scorecardresearch

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून लगेच मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय मदत करतात जाणून घ्या

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून लगेच मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत
तोंडातील दुर्गंधीवर घरगुती उपाय (Photo: Freepik)

तोंडातून दुर्गंधी येत असल्यास त्या व्यक्तीला कोणाशीही बोलताना किंवा समोरच्या व्यक्तीचीही मोठी गैरसोय होते. तो दुर्गंध कोणालाही नकोसाच वाटेल, पण ज्या व्यक्तीला ही समस्या सतावत असते त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. अशा परिस्थितीत तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण त्यानेही काही फरक पडत नसल्याचा अनुभव बऱ्याचदा येतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

लवंग
लवंगमध्ये अनेक अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात जे तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यासाठी एक-दोन लवंग तोंडात ठेऊन, थोडावेळ चघळा. यामुळे दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

आणखी वाचा: लहान मुलं, वयस्कर व्यक्तींनी दूध कधी प्यावे? जाणून घ्या वयानुसार कोणत्या वेळी दूध पिणे ठरते फायदेशीर

घरगुती माऊथवॉश बनवा
तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती माऊथवॉश बनवू शकता. यासाठी एक कप गरम पाणी, दालचिनीचा अर्धा तुकडा, २ लिंबांचा रस, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा हे सर्व एकत्रित करून तुम्ही घरगुती माऊथवॉश बनवू शकता. दररोज सकाळी आणि रात्री याचा वापर करून चुळ भरल्याने तुम्हाला तोंडातील दुर्गंधीपासून सुटका मिळण्यास मदत होईल.

जीभ स्वच्छ करा
दात घासताना जीभ स्वच्छ करणे ही आवश्यक असते. जीभ स्वच्छ करणे टाळल्यास, तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. म्हणून दररोज दात घासताना जीभही स्वच्छ करा.

ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगरचा माऊथवॉश प्रमाणे वापर केल्यास तोंडातील दुर्गंधीपासून सुटका मिळण्यास मदत होते.

आणखी वाचा: बडीशेप आरोग्यासाठी ठरते फायदेशीर; ‘हे’ आश्चर्यकारक फायदे एकदा पाहाच

नारळाचे तेल
दातांमध्ये अडकलेल्या अन्नामुळेही तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. यावर उपाय करण्यासाठी एक ते दोन चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्याने चुळ भरा. हे तेल दातात अडकलेले छोटे कण खेचून बाहेर टाकण्यास मदत करतील. याशिवाय दातांना लागणारी कीड टाळण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 16:41 IST

संबंधित बातम्या