जेव्हा आपण मधुमेहावर उपचार आणि व्यवस्थापन याबद्दल बोलतो तेव्हा आपण आहार, व्यायाम, झोप, औषधे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करतो. परंतु, आपण पाणी पिण्याची आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष करतो. अगदी सौम्य निर्जलीकरणामुळे रक्तातील साखरेमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, कालांतराने शरीराचे नुकसान होऊ शकते.

खरं तर मधुमेह असलेल्या लोकांसाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही. आपल्या आहारातून मिळणारे पोषकत्व रक्ताद्वारे सहज शोषले जावे यासाठी रक्तामध्ये इलेक्ट्रोलाइट्स द्रव तसेच रक्तातील साखरेची पातळी योग्य असावी.

मधुमेह असलेल्यांसाठी निर्जलीकरण धोकादायक का आहे?

एकदा शरीरामध्ये निर्जलीकरण झाल्यानंतर रक्ताभिसरण करणाऱ्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढते, मूत्रपिंड नंतर रक्त फिल्टर करण्यासाठी, अधिक लघवी तयार करण्यासाठी जास्तवेळ काम करते. अनियंत्रित मधुमेहामुळे जास्त लघवी, तहान लागते आणि निर्जलीकरण वाढते. यामुळे एखाद्याला डायबेटिक केटोसिस (Diabetic Ketosis) होण्याची शक्यता असते. डायबेटिक केटोसिस ही अशी स्थिती आहे जेव्हा शरीर आपल्या पेशींमध्ये रक्तातील साखरेला ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.

यकृत नंतर ऊर्जा निर्माण करण्यासाठी फॅट्स वापरते, ज्यामुळे ॲसिड तयार होते जे रुग्ण कोमात जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकत. किंबहुना डायबेटिक केटोॲसिडोसिस (Diabetic Ketoacidosis) आणि कोमाच्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पहिल्या उपचारांपैकी एक म्हणजे त्यांच्या शरीरात लवकरात लवकर द्रव पुरवणे. ते शरीरात पाण्याची पातळी वाढल्यानंतर इन्सुलिन दिले जाते.


हेही वाचा – पांढऱ्या व तपकिरी अंड्यातील बलकाचा रंग का वेगळा असतो? गुणवत्तेवर काय परिणाम होतो? खरेदी करताना काय लक्षात ठेवाल?

आर्जिनिन व्हॅसोप्रेसिन (Arginine Vasopressin)किंवा AVP नावाचा एक अँटीड्युरेटिक हार्मोन (antidiuretic hormone ) आहे, जो शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट (मीठ शिल्लक) राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पाणी कमी प्यायल्याने त्याच्या कार्यावर परिणाम होतो. आणखी एक यंत्रणा ज्याद्वारे शरीर निर्जलीकरण रोखते आणि मूत्रपिंडांद्वारे मीठ आणि पाण्याचे संतुलन राखते ते म्हणजे लघवीचे प्रमाण आणि रचना नियंत्रित करणे. मूत्रपिंड पाणी आणि क्षारांचे संतुलन नियंत्रित करू शकत नसल्यास, यामुळे द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संबंधित आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते.

हेही वाचा – Chia Seeds : उपाशीपोटी ‘चिया सीड्स’ का खाव्यात? वाचा, तज्ज्ञांनी सांगितले याचे जबरदस्त फायदे

काही मधुमेहाच्या औषधांमुळे निर्जलीकरण होऊ शकते का?

अलीकडे, SGLT2 inhibitors सारख्या औषधांच्या वापरामुळे लघवीद्वारे ग्लुकोजचे उत्सर्जन होते. म्हणूनच अशा औषधांचा वापर करणाऱ्या लोकांना हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज किमान अर्धा ते एक लिटर पाण्याचे सेवन वाढवणे आवश्यक आहे. तर मेटफॉर्मिन हे औषध भूक कमी करते, ज्यामुळे पाण्याचे सेवन आणि खाद्यपदार्थातील पाण्याचे शोषण कमी होते.

साधारणपणे मधुमेह असलेल्या व्यक्तीने दररोज किमान अडीच लिटर पाणी प्यावे आणि जर SGLT2 औषध घेतले असेल तर दररोज ३ लिटरपर्यंत पाणी प्यावे. ?पण, काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मधुमेह असलेल्या व्यक्तीचे हृदय किंवा मूत्रपिंड निकामी झाल्यास, त्यांना त्यांचे डॉक्टर पाणी आणि मीठ दोन्ही कमी करण्याचा सल्ला देऊ शकतात.


हेही वाचा – एका व्यक्तीचं रक्त वाचवू शकते तीन जणांचा जीव! रक्तदान कोणी करावे आणि कोणी करू नये? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

काय करावे आणि काय करू नयेत?

  • एखाद्याने आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमितपणे निरीक्षण केले पाहिजे आणि शरीरासाठी आवश्यक प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.
  • मधुमेह असलेल्यांनी उन्हाळ्यात घराबाहेर व्यायाम करू नये.
  • अल्कोहोल, कॅफीन आणि साखर या गोड पेयांचा वापर मर्यादित करावा.
  • फळांचे रस किंवा गोड पेये पिण्याऐवजी, साधे पाणी पिणे केव्हाही चांगले, त्यामुळे नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवा.