सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना एक गोष्ट सातत्याने सतावत असेल तर ते वजन. वाढलेले वजन अनेकांची डोकेदुखी झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासनतास जीममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढंच नव्हे तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितकं नियंत्रण ठेवून डायटिंग केलं जातं. मात्र, तरीसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडते. अशावेळी काय करावे? असा मोठा प्रश्न निर्माण होतो. 

वजन कमी करण्यासाठी दिवसभरातील इतर वेळेपेक्षा सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. या वेळेत तुम्ही काय करता, काय खाता पिता, तुम्ही कधी उठता या सर्वांचा परिणाम वजन कमी होण्यावर किंवा वाढण्यावर होतो. सकाळच्या वेळेचं महत्व लक्षात घेता वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन हे सकाळच्या हेल्दी रुटीनमध्ये सहा गोष्टींचा आवर्जून समावेश करण्यास सांगतात. यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी होऊ शकते, असं त्यांच म्हणणं आहे. याबाबचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉ. श्रीनिवासन म्हणतात, “सकाळच्या काही वेगवेगळ्या सवयी आहेत, ज्या तुम्ही जलद वजन कमी करण्यासाठी तुमच्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करू शकता. या सवयींना तुमच्या सकाळच्या दिनचर्येचा एक भाग बनवल्याने चयापचय आरोग्य, भूक नियंत्रण आणि एकूण ऊर्जा स्तरांवर परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि आरोग्यास समर्थन मिळते.” तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये सकाळी कोणत्या सवयींचा स्वीकार करावा जाणून घ्या…

(हे ही वाचा: झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात)

वजन कमी करण्यासाठी सकाळीच करा ‘ही’ सहा कामे

१. हायड्रेटेड रहा​

सकाळी उठल्यावर एक किंवा दोन ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करा. ही सकाळची वजन कमी करण्याच्या सर्वोत्तम सवयींपैकी एक आहे. फक्त हायड्रेटिंग केल्याने तुमचे पचन सुरू होते, तुमचे चयापचय वाढते आणि तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न वाढतो.

२. उच्च प्रथिनेयुक्त नाश्ता खा

तुम्ही नाश्त्यात जे खाता ते तुमच्या दिवसभराच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम करू शकते. यामुळेच वजन कमी करण्यासाठी सकाळी आरोग्यदायी गोष्टी खाणे ही एक उत्तम सवय आहे. प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटू शकते.

३. सकाळी व्यायाम करा

सकाळच्या वेळेत व्यायाम केल्यानं शरीराला जास्त ऊर्जा मिळून शरीरातील चरबी जळायला सुरुवात होते, त्याचा परिणाम म्हणजे वजन कमी होतं. 

४. चांगली झोप घ्या

वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणेदेखील गरजेचे आहे. जर तुम्ही रोज रात्री ७-८ तास झोप घेतली तर यामुळे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही फास्ट होण्यास मदत होईल, त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होईल.

(हे ही वाचा: तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…)

५. सजग ध्यान

दिवसाची सुरुवात ध्यानधारणेने किंवा खोल श्वास घेण्याच्या व्यायामाने केल्यास ताण कमी होतो, ज्याचा संबंध अनेकदा जास्त खाणे आणि वजन वाढण्याशी असतो. सरावामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, लक्ष केंद्रित होतं, स्मरणशक्ती वाढते. यामुळे मनावर ताण येत नाही आणि वजनही वाढत नाही. 

६. कोवळ्या उन्हात बसा-फिरा

सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेतल्यानं आजारांपासून लढण्यासाठी उपयुक्त ठरणारं व्हिटामीन डी मिळण्यास मदत होते. उन्हात बसल्यानं कॉलेस्ट्रॉल पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं.