Weight Loss Tips: आता नवीन वर्ष सुरु होताच अनेकांनी यावर्षात बारीक होण्याचा, वजन नियंत्रणात ठेवण्याचा संकल्प केला असेल. यासाठी तुम्हीही अनेक डाएटचे नियम तपासून पाहात असाल ना. वजन कमी करणाऱ्यांना नियमित दिला जाणारा सल्ला म्हणजे भात कमी कर आणि वाटल्यास एक पोळी खा. पण खरंच पोळी खाल्ल्याने तुमचं वजन कमी होऊ शकतं का? अनेकजण गव्हाच्या पिठाऐवजी नाचणी, बाजरी खाण्याचा सल्ला देतात पण पटकन या नव्या पदार्थांची सवय होणे कठीण असते, यासाठीच आपण जास्त संभ्रम न वाढवता तज्ज्ञांचा सल्ला ऐकायला हवा. आज आपण तरला दलाल यांनी गव्हाच्या पोळीचे सांगितलेले फायदे, व लुसलुशीत पोळी तयार करण्यासाठीच्या हॅक जाणून घेणार आहोत. याचा तुम्हाला वजन कमी करायला फायदा होणार का? चला तर पाहुयात..

गव्हाच्या पोळीचा कॅलरी काउंट

एका पोळीमध्ये १०४ कॅलरीज असतात, यापैकी ६३ टक्के कार्बोहायड्रेट, १० टक्के प्रोटीन व ३३ टक्के फॅट्स असतात. एका सुदृढ व्यक्तीला दिवसभरात २००० कॅलरीज शरीराच्या सुरळीत कार्यासाठी आवश्यक असतात, त्यामुळेच एका पोळीच्या सेवनाने तुमच्या कॅलरीच्या गरजेची ५ टक्के गरज पूर्ण होऊ शकते.

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी

मऊ लुसलुशीत पोळीची रेसिपी

गव्हाच्या पिठात चिमूटभर मीठ, टेबलस्पून तेल व गरजेनुसार पाणी घालून मऊसूत पीठ मळून घ्या. तुम्ही पिठात आणखी काहीही वेगळं घातलं नाही तरी तुम्हाला पूर्ण पोषण मिळू शकते, यासाठी तुम्ही चपात्या करण्याआधी १५ ते २० मिनिट पिठाचा गोळा झाकून बाजूला ठेवून द्यायला हवा. पोळी शेकवताना सुद्धा आधी अर्धा मिनिट ती छान तापलेल्या तव्यावर व मग थेट गॅसच्या मोकळ्या आचेवर भाजून घ्या.

हे ही वाचा<< अंग मोडून येतंय.. पाय दुखतायत? हळदीच्या तेलाने मालिश करून झटक्यात मिळू शकतो आराम; कसे बनवाल पाहा?

गव्हाच्या पिठाच्या चपातीचे फायदे:

१) वजन कमी करायचं असल्यास गव्हाच्या पिठाची पोळी उत्तम पर्याय ठरते. अनेकांना बाजरी- नाचणीच्या भाकऱ्या खाणे नको वाटतं याचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक कडवटपणा पण अशी समस्या गव्हाच्या बाबत होत नाही. अनेक भारतीय घरांमध्ये पोळी एक नियमित आहाराचा पदार्थ आहे.

२) गव्हाच्या पिठात ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा मर्यादित असतो. बाजरी नाचणी हा पर्याय अधिक उत्तम पण नियमित गव्हाच्या पिठाच्या पॉलिने डायबिटीजचा त्रास बळावण्याची शक्यता कमी असते.

हे ही वाचा<< डायबिटीजमध्ये दिवसात किती पोळ्या खाव्यात? ‘या’ ३ पिठांचा पर्याय ठरू शकतो बेस्ट

३) गव्हात व्हिटॅमिन बी १ व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढू शकते.

गव्हाच्या पिठाची पोळी कशासह खावी?

तुम्ही अगदी कोणत्याही भाजीसह साधी पोळी खाऊच शकता पण तुम्हाला सर्वाधिक फायदा हवा असल्यास आहारात पालेभाजी सह डाळ मिसळून खाणे सुरु करावे. यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळण्यास मदत होते. शक्यतो पालक व तूर डाळ, मसूर डाळ व वांगी, काळ्या उडदाची डाळ हे पदार्थ पोळीसह खाल्ल्याने अधिक लाभ मिळवता येऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीनुसार आहे, आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)