तुपाशिवाय भारतीय जेवणाची कल्पनाच करता येत नाही. तुपाचा वापर हलवा बनवण्यासाठी, मिठाईमध्ये, स्वयंपाकात प्रामुख्याने केला जातो. आयुर्वेदानुसार तूप हे रोज वापरले जाणारे अन्न आहे जे अन्नाची चव तर वाढवतेच पण आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ रेखा राधामोनी यांच्या मते तुपाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तूप त्वचेवर अँटी-एजिंग एजंट म्हणून काम करते. हे खाल्ल्याने त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव कमी दिसतो. याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते तसंच बुद्धी आणि स्मरणशक्ती सुधारते, पचन सुधारते आणि त्वचा निरोगी राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्यासाठी फायदेशीर असूनही काही लोकांना तुपाचे सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून वारंवार दिला जातो. तज्ज्ञांनी इन्स्टाग्रामवर सांगितले आहे की तुपाचे सकारात्मक परिणाम असूनही ते काहींना हानीही करते. जाणून घेऊया तज्ज्ञांकडून कोणत्या आजारांमध्ये तूप सेवन करू नये. काही लोकांना तूप का सूट होत नाही.

( हे ही वाचा: ‘या’ रसांच्या सेवनाने किडनी स्टोन लघवीतून सहज बाहेर पडेल; ऑपरेशनची देखील गरज भासणार नाही)

तज्ञांच्या मते खालील लोकांनी तूप सेवन टाळावे.

  • तुम्हाला दीर्घकालीन अपचन आणि IBS-D सारख्या पोटाच्या समस्यांनी त्रस्त असल्यास तूप सेवन करू नका.
  • ताप असताना तूप खाणे टाळा, विशेषत: हंगामी तापात तूप खाऊ नका.
  • गरोदर महिलांनी तूप सेवन करताना दुप्पट काळजी घ्यावी.
  • गरोदरपणात तुमचे वजन जास्त असेल तर तुपाचे सेवन टाळा किंवा कमी करा.
  • लिव्हर सिरोसिस, स्प्लेनोमेगाली, हेपेटोमेगाली, हिपॅटायटिस इत्यादी यकृताच्या आजारांमध्ये तूप खाणे टाळावे.
  • तज्ज्ञांच्या मते ज्यांचा बीएमआय जास्त आहे त्यांनी तूप खाणे टाळावे.
  • डिस्लिपिडेमिया, फॅटी लिव्हर, हृदयविकार असलेल्या लोकांनी आणि पित्त मूत्राशय काढण्याची शस्त्रक्रिया केलेल्या लोकांनी तूप टाळावे.

चांगल्या आरोग्यासाठी तूप किती प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे:

अमन पुरी, संस्थापक, स्टेडफास्ट न्यूट्रिशन, म्हणाले की तुपाचे अनेक आरोग्य फायदे आहेत, ज्यात हाडांचे आरोग्य आणि मेंदूचे आरोग्य, दाहक-विरोधी गुणधर्म, चांगले चयापचय आणि मजबूत प्रतिकारशक्ती यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या शरीरानुसार कोणतेही अन्न सेवन केले पाहिजे. हे आवश्यक नाही की जे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर आहे ते आपल्या आरोग्यास अनुकूल असावे. तज्ज्ञांच्या मते, शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून एक ते दोन चमचे तुपाचे सेवन करू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In these disease patients should avoid ghee how its harmful for health know from expert gps
First published on: 05-12-2022 at 19:02 IST