Internal Bleeding Cause And Symptoms: अंतर्गत रक्तस्त्राव हा एक प्रकारचा रक्तस्त्राव आहे जो आपल्या शरीरात होतो. तुमच्या शरीराच्या बाहेरील भागाला इजा करणारी दुखापत सहज दिसू शकते. जेव्हा तुमच्या त्वचेवर जखम होते तेव्हा रक्त बाहेर येते. आपण काय दुखत आहे ते पाहू शकता आणि ते कशामुळे होत आहे हे आपल्याला सहज समजते. मात्र अंतर्गत रक्तस्त्राव पाहणे किंवा त्याचे निदान करणे इतके सोपे नाही. अंतर्गत रक्तस्त्राव बहुतेकदा दुखापतीचा परिणाम असतो. असा रक्तस्त्राव तुमच्यासाठी अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकतो. अंतर्गत रक्तस्त्राव म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि उपचार काय आहेत हे जाणून घेऊया.

अंतर्गत रक्तस्रावाची लक्षणे ( Symptoms Of Internal Bleeding )

  • चक्कर येणे
  • अशक्तपणा
  • कमी रक्तदाब
  • डोळ्यांची समस्या
  • बधीरपणा
  • शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा
  • डोकेदुखी
  • पोटदुखी
  • श्वास घेण्यात अडचण
  • छातीत दुखणे
  • मळमळ
  • उलट्या होणे
  • अतिसार

( हे ही वाचा: ‘हे’ ५ पदार्थ ५०% यूरिक ॲसिड झपाट्याने काढून टाकतील; जाणून घ्या यादी)

loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

अंतर्गत रक्तस्त्राव कारणे (Causes Of Internal Bleeding)

अपघातामुळे तुम्हाला अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. अशा रक्तस्त्रावाची आपल्याला माहितीही नसते. अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचे आणखी एक प्रमुख कारण शरीरात तयार होणारे काही प्रकारचे रोग असू शकतात. हिमोफिलिया, डेंग्यू, कांजण्यांच्या स्थितीतही अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो.

उपचार जाणून घ्या

यामध्ये सर्वात पहिला उपचार म्हणजे रक्तस्त्रावाचा स्त्रोत शोधणे आणि त्याला वेळीच थांबवणे हे आहे. काही अंतर्गत रक्तस्त्राव सामान्य असू शकतो आणि स्वतःच थांबतो. मात्र काही प्रकरणे इतकी गंभीर असतात की त्यांना शस्त्रक्रियेसह काही उपचार केले जाऊ शकतात. तसे, अंतर्गत रक्तस्त्रावची स्थिती ही आपत्कालीन स्थिती नाही. पण जर तुमच्या डोक्याला दुखापत झाली असेल आणि तुमच्या मेंदूमध्ये गुठळ्या होत असतील तर लगेच डॉक्टरांना भेटा.