खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैलीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे अनेक आजार देखील होत आहे. या चुकीच्या सवयी आपल्या हृदयाचे ठोके देखील कमी करत आहेत. वृद्धापकाळात होणारे हृदयविकार आता तरुणांनाही आपले बळी बनवत आहेत. तरुण वयातही लोकांना हृदयविकाराचा झटका आणि कार्डियेक अरेस्टचा त्रास होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दशकात भारतात हृदयरुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील हृदय व कार्डियोवॅस्कुलर रोगांमुळे होणाऱ्या १६.९ दशलक्ष मृत्यूंपैकी किमान एक पाचवा भारताचा आहे.

हृदयविकाराचा झटका आणि कार्डियेक अरेस्ट या हृदयाशी संबंधित समस्या आहेत. ज्यांचा हृदयावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. हृदयात रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. तर हृदय जेव्हा काम करायचे थांबते आणि हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा कार्डियाक अरेस्ट येतो. हृदयविकाराचा झटका ही रक्तप्रवाहाची समस्या आहे आणि कार्डियेक अरेस्ट ही इलेक्ट्रिक समस्या आहे. हृदयाशी संबंधित या आजारापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. अभिजित जोशी, सल्लागार आणि एचओडी, कार्डिओलॉजी मणिपाल हॉस्पिटल, बाणेर पुणे यांच्या मते, हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टची लक्षणे ओळखणे आणि त्यांना प्रतिबंध करणे खूप महत्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियेक अरेस्ट यातील फरक आणि हा आजार कसा टाळायचा ते जाणून घेऊया..

हार्ट अटॅकची लक्षणे कोणती?

हृदयविकाराचा झटका तेव्हा येतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ऑक्सिजन समृद्ध रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही. हा ब्लॉकेज ताबडतोब काढून टाकला नाही, तर ज्या रक्तवाहिनीद्वारे ज्या भागात रक्त पोहोचते तो भाग मरण्यास सुरुवात होते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास नुकसान वाढू लागते. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे अचानक आणि खूप लवकर उद्भवतात. काहीवेळा ते सौम्य लक्षणांसह हळूहळू वाढू लागतात. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान हृदयाचे ठोके सहसा थांबत नाहीत. स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब युरिक ॲसिड सहज बाहेर पडेल? फक्त पाणी पिण्याची ‘ही’ योग्य पद्धत जाणून घ्या)

कार्डियाक अरेस्टची लक्षणे कोणती?

कार्डियेक अरेस्ट कोणत्याही लक्षणांशिवाय येऊ शकतो. जेव्हा हृदयातील इलेक्ट्रिकल बिघाडामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात तेव्हा असे होते. जेव्हा हृदय पंपिंग थांबवते तेव्हा मेंदू, फुफ्फुस आणि हृदयातून इतर प्रमुख अवयवांपर्यंत रक्त पोहोचत नाही. अशा स्थितीत रुग्ण बेशुद्ध होतो आणि त्याच्या नाडीची हालचाल थांबते. रुग्णावर तातडीने उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका आणि कार्डियेक अरेस्टपासून कसा बचाव कराल?

  • त्वरीत वैद्यकीय मदत देऊन हृदयविकाराची स्थिती वाढण्यापासून रोखली जाऊ शकते. त्यामुळे रुग्णाच्या जगण्याची शक्यता वाढू शकते.
  • जीवनशैलीत बदल करून, वजन नियंत्रित ठेवून आणि आहाराची काळजी घेतल्यास हृदयविकार टाळता येतात.
  • शरीर सक्रिय ठेवा आणि नियमित व्यायाम आणि योगासने करा, हृदयाचे आरोग्य चांगले राहील.
  • धुम्रपान अजिबात करू नका कारण त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब वाढतो.
  • तणाव आणि उच्चरक्तदाब ही हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत, त्यामुळे तणावापासून दूर राहा.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to differentiate between heart attack and cardiac arrest know its symptoms gps
First published on: 25-01-2023 at 20:04 IST