muscle pain treatment : हिवाळा सुरु असल्याने सध्या जोरदार थंडीचं वातावरण निर्माण झालं आहे. थंडीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या शारीरीक समस्यांना समोरं जावं लागतं. स्नायूंचं दुखणं हे या समस्यांपैकीच एक आहे. स्नायूंच्या वेदना होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. दुखापत होणे, वजदार वस्तू उचलणे, तसंच ताणतणावामुळंही स्नायूंच्या समस्या उद्भवू शकतात. थंडीच्या दिवसात अनेक जण बाहेर फिरणं टाळतात. त्यामुळे अनेकांना शरीराची हालचाल करण्याचा आळस येतो. या गोष्टींचा थेट परिणाम स्नायूंवर होतो. तसंच व्यायाम करणं सोडल्यानंतर कालांतराने पुन्हा व्यायामाला सुरुवात केल्यावर स्नायू दुखणं सुरु होतं. स्नायूंच्या या समस्येला DMOS म्हणून ओळखलं जातं. या समस्येनं ग्रस्त असेल्यांना चालताना अनेक अडथळे निर्माण होतात. स्यायूंना आकडी आल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर वेदना होतात.

स्नायूंना आकडी येणे म्हणजे काय?

आकडी आल्यामुळेच स्नायूंमध्ये समस्या निर्माण होते. स्नायू स्केलिटल, कार्डिएक आणि स्मूद तीन प्रकारचे असतात. आकडी स्केलिटल स्नायूंना प्रभावित करते. स्केलीटल स्नायूच माणसाला कामकाज करण्यासाठी सक्षण बनवतात. मोठ्या प्रमाणावर स्केलिटल स्नायूंचा वापर केल्यास स्नायू आखडल्यासारखे जाणवतात. त्यामुळे चालण्याचा वेग मंदावतो. जी माणसं व्यायाम करत नाहीत, त्यांचे स्नायू जखडले जातात.

Repair work, Ghodbunder, flyover,
घोडबंदर उड्डाणपुलांच्या दुरस्ती कामांना दोन दिवसांत सुरुवात, रात्रीच्या वेळेत कामे करण्यात येणार असली तरी कोंडीची शक्यता
Womens health How appropriate to take period pills
स्त्री आरोग्य : पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेणं कितपत योग्य?
IAS officer posts close-up video of leopard drinking from waterhole amid scorching heat
कडक्याच्या उन्हात शांतपणे पाणी पितोय तहानलेला बिबट्या, IAS अधिकाऱ्याने शेअर केला दुर्मिळ क्षण
dry fruits in summer
रोज उन्हाळ्यात मूठभर सुका मेवा सेवनाने तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? सेवनापूर्वी वाचाच डाॅक्टरांचा सल्ला…
Lucknow thief caught sleeping
एसीच्या थंडगार हवेत चोराला आली गाढ झोप; सकाळी थेट पोलिसांनीच झोपेतून उठवलं
diy summer skin problem home remedies for heat rash and prickly heat
उन्हाळ्यात त्वचेवरील खाज, घामोळे काही दिवसांत होतील गायब! फक्त आंघोळीपूर्वी लावा ‘या’ २ पानांची बारीक पेस्ट
why should drink water in earthen pot in summe
उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे? जाणून घ्या, मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे
Mahindra XUV 3X0
आनंद महिंद्राच्या ‘या’ नव्या स्वस्त SUV ने बाजारात उडविली खळबळ; २४ तासात १,५०० लोकांच्या घरी पोहोचली, किंमत…

नक्की वाचा – लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? तर ओव्याचे पाणी ठरेल रामबाण औषध; जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत

स्नायू दुखण्याची लक्षणे

  • शरीरात अचानक खूप जास्त आणि कमी वेदना होणं.
  • स्नायू जखडल्यासारखे वाटणं
  • स्नायूंमध्ये अचानक थकवा जाणवणे
  • स्नायूंना सूज येणे

स्नायू दखण्याच्या समस्येचं कोणताही कायमस्वरुपी उपाय नसल्याचं एक्सपर्ट सागंतात. स्नायू दुखल्यावर तुम्ही पॅरासीटामलचा उपयोग करु शकता. DMOS चं दुखणं वाढल्यावर तुम्ही घरगुती उपाय करु शकता.

नक्की वाचा – ब्लड शुगर वाढवतात गव्हाच्या पोळ्या? ‘या’ ३ पिठांचा पर्याय ठरू शकतो बेस्ट; डायबिटीजमध्ये दिवसात किती पोळ्या खाव्यात?

लसणाचा तेल

स्नायूंच्या दुखण्याच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी लसणाच्या तेलाचा उपयोग करु शकता. लसणाच्या दोन ते चार पाकळ्या तेलात टाकून गरम करा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. लसणात एलिसिन नावाची तत्व असतात. ज्यामुळे स्नायूंचं दुखणं कमी होतं.

बर्फाने स्नायूंना शेकवा

स्नायूंचं दुखणं जाणवत असेल तर आईस पॅकचा वापर करु शकता. बर्फामुळं स्नायुंमध्ये थंडी निर्माण होते. ज्यामुळे स्नायुंचं दुखणं कमी होण्यात मदत होते आणि सूज कमी होण्यासही मदत होते.

दालचिनीचा तेल

दालचिनीची पोषक तत्वे स्नायूंच्या दुखण्याच्या समस्येचं निराकरण करतात. दालचिनी तेलाने नियमितपणे मसाज केल्यावर गाठ, पायाचं दुखणं आणि स्नायूंच्या आकडीपासून बचाव होतो.