उत्तम आरोग्यासाठी शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण आपले केस, चेहरा, पाय, हात यांची काळजी घेतो पण नखांची काळजी घ्यायला विसरतो. ही छोटी नखे आपल्याला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पिवळी नखे, घाणेरडी नखे, नखांचा कोरडेपणा, हे पुरावे आहेत की तुम्ही तुमच्या नखांची काळजी घेत नाही आहात.

नखांवर दिसणारी ही लक्षणे आपल्या अंतर्गत आणि बाह्य आरोग्याच्या स्थितीचे वर्णन करतात. नखांमध्ये दिसणारी ही सर्व लक्षणे जेव्हा तुम्ही नखे साफ करायला विसरता तेव्हा दिसून येतात. घाणेरड्या नखांमुळे शरीर रोगांचे घर तर बनतेच शिवाय वाईटही दिसते. ‘माँ ये कैसे करूं’ या यूट्यूब चॅनलवर तज्ञ सांगत आहेत की नखे स्वच्छ करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमची नखे घरी सहज स्वच्छ करू शकता. नखे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या तीन पद्धतींचा अवलंब करू शकता.

( हे ही वाचा: Mouth Ulcer: तोंडात फोड आल्याने खाणं अवघड झालंय? ‘हे’ घरगुती आराम देतील चटकन आराम)

खोबरेल तेलाने मसाज

एका भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्यात हात टाका. या पाण्यात पाच ते सात मिनिटे हात ठेवा आणि त्यात एक लिंबू घाला. हात काही वेळ पाण्यात ठेवा आणि लिंबाच्या सालीने हातांना मसाज करा. आता पाण्यातून हात काढून टॉवेलने स्वच्छ करा. आता हाताच्या नखांवर खोबरेल तेल लावून नखांना चांगली मसाज करा. नारळाच्या तेलाने मसाज केल्याने नखांच्या सभोवतालच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि नखे चांगली होतील.

लसूण वापरा

औषधी गुणधर्मांनी भरलेला लसूण फंगल दूर करण्यासाठी गुणकारी आहे. यासाठी लिंबाच्या साली घ्या आणि त्यात लसूण बारीक करून मिक्स करा. आता याने नखांना मसाज करा. लसणाने मसाज केल्याने नखांमध्ये असलेले इन्फेक्शन दूर होईल. नखांना लसूण दोन ते तीन मिनिटे चोळल्याने नखांना चमक येईल.

( हे ही वाचा: Uric Acid: युरिक अॅसिडने बॉर्डर लाइन पार केलीय? तर आजच खायचे सोडा ‘हे’ ५ पदार्थ)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरा

एका भांड्यात एक चमचा खोबरेल तेल आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या आणि ते चांगले मिसळा. व्हिटॅमिन ई आणि खोबरेल तेलाने नखांना ५-७ मिनिटे मसाज केल्याने नखांचा कोरडेपणा दूर होईल आणि नखे निरोगी दिसतील. नखांना निरोगी ठेवण्यासाठी हे तीन उपाय खूप प्रभावी ठरतात.