन उत्तेजित करते, हे सर्व त्वचेचे हायड्रेशन, लवचिकता आणि संरचना राखण्यासाठी आवश्यक आहे.” मागील मासिक पाळीच्या चक्राच्या कमी हार्मोन्स पातळीमुळे सुरुवातीला त्वचा कोरडी वाटत असली तरी इस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ झाल्याने त्वचा हळूहळू सुधारते.

२) फॉलिक्युलर टप्प्यात बदल (दिवस १ते १३) Changes during the follicular phase (Day 1-13):

मासिक पाळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्वचा कोरडी होण्यापलीकडे, प्रारंभिक फॉलिक्युलर टप्पा त्वचेमध्ये घट्टपणा आणि किंचितशी त्वचेमध्ये सुधारणा आणू शकतो. जसजसे इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते, तसतसे त्वचेतील पाण्याची पातळी अधिक वाढत जाते आणि त्वचेचा पोत सुधारतो.

स्किनकेअरमध्ये हे बदल करा

त्वचेतील पाण्याची पातळी : आर्द्रता आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी हायलूरोनिक ॲसिड आधारित उत्पादने वापरा.
सौम्य क्लीन्सर : त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकणारे सौम्य क्लीन्सर निवडा.
त्वचेची काळजी घ्या : त्वचेला चांगली करण्यासाठी आणि संवेदनशीलता कमी करण्यासाठी सिरॅमाइड्स आणि नियासिनमाइडचा समावेश करा.

हेही वाचा – बाप्पाचे आवडते फूल आहे जास्वंद; जास्वंदाचा चहा पिण्याचे आहेत अनेक फायदे, तज्ज्ञ काय सांगतात….

३. ओव्हुलेशन टप्प्यात जास्तीत जास्त सौंदर्य वाढवणे (दिवस १४ ते १६) Maximising peak beauty during the ovulation phase (Day 14-16):
ओव्हुलेशनच्या टप्यात इस्ट्रोजेनची पातळी चांगली वाढते ज्यामुळे आपल्याला त्वचेची सर्वात तेजस्वी स्थिती पाहायला मिळते. डॉ. रांका यांनी स्पष्ट केले की, “कोलेजनचे वाढलेले उत्पादन आणि वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे त्वचेमध्ये पाण्याची पातळी अधिक वाढते आणि ती चमकदार आणि तेजस्वी बनते.” हानिकारक घटकांपासून वाचवण्यासाठी इस्ट्रोजेन त्वचेमध्ये अडथळे निर्माण करण्याच्या करण्यासाठीदेखील मदत करते आणि सूज आणि दाह कमी करते.

नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा:

हे घटक असलेले उत्पादन वापरा : व्हिटॅमिन सी त्वचेला उजळ बनवते आणि अँटिऑक्सिडंट संरक्षण देते, तर हायलूरोनिक ॲसिड त्वचेची पाण्याची पातळी राखते आणि चमक कायम राखते. रेटिनॉइड्स सेल टर्नओव्हर उत्तेजित करतात आणि त्वचेचा पोत सुधारतात आणि त्वचा उजळ करतात.
स्किनकेअर पद्धती : सौम्य एक्सफोलिएशन मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचेतील पाण्याची पातळी वाढवणारा किंवा उजळता वाढवणारा मास्क आणखी चमक वाढवू शकतात. अतिनील किरणांमुळे होणारी हानी आणि अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन महत्त्वपूर्ण आहे.

४. ल्यूटियल टप्प्यात ब्रेकआउट्स प्रतिबंधित करणे (दिवस १७ ते २४) (Preventing breakouts during the luteal phase (Day 17-24):

ओव्हुलेशननंतर, प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, ज्यामुळे सीबमचे उत्पादन वाढते. डॉ. रांका यांनी स्पष्ट केले की, “यामुळे तेलकट त्वचा आणि छिद्रे तयार होतात, परिणामी त्वचेवर पुरळ उठतात.”

मासिक पाळीच्या आधी पुरळ किंवा मुरुम येऊ नये यासाठी काही उपाय :

सॅलिसिलिक ॲसिड : तेल कमी करण्यासाठी आणि ब्रेकआउट्स टाळण्यासाठी छिद्र प्रभावीपणे एक्सफोलिएट करते.
बेंझॉयल पेरोक्साइड : मुरुमांना कारणीभूत असलेले बॅक्टेरिया आणि दाह कमी करते.
चहाच्या झाडाचे तेल : नैसर्गिक पूतिनाशक गुणधर्म देते.
आहारात बदल करा : दुग्धजन्य पदार्थ आणि साखरेचे सेवन मर्यादित करा, कारण ते मुरुमे वाढवू शकते.
तणावाचे व्यवस्थापन करा : योग आणि ध्यान केल्याने कॉर्टिसोलची पातळी कमी होऊ शकते. कॉर्टिसोल पातळी वाढल्याने मुरुम येतात.

५) मासिक पाळीदरम्यान कोरडेपणा आणि निस्तेजपणा : (Dryness and dullness during the menstrual phase:)

मासिक पाळीच्या वेळी त्वचेचे किंचित गडद दिसणे हे चिंतेचे कारण नाही, परंतु योग्य काळजी घेऊन ती सुधारली जाऊ शकते.

शिफारस केलेली उत्पादने/उपचार (Recommended Products/Treatments):

मॉइश्चरायझर : कोरडेपणाचा सामना करण्यासाठी शिया बटर आणि ग्लिसरीनसह समृद्ध मॉइश्चरायझर वापरा.
ब्राइटनिंग सीरम : त्वचेचा रंग एकसमान राखण्यासाठी नियासिनमाइड किंवा लिकोरिस अर्क असलेले सीरम शोधा.
हायड्रेटिंग मास्क : त्वचेतील पाण्याची पातळी वाढवा आणि त्वचेचा पोत सुधारा.
विश्रांती आणि पाण्याची पातळी : संपूर्ण त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि पाणी पिण्याला प्राधान्य द्या.

संपूर्ण मासिक पाळीत होणारे हार्मोनल चढउतार आणि त्वचेवर त्यांचा होणारा प्रभाव समजून घेऊन तुम्ही स्वत:साठी स्किनकेअर दिनचर्या तयार करू शकता.