scorecardresearch

चेहऱ्यावरून ओळखा शरीरात कोलेस्ट्रॉल कमी आहे की जास्त? शरीराचे ‘हे’ संकेत ओळखा; करा ‘हे’ ५ उपाय

Bad Cholesterol Signs: Homeopathy डॉ. मनदीप दहिया यांच्या माहितीनुसार, कोलेस्ट्रॉल मुळे त्वचेला आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होत नाही.

If Bad Cholesterol Increased Your Face Gives These Signals How To Reduce Cholesterol In Body Blood Vessels Expert Advice
चेहऱ्यावरून ओळखा शरीरात कोलेस्ट्रॉल कमी आहे की जास्त? (फोटो: Pexels)

High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्याने जगभरात अनेक नागरिक त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल हा शरीराचा छुपा शत्रू ठरू शकतो. मेणासारखा वाटणारा कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमून राहिल्यास रक्त प्रवाहात अडथळा येतो व परिणामी अनेक अवयवांना धोका असतो. कोलेस्ट्रॉल जितका वाईट तितकाच शरीराला आवश्यक सुद्धा आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार शरीरात टेस्टोस्टेरोन, एस्ट्रोजेन सह २० हुन अधिक आवश्यक हार्मोन्सची निर्मिती ही कोलेस्ट्रॉलमुळे शक्य होते. कोलेस्ट्रॉल शरीराच्या मेटाबॉलिज्मचा वेग वाढवतो. मात्र जर या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर वाढू लागले तर मात्र शरीराला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरच आपल्याला काही लक्षणे दाखवून सूचित करतं. हात- पाय सतत सुन्न होणे, सूज येणे याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे बदल वाईट कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकतात. तुमची त्वचा तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कशी सतर्क करते हे जाणून घेऊयात..

कोलेस्ट्रॉल वाढल्याची ‘ही’ लक्षणे चेहऱ्यावर दिसतात

Scientific Based Homeopathy डॉ. मनदीप दहिया यांच्या माहितीनुसार, कोलेस्ट्रॉल मुळे त्वचेला आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे चेहऱ्याला रंग पांढरा किंवा पिवळसर दिसू शकतो. आपल्या डोळ्यांच्या खाली, पाठीवर, हातापायावर सुद्धा घट्ट पिवळसर डाग दिसू शकतात. सतत चेहऱ्यावर रॅश व पुरळ येणे हे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे. चेहऱ्याची त्वचा ही सुरकुतलेली व जाळीदार वाटत असल्यास शरीर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत देत असते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात कसा ठेवाल?

  • शरीरातून कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी साधारण एक चमचा इसबगोल गरम पाण्यासह घेतल्याने मोठी मदत होऊ शकते. टाइम्सच्या माहितीनुसार, एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला १०- १२ ग्रॅम इसबगोलचे सेवन करायला हवे.
  • आहारात ओमेगा ३ फॅटी ऍसिड असणाऱ्या पदार्थांचा व सुक्या मेव्याचा समावेश करा. आक्रोडचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मोठी मदत करू शकते.

हे ही वाचा<< आक्रोड की बदाम, डायबिटीज रुग्णांसाठी बेस्ट पर्याय काय? तज्ज्ञ सांगतात, “ब्लड शुगरवर नियंत्रणासाठी रोज..”

  • तुमच्या नियमित जेवणात टोमॅटो व फळभाज्यांच्या समावेश करा.
  • प्रक्रिया केलेले अन्न व पेय टाळा.
  • सिगरेट व दारू बंद करा

कोलेस्ट्रॉलबाबत एक चांगली गोष्ट अशी की, डायबिटीज किंवा अन्य गंभीर आजारांसारखा कोलेस्ट्रॉलचा त्रास हा आयुष्यभर टिकणारा नसतो. जर आपण योग्य जीवनशैली व आहाराचे पालन केले तर आपल्याला नक्कीच कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:08 IST