2 Gulab jamun Calories Burning With Walk: साखरेच्या पाकातुन बाहेर काढलेला वरून थोडा क्रिस्पी आणि आतून लोण्याच्या गोळ्यासारखा वितळणारा गुलाबजाम समोर आला की नाही म्हणणं म्हणजे कठीण काम होऊन बसतं. काही ठिकाणी तर या गुलाबजाम बरोबर वरून थंडगार आईस्क्रीम दिलं जातं किंवा रबडीची जोड केली जाते, म्हणजे एकाच फटक्यात चव, इच्छा आणि वजन सगळंच वाढायची सोय होते. यावर एकवेळ तुम्ही मनाला ब्रेक लावून नाही म्हणालही पण पाहुण्या रावळ्यांकडे गेल्यावर आग्रह का मोडता येतो? अशावेळी स्वतःसह समोरच्याचं मन राखायचं म्हणून आपण गुलाबजाम खाऊन घेतो. गुलाबजाम खाऊन झाला की का माहित नाही पण अचानक मनात अपराधीपणाची भावना येऊ लागते. मग तिला आळा घालण्यासाठी आपण स्वतःला सांगतो आता ना चार पावलं चालावं लागेल म्हणजे पटापट कॅलरीज बर्न होतील. पण तुम्हाला माहित आहे का, गोड खाऊन थोडं चालल्याने पटकन कॅलरीज बर्न होतील हा समजच मुळात चुकीचा आहे. असं आम्ही नाही हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतायत. नेमकं त्यांचं म्हणणं काय, चला पाहूया..

डॉ. कुमार यांनी आपल्या X अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, दोन गुलाबजामांमधून (आकारानुसार) साधारण ३०० कॅलरीज प्राप्त होतात आणि त्या बर्न करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तब्बल १ तास चालणं गरजेचं असतं.

Healthy Midnight Snacks Option
रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या
This is what happens to the body when you shift your dinner time from 9 pm to 6 pm
रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ पर्यंत जेवण केल्यास तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
How to Grow Tulsi Plants Faster Video
४ दिवसांत तुळस डेरेदार वाढण्यासाठी कडुलिंब व चहा पावडरचा जुगाड; जुलैमध्ये कशी घ्यावी तुळशीची काळजी? Video पाहा
Guruji danced after the bride and groom marriage
प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे! लग्नमंडपात वधू-वराचं लग्न लावल्यानंतर गुरुजींनी धरला ठेका; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Can pregnant women give birth to fair babies if they consume saffron
बाळाचा रंग उजळण्यासाठी केशर फायदेशीर ठरते का? जाणून घ्या गर्भवती महिलांनी केशराचे सेवन का करावे?
do these yoga at evening for getting rid of the tiredness of the day
दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी करा ही योगासने, एकदा Video पाहाच
weight gain and exercise
झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…
The couple did this to get a free meal at an expensive restaurant netizens
हद्द झाली राव! महागड्या रेस्टॉरंटमध्ये फुकट जेवण मिळवण्यासाठी जोडप्याने केले हे कृत्य, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

या ज्वलंत प्रश्नाला उत्तर देताना, डॉ. रोहिणी पाटील, एमबीबीएस आणि पोषणतज्ज्ञ, संस्थापक, न्यूट्रसी लाइफस्टाइल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, चालण्याचे प्रमाण शरीराचे वजन, चयापचयाचा वेग आणि सामान्य शारीरिक हालचाली यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. परंतु सर्वसाधारणपणे सांगायचे तर, सकाळी ३० मिनिटं ते १ तासाचा वेगवान वॉक केल्याने तुम्हाला कॅलरीज बर्न करण्यात आणि दिवसभरात चयापचय वाढवण्यास मदत होऊ शकते.

डॉ. पाटील पुढे सांगतात की, एका गुलाब जामुनमध्ये सुमारे १५० -२०० कॅलरीज असतात. जर तुम्ही दोन गुलाबजाम खाणार असाल तर शरीरात ३०० ते ४०० कॅलरीज वाढतात. ३० मिनिटांच्या संथ वॉकमध्ये एखादी व्यक्ती १२० ते १८० कॅलरीज बर्न करू शकते, तर ३० मिनिटांच्या वेगवान वॉकने २००- ३०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. म्हणून, दोन गुलाब जामुन खाल्यानंतर कॅलरीजचे प्रमाण संतुलित करण्यासाठी, तुम्हाला सकाळी किमान ३० मिनिटं ते एक तास चालण्याचे उद्दिष्ट ठेवायचे आहे.

अतिरिक्त कॅलरीज जाळण्याशिवाय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य, मनःस्थितीवर नियंत्रण आणि दिवसभर अधिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी सुद्धा सकाळच्या चालण्याची मदत होते. परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की व्यायाम हा आरोग्यदायी आहाराला पूरक असला पाहिजे, अति खाल्ल्यावर चालणे किंवा व्यायाम करणे हा काही जादुई उपाय नाही. चालण्याने गोड खाण्याचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात, परंतु संयम आणि आरोग्यदायी पदार्थांची निवड करणे हे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा<< प्रियांका चोप्राच्या दिराला त्वचेचा कर्करोग; तीळ व चामखिळाच्या ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, पाहा लक्षणे

डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले की, क्वचित एखाद्या दिवशी गोड पदार्थांचे सेवन करणे ठीक आहे पण त्याची शरीराला सवय लावून घेऊ नका. तसेच व्यायामाच्या बाबतसुद्धा चालणे हा उत्तम व्यायाम असला तरी तुम्ही सक्षम असल्यास केवळ चालण्यावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने किंवा वेट ट्रेनिंग करून आपण आपले आरोग्य सुधारू शकता.