तुम्हाला इअरड्रॉप्स वापरण्याची सवय आहे का? तुमचे उत्तर हो, असे असेल, तर आजच थांबा. कारण- मान्सूनच्या वातावरणामध्ये इअरड्रॉप्स तुमच्या कानाच्या आरोग्यासाठी समस्यादेखील निर्माण करू शकते. “पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता तुमच्या कानावर कसा परिणाम करू शकते आणि इअरड्रॉप्स वापरल्याने कानाचे आरोग्य का खराब होऊ शकते? याबाबत HearClear चे वरिष्ठ ENT सल्लागार डॉ. राजेश धीर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

पावसाळ्यात हवेतील ओलावा वाढलेला असतो. त्यामुळे जीवाणू आणि बुरशी यांच्या प्रजननासाठी योग्य वातावरण तयार होते; ज्यामुळे कानाच्या संसर्गाचा धोका लक्षणीय वाढतो. या संसर्गामुळे कानात खाज सुटणे, लालसरपणा, सूज व स्राव होऊ शकतो.

“Swimmer’s ear (Otitis externa) ही एक पावसाळ्याशी संबंधित आणखी एक सामान्य आरोग्य समस्या आहे. या समस्येमध्ये बाह्य कानाच्या भागात जीवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग होतो आणि त्यामुळे तीव्र वेदना, लालसरपणा, सूज व अगदी हिरवट-पिवळा पू स्राव होऊ शकतो. संभाव्यतः कान नलिका बंद करू शकतो आणि त्याचा परिणाम श्रवणशक्तीवर होऊ शकतो”, असे डॉ धीर म्हणाले.

हेही वाचा – तुम्ही जेवताना तोंडातील घास एकाच बाजूने चावता का? असे करू नका, तज्ज्ञांनी दिली चेतावणी

“आर्द्रतेमुळे कानातील मेणाच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. ओलसर हवेमुळे कानातील मळ मऊ करते आणि नंतर कोरड्या वातावरणामध्ये हा कानातील मळ कडक होऊ शकतो, त्यामुळे आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याव्यतिरिक्त आर्द्रतेच्या पातळीत चढ-उतार झाल्यास टिनिटसची समस्या होऊ शकते”, असे डॉ. धीर यांनी सांगितले.

टिनिटीस ही अशी स्थिती आहे की, ज्यामध्ये कानात कर्कश आवाज येतो. हा आवाज कमी, जास्त किंवा उच्च तीव्रतेचा असू शकतो; पण तो इतरांना ऐकू येत नाही.

इअरड्रॉप्स : उपाय की धोका? (Eardrops : A solution or a risk?)

पावसाळ्यात कानाच्या अस्वस्थतेसाठी इअरड्रॉप्स एक द्रुत निराकरण असल्यासारखे वाटत असले तरी डॉ. धीर स्वत:च औषधोपचार करण्याबाबत सावधगिरीचा इशारा देतात. थेट मेडिकलमध्ये इअरड्रॉप्स आणून वापरल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.

कानात मळ(Worsen Earwax Blockage) : काही थेंब जास्त वापरल्यास कानातील मळाच्या उत्पादनाला उत्तेजित मिळू शकते. त्यामुळे कानाच्या समस्या आणखी वाढू शकतता.

त्रास आणि दाह-सूज (Cause Irritation and Inflammation) : इअरड्रॉप्समधील काही घटकांमुळे कानामध्ये दाह-सूज येऊन, त्रास होऊ शकतो. यांमुळे अस्वस्थता जाणवते.

प्रतिजैविक प्रतिकार (Trigger Antibiotic Resistance) : डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रतिजैविक(Antibiotic) इअरड्रॉप्स वापरणे हे प्रतिजैविक प्रतिकार (Antibiotic Resistance) निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते शकते. प्रतिजैविक प्रतिकार म्हणजे जेव्हा जीवाणू त्यांना मारण्यासाठी तयार केलेल्या प्रतिजैविकांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करतात.

श्रवणशक्ती कमी होण्यास कारणीभूत (Potentially Lead to Hearing Loss) : गंभीर प्रकरणांमध्ये इअरड्रॉप्सचा गैरवापर कानाला हानी पोहोचवू शकतो आणि त्यामुळे श्रवणशक्तीवर दुष्परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा – पावसाळ्यात श्वसनाचे आजार का वाढतात? त्यापासून संरक्षण कसे करावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

पावसाळ्यात कानाची काळजी घेण्याच्या अत्यावश्यक टिप्स (Essential ear care tips for the monsoon season)

पावसाळ्यात तुमच्या कानांचे रक्षण करण्यासाठी डॉ. धीर यांनी सुचवलेल्या काही सोप्या पायऱ्या :

नियमित कानाची स्वच्छता (Regular Ear Cleaning) : कानातील अतिरिक्त मळ काढून टाकण्यासाठी आपले कान नियमितपणे मऊ, ओलसर कापडाने स्वच्छ करा. कॉटन स्वॅब वापरणे टाळा, जे कानातील मेण पुढे ढकलू शकते आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकते.

श्रवणयंत्रांचे संरक्षण करा (Protect Hearing Aids) : जर तुम्ही श्रवणयंत्रे वापरत असाल, तर त्यांचे आर्द्रतेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी डिह्युमिडिफायर किंवा संरक्षणात्मक कव्हर वापरा. तुमचे श्रवणयंत्र नियमितपणे स्वच्छ करा आणि त्यांची देखरेख करा; जेणेकरून ते चांगल्या प्रकारे कार्य करू शकेल.

पाण्यात जाणे टाळा (Limit Water Activities) : मुसळधार पावसात पोहणे किंवा इतर पाण्याची कामे टाळा. तसे केल्यास तुमच्या कानात दूषित पाणी जाण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.

डॉक्टरांचा सल्ला घ्या (Consult a Doctor) : तुम्हाला कानाात दुखणे, अस्वस्थता, स्राव किंवा टिनिटस समस्या होत असल्यास, योग्य निदान आणि उपचारांसाठी ईएनटी तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

या टिप्सचे पालन करा. इअरड्रॉप्स टाकून, स्वत:वर औषधोपचार करणे टाळा. असे करण्यामुळे तुम्ही संपूर्ण पावसाळ्यात तुमचे कान निरोगी आणि आरामदायक राहतील याची खात्री करून घेऊ शकता. लक्षात ठेवा, लवकर निदान आणि योग्य वैद्यकीय सेवा तुम्हाला कानाच्या कोणत्याही समस्यांना तोंड देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.